Shahrukh Khan and Salman Khan: शाहरुख खान आणि सलमान खान यांची जोडी जेव्हाही सिल्व्हर स्क्रीनवर आली तेव्हा ती जबरदस्त हिट ठरली. मग ते करण-अर्जुन असो की आणखी काही. याशिवाय अनेकवेळा शाहरुखने सलमानच्या चित्रपटात तर सलमानने शाहरुखच्या चित्रपटात कॅमिओ केला आहे. पण आता दोघे एका पॉवर पॅक्ड अॅक्शन चित्रपटात एकत्र दिसणार असल्याची बातमी आहे, ज्याची तयारी आदित्य चोप्राने सुरू केली आहे.
अधिक वाचा : आधार कार्ड किती दिवसांसाठी व्हॅलिड असते?
सलमान खान म्हणजे बॉलीवूडचा दबंग, बॉलिवूडचा टायगर या सिनेमात रॉ एजंट बनलेल्या सलमानचा हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. त्यावर 'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है' असे दोन चित्रपट रिलीज झाले असून आता तिसरा रिलीजसाठी सज्ज आहे. दुसरीकडे शाहरुख खानबद्दल बोलायचे झाले तर, त्याने याआधी अॅक्शन कॅरेक्टर साकारले आहे, पण पठाणमुळे तो खूप चर्चेत आहे. या चित्रपटात तो पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा लूक पाहून तो यावेळी फुल अॅक्शन दाखवणार असल्याचे दिसते. आता बॉलीवूडच्या या दोन प्रसिद्ध अभिनेत्यांसाठी एक खास स्क्रिप्ट आणि कथा तयार करण्यात येत असल्याची माहिती आहे. ज्यासाठी दोन्ही स्टार्सनीही संमती दिली आहे.
मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर आदित्य चोप्रा सध्या चित्रपटाच्या स्क्रिप्टिंग आणि संवादांवर विशेष काम करत आहे. त्याचबरोबर दोन्ही स्टार्स एकत्र येण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. या सिनेमाची संपूर्ण तयारी 2023 च्या अखेरीस होऊ शकतो, त्यानंतर त्याचे शूटिंग सुरू होईल. दोघांनीही त्यावेळी चित्रपटाला वेळ देता यावा म्हणून या दोन्ही सुपरस्टार्सनी चित्रपटाच्या तारखाही राखून ठेवल्या असल्याचे बोलले जात आहे. सध्या सलमान खान ईद कभी दिवाली, टायगर 3 चित्रपटाच्या शूटिंगमुळे चर्चेत आहे तर शाहरुख खान डंकी, जवान आणि पठाण या सिनेमांमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे.
अधिक वाचा : 'त्या' घटनेमुळे मुख्यमंत्री शिंदेंना सभागृहात अश्रू अनावर
मात्र, ही बातमी ऐकल्यानंतर या दोघांचे चाहते दोघांनाही एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत. याआधी करण-अर्जुन, हम तुम्हारे है सनम या सिनेमांमध्ये दोघांनीही एकत्र भूमिका साकारली होती. त्यानंतर या दोघांमध्ये वाद झाले आणि त्यानंतर एकाही फंक्शनमध्ये, अवॉर्ड सेरेमनीला हे दोघे एकत्र दिसले नाहीत. मात्र, अखेर आता पुन्हा 27 वर्षांनंतर ही बॉलिवूडचा दबंग खान आणि किंग खान एकत्र सिनेमात दिसणार आहेत. आदित्य चोप्रा ही किमया घडवून आणणार असल्याचं म्हटलं जात आहे.