सोनू सूद देशातील १८ राज्यांमध्ये सुरू करणार ऑक्सिजन प्रकल्प, किती खर्च करणार?

बी टाऊन
विजय तावडे
Updated Jun 10, 2021 | 16:53 IST

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत देशभरात वैद्यकीय ऑक्सिजनची (Medical Oxygen) मोठी कमतरता भासली होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन सोनू सूद आता सुरू करणार १८ राज्यांमध्ये वैद्यकीय ऑक्सिजन निर्मितीसाठीचे प्रकल्प.

Sonu Sood to start Medical Oxygen Plants
सोनू सूद उभारणार ऑक्सिजन प्रकल्प 

थोडं पण कामाचं

  • कुठे सुरू होणार ऑक्सिजन प्रकल्प?
  • कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी
  • किती खर्च येणार ?

मुंबई : बॉलीवूडच्या अभिनेता (Bollywood Actor) सोदू सूद (Sonu Sood) मागील वर्षभरापासून कोरोना महामारीमुळे (Corona Pandemic) अडचणीत सापडलेल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात मदत करतो आहे. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत (Corona second wave) देशभरात वैद्यकीय ऑक्सिजनची (Medical Oxygen) मोठी कमतरता भासली होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन सोनू सूदने आता १८ राज्यांमध्ये वैद्यकीय ऑक्सिजन निर्मितीसाठीचे प्रकल्प (Oxygen Plant) सुरू करण्याची घोषणा केली आहे. सोनू सूदने सांगितले की आंध्र प्रदेशातील नेल्लोर आणि कुरनूल या शहरांमध्ये वैद्यकीय ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प याआधीच सुरू केले आहेत आणि सप्टेंबरपर्यत सर्व राज्यांमधील वैद्यकीय ऑक्सिजनचे प्रकल्प कार्यान्वित होतील. (Sonu Sood to start 18 Medical Oxygen Plants across country)

कुठे सुरू होणार ऑक्सिजन प्रकल्प?

देशात कुठे कुठे वैद्यकीय ऑक्सिजन प्रकल्प सुरू होणार याची माहिती देताना सोनू सूदने सांगितले आहे की 'मी सर्व राज्यात वैद्यकीय ऑक्सिजन प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. ऑक्सिजन प्रकल्पांना गरजू हॉस्पिटलजवळ सुरू करण्यात येणार आहे. ही अशी हॉस्पिटल असतील ज्यामध्ये १५० ते २०० बेड्स असतील. यानंतर या सर्व हॉस्पिटलला वैद्यकीय ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही. या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने कोणालाही आपला जीव गमावावा लागणार नाही अशी मला आशा आहे.'

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी

सोनू सूदला जेव्हा विचारण्यात आले की ही सर्व तयारी कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेसाठी करण्यात येते आहे का? त्यावर सोनू सूदने उत्तर दिले की या प्रयत्नांमुळे देशातील वैद्यकीय ऑक्सिजनचा प्रश्न कायमचा निकाली निघेल. सध्या संपूर्ण देशात ७०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आहेत ज्यांची सर्व्हिस आम्ही करतो आहोत. ऑक्सिजन प्रकल्प सुरू झाल्यानंतर कोणताही प्रश्न राहणार नाही. आपण तिसऱ्या किंवा चौथ्या लाटेची वाट का पाहायची ? कोरोना महामारी संपल्यानंतरदेखील या ऑक्सिजन प्रकल्पांद्वारे गावांमध्ये आणि शहरांमध्ये वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा होत राहील.

किती खर्च येणार ?

देशभरात सुरू करण्यात येणारे वैद्यकीय ऑक्सिजन प्रकल्प नेमके किती क्षमतेचे आणि किती मोठे असणार आहेत याबद्दलची माहिती विस्ताराने सोनू सूदने दिलेली नाही. मात्र समोर आलेल्या वृत्तानुसार २०० बेड्स असणाऱ्या हॉस्पिटलसाठी वैद्यकीय ऑक्सिजन प्रकल्प सुरू करण्यासाठी जवळपास ५० लाख रुपयांचा खर्च येतो. जर सोनू सूदने देशातील १८ राज्यांमध्ये ऑक्सिजन प्रकल्प सुरू केले तर त्याचा खर्च जवळपास ९ ते १० कोटी रुपये इतका येईल. 

आगामी काळात सोनू सूद 'आचार्य' या तेलगू चित्रपटात दिसणार आहे. तर बॉलीवूडच्या 'पृथ्वीराज' या चित्रपटातदेखील सोनू दिसणार आहे. पृथ्वीराजमध्ये अक्षय कुमारची प्रमुख भूमिका आहे आणि या चित्रपटातून माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर बॉलीवूडमध्ये पदार्पण करते आहे. अक्षय कुमारचा हा बहुचर्चित चित्रपट कोरोना महामारीमुळे रखडला आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी