Salman Khan Wedding: या २१ वर्षींय अभिनेत्रीला सलमानसोबत करायचंय लग्न, व्यक्त केली इच्छा

बी टाऊन
Updated Aug 18, 2019 | 16:21 IST | टाइम्स नाऊ मराठी

सलमान खानच्या लग्नाच्या अफवा सतत येत असतात. अशा परिस्थितीत एका बॉलिवूड अभिनेत्रीनं स्वत:च सलमान खानशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. या अभिनेत्रीचं सलमानशी खास नातं आहे. ही अभिनेत्री कतरिना कैफसारखी दिसते.

salman khan wedding
सलमान खान  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • महिला चाहत्यांमध्ये सलमान खान खूप लोकप्रिय
  • बॉलिवूड अभिनेत्री झरीन खानला सलमान खानशी लग्न करण्याची इच्छा
  • कतरिना कैफसारखी दिसते झरीन खान

मुंबई : बॉलिवूडचा दबंग अर्थात सलमान खानचं जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. इतकंच नाही तर सलमान खान महिला चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. त्यांना सलमान खानच्या लूकसह त्याचा अभिनय देखील आवडतो. सलमान खानला त्याची आणखी एक फॅन सापडली असून ती स्वत: बॉलिवूड अभिनेत्री आहे. ही अभिनेत्री इतर कोणी नसून सलमान खानबरोबर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी झरीन खान आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
? Make up - @nikki_rajani Hair - @manojchavan61 Managed by - @ronitasharmarekhi #WeekendVibes #ZareenKhan A post shared by Zareen Khan ??✨?? (@zareenkhan) on

 

झरीनने एका मुलाखतीत सलमान खानसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पिंकविलामध्ये झालेल्या मुलाखतीत जरीनला विचारण्यात आलं की, तिला स्वत: बद्दल अफवा उठवायची असेल तर ती काय अफवा असेल. तेव्हा तिनं सलमान खानशी लग्न करण्याची इच्छा आहे, असं सांगितलं. यावर झरीननं तिच्या आणि सलमानच्या लग्नाची अफवा बाहेर आली पाहिजे आणि सलमान खान माझ्याशी लग्न करत असल्याची एक मजेशीर अफवा आली तर मला आनंद होईल. 

 


सलमान खाननं झरीनला बॉलिवूडमध्ये लाँच केलं असून त्याच्या ‘वीर’ या सिनेमातून तिनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. सलमाननं स्वत: झरीनला बॉलिवूडमध्ये आणलं होते, त्यामुळे या दोघांमध्ये खास कनेक्शन सुद्धा आहे. झरीन फिटनेस फ्रीक असल्यानं सलमाननं तिला फिटनेस प्रशिक्षणातही खूप मदत केली होती. 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
Ramadan Mubarak to all ?? #DuaMeinYaadRakhna #ZareenKhan A post shared by Zareen Khan ??✨?? (@zareenkhan) on


कतरिना कैफसारखी दिसते म्हणून झरीनला ‘वीर’ सिनेमा मिळाला होता. अशी अफवा पसरली की कतरिनासोबतच्या ब्रेकअपनंतर सलमाननं झरीनला डेट केलं. ‘रेडी’, ‘हाऊसफुल २’ आणि ‘हेट स्टोरी ३’ या सिनेमांमध्येही तिनं भूमिका साकारली आहे. झरीन खानच्या आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर ती सध्या तिच्या पंजाबी सिनेमा 'डाका' च्या तयारीत व्यस्त आहे. या सिनेमात तिच्यासोबत गिप्पी ग्रेवाल मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा १ नोव्हेंबरला रिलीज होईल. या सिनेमाचे दिग्दर्शन बलजितसिंग देव यांनी केलं आहे. त्याचबरोबर टी-सीरिजचे मालक भूषण कुमार, कृष्णा कुमार, गिप्पी ग्रेवाल आणि रवनीत कौर ग्रेवाल या सिनेमाचे निर्माते आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी