बॉलिवूड अभिनेता अरमान कोहलीला जामीन

Bombay High Court has granted bail to actor Armaan Kohli, accused in a drugs case under NDPS Act : ड्रग केसमध्ये एक वर्ष न्यायालयीन कोठडीत काढल्यानंतर बॉलिवूड अभिनेता अरमान कोहलीला जामीन मिळाला.

Bombay High Court has granted bail to actor Armaan Kohli, accused in a drugs case under NDPS Act
बॉलिवूड अभिनेता अरमान कोहलीला जामीन  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • बॉलिवूड अभिनेता अरमान कोहलीला जामीन
  • ड्रग केसमध्ये एक वर्ष न्यायालयीन कोठडीत काढल्यानंतर जामीन
  • अरमान कोहलीच्या घरातून कोकेन जप्त केले होते

Bombay High Court has granted bail to actor Armaan Kohli, accused in a drugs case under NDPS Act : ड्रग केसमध्ये एक वर्ष न्यायालयीन कोठडीत काढल्यानंतर बॉलिवूड अभिनेता अरमान कोहलीला जामीन मिळाला. मुंबईच्या उच्च न्यायालयाने अरमान कोहलीला जामीन दिला. अरमान कोहलीला मागच्या वर्षी 28 ऑगस्ट रोजी (28 ऑगस्ट 2021) 1.2 ग्रॅम कोकेनसह अटक करण्यात आली होती. या प्रकरणात ईसी अँड एनडीपीएस (Essential Commodities and Narcotic Drugs and Psychotropic Substances Court - NDPS Court) कोर्टाने वारंवार जामीन फेटाळल्यामुळे अरमान कोहली जवळपास एक वर्ष न्यायालयीन कोठडीत होता. अखेर मुंबईच्या उच्च न्यायालयाने अरमान कोहलीला एक लाख रुपयांचा बाँड भरून देण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला.

सेलिब्रेटींचा कार्गो प्रिंटमधील हॉट लूक

सेलिब्रेटींना आवडणारे दागिने

एनसीबीने धाड टाकून अरमान कोहलीच्या घरातून कोकेन जप्त केले होते. यानंतर एनसीबीने (Narcotics Control Bureau - NCB) अरमान कोहलीला अटक केले. अरमान विरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. 

कोरोना काळातले भन्नाट जुगाड

विषारी झाडाचे विषारी फळ

याआधी अरमान कोहलीला बिग बॉस 7 शो दरम्यान अटक करण्यात आली होती. सोफिया हयानेने अरमानवर मॉपने (Mop) मारहाण केल्याचा आरोप केला होता. यानंतर लोणावळा शहर पोलिसांनी लैंगिक शोषण आणि शारीरिक छळ प्रकरणात कायदेशीर कारवाई सुरू केली. अरमान कोहलीला अटक करण्यात आली. पोलिसांनी अरमानला बिग बॉसच्या घरातून अटक केली होती. या प्रकरणात काही दिवसांनी अरमानला जामीन मिळाला होता. पण हे प्रकरण त्यावेळी चर्चेत होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी