Bollywood Actress | करीना कपूर खान, अमृता अरोरा यांना कोरोनाचा संसर्ग

बी टाऊन
विजय तावडे
Updated Dec 13, 2021 | 19:03 IST

Bollywood Stars | करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि अमृता अरोरा (Amrita Arora)यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (Corona positive) आली आहे. मुंबई महानगरपालिकेने (BMC)यासंदर्भातील माहिती दिली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) दिलेल्या स्टेटमेंटनुसार या दोन्ही अभिनेत्रींनी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केले असून अनेक पार्ट्यांमध्ये सहभाग घेतला होता.

Bollywood stars
बॉलीवूड स्टार 
थोडं पण कामाचं
  • करीना कपूर खान आणि अमृता अरोराला कोरोनाचा संसर्ग
  • कोरोनाचे नियम मोडून करत होत्या पार्ट्या
  • मुंबई महानगरपालिकेकडून दोघींच्या संपर्कात आलेल्यांच्या चाचण्या करण्याचे आदेश

Bollywood | मुंबई : बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि अमृता अरोरा (Amrita Arora)यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (Corona positive) आली आहे. मुंबई महानगरपालिकेने (BMC)यासंदर्भातील माहिती दिली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) दिलेल्या स्टेटमेंटनुसार या दोन्ही अभिनेत्रींनी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केले असून अनेक पार्ट्यांमध्ये सहभाग घेतला होता. मुंबई महानगरपालिकेने या दोन्ही अभिनेत्रींच्या संपर्कात आलेल्या लोकांना आरटी-पीसीआर टेस्ट करण्याचे आदेश दिले आहेत. (Bollywood star Kareena Kapoor Khan, Amrita Arora infected with coron-19, BMC declares the status)

कमल हसनना देखील झाला होता कोरोना

अलीकडेच लोकप्रिय अभिनेते कमल हसन यांनादेखील कोरोनाचा संसर्ग झाला होता. कमल हसन अमेरिकेच्या दौऱ्यावरून परत येत असताना त्यांना संसर्ग झाला होता. ६७ वर्षीय कमल हसन यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसदेखील घेतलेली होती. त्यांना २२ नोव्हेंबरला चेन्नई येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कमल हसन आता कोरोनातून बरे झाले आहेत. दरम्यान महाराष्ट्र आणि मुंबईत कोरोना बाधितांच्या रोजच्या संख्येत घट झाली आहे. महाराष्ट्रात रविवारी कोरोनाचे नवे ७०४ रुग्ण आढळले असून १६ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६६.४३ लाखांवर गेली आहे तर एकूण १,४१,२५९ लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाबाधितांची घटती संख्या

तर दुसरीकडे मुंबईत १८७ नवे कोरोना बाधित रुग्ण रविवारी आढळले आहेत. दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे . हे दोन्ही रुग्ण ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते. मुंबईजवळच्या पनवेल, नवी मुंबई आणि ठाणे या महानगरपालिकांमध्ये रविवारी कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. सध्या मुंबईत कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ७.६५ लाख असून एकूण १६,३५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ओमायक्रॉनचे रुग्ण

दरम्यान महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे ९ तर कोरोनाचे ६ हजार ४४१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आढळलेल्या ओमायक्रॉनच्या १८ रुग्णांपैकी ९ जण बरे झाले. महाराष्ट्रात झालेल्या ६ कोटी ६८ लाख ७५ हजार ९७५ कोरोना चाचण्यांपैकी ६६ लाख ४३ हजार ८८३ पॉझिटिव्ह आल्या. राज्यात आढळलेल्या ६६ लाख ४३ हजार ८८३ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ९२ हजार ५०४ जण बरे झाले. कोरोनामुळे राज्यात १ लाख ४१ हजार २५९ मृत्यू झाले. तसेच ३६७९ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाला. राज्यात दिवसभरात ७०४ नव्या कोरोना रुग्णांची आणि १६ मृत्यूची नोंद झाली. तसेच ६९९ कोरोना रुग्ण बरे झाले. महाराष्ट्राचा कोरोना मृत्यू दर २.१२ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट ९.९३ टक्के, रिकव्हरी रेट ९७.७२ टक्के आहे. महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे ९ तर कोरोनाचे ६ हजार ४४१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनामुळे राज्यात १ लाख ४१ हजार २५९ मृत्यू झाले. तसेच ३६७९ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी