KK यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार, सकाळी 10 ते 12.30 वेळेत अंत्यदर्शन, तर दुपारी एक वाजता होतील अंत्यसंस्कार

बी टाऊन
भरत जाधव
Updated Jun 02, 2022 | 08:23 IST

कोलकातामधील (Kolkata) कॉन्सर्टनंतर (Concert) हृदयविकाराचा (Heart Attack) झटक्यामुळे निधन (Death) झालेले गायक केके यांचं पार्थिव बुधवारी मुंबईत आणण्यात आलं. सध्या मुंबईतल्या वर्सोव्यातल्या राहत्या घरी केकेचं पार्थिव आणण्यात आले आहे.

Funeral at KK's grave at 1 p.m.
KK यांच्या पार्थिवावर दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • केके यांनी बॉलिवूडमधील 200 हून अधिक सुपरहिट गाणी गायली आहेत.
  • मुंबईत केकेच्या पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार
  • केकेला अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलिवूड कलाकाराची गर्दी होण्याची शक्यता

मुंबई: कोलकातामधील (Kolkata) कॉन्सर्टनंतर (Concert) हृदयविकाराचा (Heart Attack) झटक्यामुळे निधन (Death) झालेले गायक केके यांचं पार्थिव बुधवारी मुंबईत आणण्यात आलं. सध्या मुंबईतल्या वर्सोव्यातल्या राहत्या घरी केकेचं पार्थिव आणण्यात आले आहे. आज मुंबईतल्या वर्सोवा इथल्या स्मशानभूमीत केकेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. विर्सोव्याच्या पार्क प्लाझामध्ये सकाळी 10 ते 12.30 या वेळेत केके यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. वर्सोवा येथील स्मशानभूमीत दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. केकेला अखेरचा निरोप देण्यासाठी उद्या अख्खं बॉलिवूड येण्याची शक्यता आहे. 

तरुणाईला प्रेम व्यक्त करायला शिकवणारा आवाज, प्रेम भंग झालेल्यांना आधार देणारा आवाज अशी केके यांची ओळख होती. केके यांनी बॉलिवूडमधील 200 हून अधिक सुपरहिट गाणी गायली आहेत. 'हम दिल दे चुके सनम' या सिनेमातील 'तडप तडप के इस दिल से' हे त्यांचं गाणं लोकप्रिय झालं होतं. 'खुदा जाने' सारखे रोमँटिक गाणे, 'इट्स द टाइम टू डिस्को' आणि 'कोई कहे कहता रहे' सारखे डान्स नंबर्स तसेच 'तडप तडप के इस दिल से' सारखी गाणी आजही लोकांच्या मनावर राज्य करत आहेत.

केके यांचा जन्म दिल्लीमध्ये  जन्म 23 ऑगस्ट 1968 रोजी झाला होता. दिल्लीतील माउंट मेरी स्कूलमध्ये केके यांनी शिक्षण घेतलं. इयत्ता दुसरीत असताना त्यांनी आपले पहिले गाणं गायले. तसेच केके यांनी किरोडी मल कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. ग्रॅज्युएशननंतर केके यांनी मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरीही केली आणि या दरम्यान त्यांनी 35 हजारांहून अधिक जिंगल्स गाण्यांचा रेकॉर्ड केला. 1999 मध्ये त्यांचा पल नावाचा त्यांचा पहिला अल्बम रिलीज केला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी