Bollywood Top actress : भावासोबत झोपाळ्यावर बसलेली 'ही' चिमुरडी आहे बॉलिवूडची सुपरस्टार, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री?

बी टाऊन
Updated Jul 25, 2022 | 16:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bollywood Top actress : ही मुलगी आजच्या तारखेत बॉलीवूडची नंबर 1 अभिनेत्री आहे. इतकेच नाही तर तिला बॉलीवूडची राणी ही पदवीदेखील तिला मिळाली आहे. तुम्ही सांगू शकता ही मुलगी कोण आहे?

Bollywood Top actress with his brother
अभिनेत्री राणी मुखर्जीचा बालपणीचा फोटो व्हायरल  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अभिनेत्री राणी मुखर्जीचा बालपणीचा फोटो व्हायरल
  • राणी मुखर्जीचा भावासोबत बालपणीचा फोटो व्हायरल
  • बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री राणी मुखर्जी

Bollywood Top actress with his brother : बॉलिवूड सेलिब्रिटींचे ( Bollywood celebrity ) असे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यांना ओळखण्याचे आव्हान केले जात आहे. बरेचसे फोटो बॉलिवूड सेलिब्रिटींच्या बालपणीचे आहेत, ज्यांना ओळखणे चाहत्यांसाठी एक टास्क आहे. पुन्हा एकदा एका अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो ( Childhood photo ) इंटरनेटवर समोर आला आहे, त्या अभिनेत्रीला ओळखण्याचा चाहते प्रयत्न करत आहेत. या फोटोमध्ये एक लहान मुलगी आपल्या भावासोबत झोपाळ्यावर बसलेली दिसत आहे. ही मुलगी आजच्या तारखेत बॉलीवूडची नंबर 1 अभिनेत्री आहे. कोण आहे ही अभिनेत्री (Actress ) तुम्ही ओळखू शकता का? ( Bollywood Top actress Rani Mukherjee childhood photo goes viral on social media )

Happy Birthday, Rani Mukerji: Here are 6 rare childhood pictures of the 'Mardaani' actress | Hindi Movie News - Times of India


ही दुसरी तिसरी कोणी नसून बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी ( Rani Mukharji ) आहे आणि तिच्यासोबत दिसणारा मुलगा तिचा भाऊ आहे. राणीच्या भावाचे नाव राजा मुखर्जी आहे. राणी मुखर्जीचे नाव फिल्म इंडस्ट्रीतील अशा अभिनेत्रींमध्ये सामील आहे, ज्या आपल्या अभिनयासोबतच आपल्या क्यूटनेससाठीही प्रसिद्ध आहेत. राणीला फक्त इंडस्ट्रीची राणी म्हटले जात नाही. राणीने तिच्या फिल्मी करिअरमध्ये एकापेक्षा एक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे, ज्यामुळे तिला सुपरस्टारचा दर्जा मिळाला आहे. आजही राणीच्या दमदार आवाजाने आणि तिच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालते

अधिक वाचा : या फोटोमधील शोधून दाखवा रीमोट, ते ही १५ सेकंदात

Happy Birthday, Rani Mukerji: Here are 6 rare childhood pictures of the 'Mardaani' actress | Hindi Movie News - Times of India

दरम्यान, राणी मुखर्जीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती शरारा सूट परिधान केलेल्या पापाराझींना भेटताना दिसत आहे. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर राणी मुखर्जीने आदित्य चोप्राशी ( Aaditya chopra ) लग्न केले आहे. आदित्य आणि राणीला आदिरा (Aadira chopra ) नावाची मुलगी देखील आहे.  राणी मुखर्जीने एकाहून एक सरस हीट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. हम-तुम, कुछ कुछ होता है, चलते चलते, साथिया अशा अनेक हीट सिनेमांमध्ये राणीने अभिनय केलेला आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडच्या सुपरस्टार्ससोबत राणीने सिल्व्हर स्क्रीन शेअर केलेली आहे. शाहरुख खान, सलमान खान, आमीर खान, सैफ अली खान यांच्यासोबतचे राणीचे चित्रपट प्रेक्षकांनाही चांगलेच भावले होते. राणी मुखर्जी अखेरची बंटी और बबली २ मध्ये दिसली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी