Shahid Kapoor: शाहिद कपूरच्या कबीर सिंगचा डॅशिग लूक पाहिलाय का?

बी टाऊन
Updated Apr 22, 2019 | 08:45 IST | टाइम्स नाऊ मराठी

Shahid Kapoor look: शाहिद कपूरच्या चाहत्यांनीच नव्हे, तर इतरांचीही उत्सुकता वाढवेल, असा लूक असणारे एक पोस्टर शाहिद कपूरने त्याच्या इन्सटा अकाऊंटवर शेअर केले आहे. शाहिदच्या या लूकची सद्या जोरदार चर्चा सुरू आहे.

Shahid kapoor
शाहिद कपूरचा कबीर सिंग सिनेमात डॅशिंग लूक   |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई : शाहिद कपूर कुठं आहे? माहिती आहे का कोणाला? नाही...नाही...तसं नाही...शाहिद दिसतो सोशल मीडियावर पण आपल्या पोरा बाळांसोबतच असतो. त्यामुळं त्याचं काय चाललंय हे कुणालाच कळत नव्हतं. पण, रविवारी तुम्ही जर, शाहिदचं इंस्टाग्राम अकाऊंट पाहिलं असेल तर, शाहिद गेले काही दिवस काय करत होता. याचं उत्तर तुम्हाला मिळेल. शाहिद तेलुगू फिल्म अर्जुन रेड्डीच्या रिमेकमध्ये काम करतोय. त्याच्या सिनेमाचं नाव कबीर सिंग, असं आहे. या कबीर सिंगचा एक जबरदस्त लूक शाहिदनं आपल्या ऑफिशिअल इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. त्यामुळं आता कबीर सिंगची उत्सुकता वाढलीय. मुळात कबीर सिंगचा टिझर गेल्या आठवड्यातच रिलीज झाला होता. पण, त्यात सिनेमामध्ये फक्त शाहिद एके शाहिदच असेल, असं दिसलं. पण, रविवारच्या शाहिदच्या इंस्टाग्राम शेअर केलेल्या लुकनं टिझरपेक्षाही जास्त भाव खाल्लाय. अनेकांनी त्याचा हा लुक पाहून मग टिझर शोधून पाहिलाय. शाहिद या सिनेमात एका मेडिकल स्टुडंटची भूमिका करतोय. त्यासाठी त्यानं १४ किलो वजन घटवलंय. सिनेमात तो पहिल्या हाफमध्ये आणि सेकंड हाफमध्ये वेगवेगळ्या अवतारात दिसणार आहे.

देवदासशी मिळती जुळती कथा?

शाहिदचा कबीर सिंग सिनेमा अर्जुन रेड्डीचा फ्रेम टू फ्रेम रिमेक असण्याची शक्यता कमी आहे. अर्जुन रेड्डी हा तेलुगू सिनेमा होता आणि कबीर सिंगची कथा दिल्लीत घडते, असे सांगण्यात आले आहे. यात शाहिद अर्थात कबीर एका मुलीच्या प्रेमात असतो आणि तिचे दुसऱ्याशी लग्न झाल्यानंतर तो स्वतःचं आयुष्य उध्वस्त करतो, अशी कथा आहे. काहिशी देवदासशी मिळती जुळती कथा असली तरी ती साऊथ इंडिया स्टाईलनं मांडण्यात आल्याचं टिझरमध्ये दिसतंय. सिनेमा २१ जूनला रिलीज होणार आहे. अर्जुन रेड्डीमध्ये विजय देवरकोंडा आणि शालिनी पांडे यांनी भूमिका केल्या होत्या. कबीर सिंगमध्ये शाहीद सोबत कियारा आडवानी दिसणार आहे. कियारालाही धोनीच्या बायोपिकनंतर हवा तसा सिनेमा मिळालेला नाही. त्यामुळं तिलाही कबीर सिंग सिनेमाकडून खूप अपेक्षा असाव्यात. सिनेमाचं दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केलंय. त्यामुळं सिनेमामध्ये साऊथ स्टाईलप्रमाणँ भरपूर अॅक्शन, ड्रामा, रोमान्स आणि हिंसा दिसणार असल्याचं वाटतंय. आता सिनेमा नेमका कसा असेल, शाहिदची नौका ही सिनेमा तारेल का, यासाठी आता २१ जूनचीच वाट पाहावी लागणार आहे.

शाहिदला एका सूपरहिटची गरज

शाहिद कपूर हा इंडस्ट्रीतल्या चांगल्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्यानं कमीने, जब वी मेट, उडता पंजाब, हैदर यांसारखे अनेक चांगले सिनेमे केले आहेत. गेल्या वर्षीच्या पद्मावतमध्येही दिसला. पण, त्यातल्या त्याच्या महारावल रतनसिंह यांच्या भूमिकेपेक्षा रणवीर सिंग खिल्जीच्या भूमिकेत भाव खाऊन गेला. त्यामुळं सिनेमा सुपरहिट होऊनही शाहिदला त्याचा फायदा झाला नाही. त्यानंतर त्याचा बत्ती गूल मीटर चालू हा सिनेमा येऊन गेला. पण, त्या सिनेमानं शाहिदची बत्तीही गुल केली आणि मीटरही डाऊन केलं. त्यामुळं शाहिदला आता कोणत्याही परिस्थितीत एका हिट सिनेमाची गरज आहे. कबीर सिंह हा सिनेमा शाहिदची ती गरज भरून काढेल, अशी अपेक्षा आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Shahid Kapoor: शाहिद कपूरच्या कबीर सिंगचा डॅशिग लूक पाहिलाय का? Description: Shahid Kapoor look: शाहिद कपूरच्या चाहत्यांनीच नव्हे, तर इतरांचीही उत्सुकता वाढवेल, असा लूक असणारे एक पोस्टर शाहिद कपूरने त्याच्या इन्सटा अकाऊंटवर शेअर केले आहे. शाहिदच्या या लूकची सद्या जोरदार चर्चा सुरू आहे.
Loading...
Loading...
Loading...