टीव्ही क्वीन नावाने प्रसिद्ध एकता कपूरने लग्न का केले नाही, याची मनोरंजक कहाणी

बी टाऊन
विजय तावडे
Updated Jun 07, 2021 | 22:32 IST

टीव्ही मालिकांच्या जमान्यात टीव्हीवर राज्य करणारी आणि टीव्ही मालिकांची साम्राज्ञी बनलेली, टीव्ही क्वीन (TV Queen)नावाने प्रसिद्ध झालेली एकता कपूरचा (Ekta Kapoor) आज ४६वा वाढदिवस आहे.

Birthday of Ekta Kapoor
एकता कपूरचा वाढदिवस 

थोडं पण कामाचं

  • स्वत:बरोबरच टीव्ही कलाकारांना दिली ओळख
  • बॉलीवूडमध्ये कमावले यश
  • वडिलांच्या इच्छेमुळे वळले करियरकडे मात्र लग्न करायचे राहून गेले

मुंबई : टीव्ही मालिकांच्या जमान्यात टीव्हीवर राज्य करणारी आणि टीव्ही मालिकांची साम्राज्ञी बनलेली, टीव्ही क्वीन (TV Queen)नावाने प्रसिद्ध झालेली एकता कपूरचा (Ekta Kapoor) आज ४६वा वाढदिवस (Ekta Kapoor's 46th birthday)आहे. जितेंद्र (Jitendra) आणि शोभा कपूरच्या (Shobha Kapoor) या मुलीने छोट्या पडद्यापासून (TV) ते बॉलीवूडपर्यत (Bollywood) आपले झेंडे गाडले आहेत. पुरुषांच्या मक्तेदारीच्या या क्षेत्रात एकता कपूरने अक्षरश: दादागिरी केली आहे. ती एक यशस्वी, दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माती आहे. बालाजी टेलिफिल्म्स (Balaji Telefilms) हे नाव आज घरोघरात पोचले आहे. शोभा कपूर यांची ती लाडकी आहे. एकता आणि शोभा कपूर या बालाजी टेलिफिल्म्सच्या भागीदार आहेत. आपले वडील आणि प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र यांच्याकडून आर्थिक मदत घेऊन एकताने टीव्ही मालिकांची निर्मिती सुरू केली होती. फक्त १९ व्या वर्षीच एकताने या झगमगत्या दुनियेतील आपले करियर सुरू केले होते. एकता कपूरच्या या प्रवासाविषयी जाणून घेऊया. (Today TV Queen, Ekta Kapoor celebrating her 46th birthday, know how Ekta achieved success)

टीव्ही कलाकारांना दिली ओळख


एकता कपूरने टीव्ही मालिकांची निर्मिती करून फक्त स्वत:च यश कमावले नाही तर तिने असंख्य कलाकारांना या चंदेरी दुनियेत स्वत:चे स्थान मिळवून दिले. तिला अनेक कलाकारांची गॉड मदर देखील म्हटले जाते. विद्या बालन पासून सुशांत सिंह राजपूतपर्यत अनेक प्रसिद्ध कलाकारांना एकता कपूरनेच पहिली संधी दिली होती. तिच्या मालिकांमधून काम केलेले कलाकार आज बॉलीवूडमध्ये नाव कमावत आहेत. इतकेच नाही तर टीव्हीच्या दुनियेतील सर्वात महागड्या स्टारपैकी एक असलेल्या राम कपूरलादेखील नावलौकिक एकता कपूरच्याच मालिकेतून मिळाला होता. 

बॉलीवूडमध्ये कमावले यश


एकता कपूर आपली आई शोभा कपूरसह आपला सगळा व्यवसाय सांभाळते. आतापर्यतने एकता कपूर तब्बल ४० मालिकांची निर्मिती केली आहे. याशिवाय एकता कपूर चित्रपटांच्या निर्मितीतदेखील आहे. 'क्योंकि मैं झूठ नहीं बोलता' या चित्रपटाने तिने बॉलीवूडमध्ये पाय ठेवला होता. यानंतर तिने स्वत:देखील अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. एकता कपूरच्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये शूटआउट अॅट लोखंडवाला, लव्ह सेक्स और धोखा, वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई, द डर्टी पिक्चर, रागिनी एमएमएस, शोर इन द सिटी, क्या कूल है हम या चित्रपटांचा समावेश आहे. एकता कपूरने आपला भाऊ आणि अभिनेता 'तुषार कपूरला' घेऊन अनेक चित्रपट बनवले आहे. अर्थातच तुषारपेक्षा एकतानेच बॉलीवूडमध्ये अधिक नावलौकिक मिळवला आहे.

अनेक पुरस्कारांनी सन्मानित


एकता कपूरच्या शोमध्ये किंवा चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स मोठ्या प्रमाणात असतात. मात्र त्याला प्रेक्षकांची पसंतीदेखील मिळते आहे. तिच्या मालिका आणि त्यातील कलाकार घरोघर पोचल्या आहेत. एशिया वीक मासिकात एकता कपूरला आशियातील सर्वाधिक शक्तिशाली कम्युनिकेटर्सचा सन्मानदेखील मिळाला आहे. एकता कपूरला भारतीय टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार, इंडियन टेली अॅवार्ड्स, एशियाई टेलिव्हिजन अॅवार्ड यासारखे पुरस्कारदेखील मिळाले आहेत.

वडिलांच्या इच्छेमुळे वळले करियरकडे मात्र लग्न करायचे राहून गेले


प्रोफेशनल आयुष्यात यश मिळवलेल्या एकताने अद्याप लग्न मात्र केलेले नाही. यासंदर्भात बोलताना एकताने एकदा सांगितले होती वडीलांची एक अट होती, त्यामुळेच तिन अद्याप लग्न केलेले नाही. नाहीतर तिने २२व्या वर्षीच लग्न केले असते आणि गृहिणी बनली असती. एकताचे म्हणणे होते की जेव्ही ती १७ वर्षांची होती तेव्हा तिच्या वडीलांनी म्हणजेच अभिनेता जितेंद्र यांनी सांगितले की एकतर तू लग्न कर नाहीतर पार्ट्या करण्याऐवजी काम कर. माझीही हीच इच्छा आहे की तू करियर करावे. जितेंद्रने एकताला सांगितले की ते तिला पॉकिटमनी व्यतिरिक्त अधिक काही देणार नाहीत. त्यामुळेच पैसे कमावण्यासाठी मी एका जाहिरात एजन्सीमध्ये काम करण्यास सुरूवात केली. पुढे एकता म्हणते की जी परिस्थिती होती ती पाहून मला छान वाटत होते. मला वाटायचे की माझे आयुष्य ठीकठाक असेल. मी लवकरच लग्नही करेन आणि आयुष्य मजेत जगेन. मात्र नशीबाचा खेळ काही वेगळाच असतो. मी हम पांच नावाची मालिका सुरू केली आणि झी टीव्हीला ती मालिका विकली. जेव्हा माझी मालिका टीव्हीवर आली तेव्हा मी फक्त १९ वर्षांची होती. मालिका हिट झाली आणि माझा मार्गच बदलला. एकता कपूर २०१९मध्ये सरोगसीद्वारे आई झाली होती. एकता कपूरने आपल्या वडीलांच्या नावाने आपल्या मुलाचे नाव रवी कपूर ठेवले. (जितेंद्र यांचे खरे नाव रवी कपूर आहे.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी