Janhvi Kapoor South Debut: बॉलिवूडची 'धडक गर्ल' साऊथमध्ये डेब्यू करणार ! Jr NTR असणार हिरो

बी टाऊन
Updated Jan 28, 2022 | 17:35 IST | टाइम्स नाऊ मराठी

Janhvi Kapoor Movies: जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) लवकरच साऊथ फिल्म इंडस्ट्रीत डेब्यू करणार आहे. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Bollywood's 'Dhadak Girl' to debut in South! Jr NTR will be the hero
जान्हवी कपूरची दाक्षिणात्य चित्रपटात 'धडक'  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जान्हवी कपूरचा साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू
  • ज्युनियर एनटीआरसोबत सिल्व्हर स्क्रीन शेअर करणार असल्याची चर्चा आहे.
  • धडक सिनेमातून जान्हवी कपूरची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

Janhvi Kapoor South Film Industry Debut :  साऊथ सुपरस्टार RRR या चित्रपटामुळे (RRR Movie) सतत चर्चेत आहे. अलीकडेच बातम्या आल्या आहेत की ज्युनियर एनटीआर (Jr NTR) चित्रपट दिग्दर्शक बुची बाबूसोबत  (Buchi Babu) त्याच्या पुढच्या चित्रपटात काम करणार आहे. ज्युनियर एनटीआर (Jr NTR New Movie) च्या पुढील चित्रपटाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, परंतु साउथ सुपरस्टारच्या चित्रपटाबाबत चर्चा नक्कीच सुरू झाली आहे. अशी चर्चा आहे की ज्युनियर एनटीआर न्यू मूव्हीज सोबत (Jr NTR New Movies) हिरोईन म्हणून बॉलिवूडची धडक गर्ल म्हणजेच जान्हवी कपूर  (Janhvi Kapoor) असेल.

Did you know how much Jr NTR was paid for his debut film ''Ninnu Choodalani''? | Telugu Movie News - Times of India

रिपोर्ट्सनुसार, ज्युनियर एनटीआर (Jr NTR) आणखी एका पॅन इंडिया चित्रपटाची तयारी करत आहे. RRR रिलीज (RRR Release)होण्याआधीची लोकप्रियता पाहून साऊथ सुपरस्टारने आणखी एक मोठा पॅन इंडिया चित्रपट बनवण्याची तयारी सुरू केली आहे. अशा परिस्थितीत निर्मात्यांना चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्रीची एंट्री हवी आहे.

मेकर्सला जान्हवी कपूरला ज्युनियर एनटीआर मूव्हीच्या  (Jr NTR Movie) नवीन चित्रपटात कास्ट करायचे आहे. चित्रपटाच्या संकल्पनेनुसार निर्माते जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) त्या भूमिकेत फिट बसत आहे. मात्र, अद्याप जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) चित्रपटासाठी होकार दिला आहे की नाही याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.


ज्युनियर एनटीआरला (Jr NTR) आरआरआरच्या यशाबद्दल आत्मविश्वास आहे, म्हणूनच त्याने पुढील चित्रपटाची तयारी देखील सुरू केली आहे. जान्हवी कपूरच्या  (Janhvi Kapoor) वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्रीने धडक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. जान्हवी कपूर (Janhvi Kapoor New Movies) ने अलीकडेच मिली नावाच्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. इतकंच नाही तर अभिनेत्रीच्या बकेटमध्ये दोस्ताना 2, गुड लक जेरी, मिस्टर आणि मिसेस सारखे चित्रपट आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी