Bollywood New Badshah : बॉलिवूडचा नवा 'बादशाह', 2000 कोटींची कमाई करत किंग खानला मागे टाकणार !

बी टाऊन
Updated Dec 30, 2021 | 18:58 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bollywood New Badshah : जगभरातील या महामारीच्या काळात आता बॉलीवूडने पुन्हा एकदा वेग पकडला आहे. या वर्षी एकापाठोपाठ एक अनेक चित्रपट रिलीज झाले आहेत, त्यापैकी काही ओटीटी तर काहींनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. यातूनच बॉलिवूडला एक नवा सुपरस्टार किंवा बादशाह मिळाला आहे असं म्हणायला काय हरकत आहे.

Bollywood's new 'king' Akshay Kumar
2022 मध्ये बॉक्स ऑफिस गाजवणार अक्षय कुमारचे सिनेमा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अक्षय कुमारचा अतरंगी रे हा चित्रपट २४ डिसेंबरला रिलीज झाला
  • अक्षयकडे अनेक मोठे प्रोजेक्ट्स आहेत
  • अक्षय कुमार सध्या ट्विंकलसोबत मालदीवमध्ये आहे

Bollywood New Badshah Akshay kumar : नवी दिल्ली:  जगभरातील या महामारीच्या काळात आता बॉलीवूडने पुन्हा एकदा वेग पकडला आहे. या वर्षी एकापाठोपाठ एक अनेक चित्रपट रिलीज झाले आहेत, त्यापैकी काही ओटीटी तर काहींनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. यातूनच बॉलिवूडला एक नवा सुपरस्टार किंवा बादशाह मिळाला आहे असं म्हणायला काय हरकत आहे. सलमान खान (Salman Khan)आणि शाहरुख खाननंतर  (Shah Rukh Khan)बॉलिवूडला नवा सुपरस्टार किंवा बादशाह मिळाला आहे. आम्ही बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar)  बद्दल बोलत आहोत, ज्याचे या वर्षी एकामागून एक 3 सिनेमा रिलीज झाले आणि 
तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिस आणि ओटीटीवर धुमाकूळ घातला. 

अक्षय कुमार (Akshay Kumar) हा पहिला अभिनेता होता जो कोरोनाचा पहिला लॉकडाऊन उघडल्यानंतरच चित्रपटाच्या शूटिंगवर गेला. बेल बॉटम या चित्रपटाच्या शूटिंगसाठी तो परदेशी रवाना झाला होता. हा चित्रपट यावर्षी 19 ऑगस्ट रोजी रिलीज झाला, ज्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या सिनेमात अक्षयची जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळत आहे.


यानंतर अक्षय कुमार आणि कतरिना कैफचा  'सूर्यवंशी' हा सिनेमा 5 नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज झाला. हा सिनेमा 2020 मध्ये रिलीज होणार होता पण कोरोनामुळे त्याची रिलीज डेट अनेक वेळा बदलण्यात आली. रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि सिनेमाने 200 कोटींचा टप्पा सहज पार केला. हा चित्रपट नंतर नेटफ्लिक्सवरही रिलीज झाला. इथेही या सिनेमाने चांगली कमाई केली. सूर्यवंशीमध्ये रणवीर सिंग आणि अजय देवगण देखील कॅमिओ करताना दिसले होते.


वर्षाच्या शेवटी, 24 डिसेंबर रोजी अक्षय कुमारचा 'अतरंगी रे' चित्रपट रिलीज झाला, ज्याने डिस्ने प्लस हॉटस्टारवर एका दिवसात सर्वाधिक प्रेक्षकांचा अनोखा विक्रम केला. या सिनेमातील अक्षय कुमारची व्यक्तिरेखा धनुष आणि सारा अली खान यांच्यापेक्षा कमी असली तर प्रेक्षकांनी अक्षयच्या भूमिकेचेही तेवढेच कौतुक केले.


अक्षय कुमारने येत्या वर्षासाठी अनेक चित्रपट साइन केले आहेत, ज्यापैकी काही चित्रपटांच्या रिलीजच्या तारखा आधीच जाहीर केल्या आहेत. अक्षयचा 'पृथ्वीराज' (Prithviraj) हा सिनेमा प्रजासत्ताक दिनी, बच्चन पांडे (Bachchan Pandey) होळीला, 'रक्षाबंधन' स्वातंत्र्यदिनी आणि राम सेतू दिवाळीला रिलीज होणार आहे. याशिवाय असे अनेक चित्रपट आहेत ज्यांचे शूटिंग सुरू झाले आहे, परंतु चित्रपटांच्या रिलीजची तारीख समोर आलेली नाही.आनंद एल राय निर्मित गोरखा सिनेमातही अक्षय दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार, पुढील वर्षी अक्षय कुमारचे चित्रपट 2000 हजार कोटींची कमाई करणार आहेत. आता अक्षय कुमारचे हे चित्रपट खरंच 2000 कोटी कमवतात की नाही हे येणारा काळच सांगेल, मात्र बॉलीवूडला आणखी एक सुपरस्टार मिळाला आहे, त्याचे नाव अक्षय कुमार, असं म्हणायला हरकत नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी