#BoycottBrahmastra: करीना कपूरनंतर 'या' अभिनेत्रीनेही केली तीच चूक, ट्विटरवर बॉयकॉट 'ब्रह्मास्त्र'ट्रेंड

बी टाऊन
Updated Aug 23, 2022 | 22:23 IST | टाइम्स नाऊ मराठी

Alia Bhatt: सध्या बॉलिवूडमध्ये बॉयकॉट ट्रेंड होत आहे. लाल सिंग चड्ढा, रक्षाबंधननंतर आणखी एका बॉलिवूड सिनेमाला बॉयकॉट करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.सोशल मीडियावर आलिया भट्ट (Alia Bhat )आणि रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. हा चित्रपट पुन्हा एकदा वादात सापडला आहे.

boycott Brahmstra trending on social media
ट्विटरवर बॉयकॉट'ब्रह्मास्त्र'ट्रेंड  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ब्रह्मास्त्र सिनेमावर बहिष्कार टाकण्याची मागणी
  • आपल्या वक्तव्यामुळे आलिया भट्ट ट्रोल
  • सप्टेंबर महिन्यात ब्रह्मास्त्र रिलीज होणार आहे

#BoycottBrahmastra: आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) लवकरच अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) या बिग बजेट चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट ९ सप्टेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. मात्र हा मल्टीस्टारर चित्रपट पुन्हा एकदा वादात सापडला आहे. अर्थात त्याचं कारणही तसंच आहे, अलीकडेच चित्रपटाची मुख्य अभिनेत्री आलिया भट्टने  (Alia Bhatt) तिच्या मुलाखतीत अशी काही वक्तव्ये केली की ,त्यानंतर ट्विटरवर बॉयकॉट 'ब्रह्मास्त्र' (#BoycottBrahmastra) ट्रेंड होत आहे. ( Boycott Brahmstra trending on social media )

अधिक वाचा : VIDEO: विधानभवनात येताच उद्धव ठाकरेंचं मोठं विधान


आलियाच्या वक्तव्यावर संतापले प्रेक्षक

आलिया भट्ट अलीकडेच तिच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान म्हणाली- 'जर तुम्हाला मी आवडत नसेल तर माझे चित्रपट पाहू नका. यात मी काहीही करू शकत नाही.
लोकांना काही ना काही म्हणायचेच असते. त्याचवेळी आलियाला तिच्या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला असल्याचे सांगावे लागले.

आलिया भट्ट ट्रोल झाली. 

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट सप्टेंबरमध्ये रिलीज होत आहे. आलियाच्या आधी करीना कपूर खाननेही एका मुलाखतीत म्हटलं होतं की- 'तुम्ही आमचे चित्रपट का पाहता?' त्याचवेळी आमिर खान आणि करीना कपूरचा 'लाल सिंह चड्ढा' या नुकत्याच रिलीज झालेल्या चित्रपटालाही बहिष्काराला सामोरे जावे लागले होते.त्याचा परिणाम चित्रपटाच्या कमाईवर स्पष्टपणे दिसून आला. आता आलियाच्या या शब्दाचा तिच्या चित्रपटाच्या कलेक्शनवर किती परिणाम होतो, हे पुढच्या महिन्याच्या ९ तारखेला कळेल.

अधिक वाचा : 'Sonali Phogat च्या जेवणात होते विष', बहिणीचा धक्कादायक आरोप


ब्रह्मास्त्रावर बहिष्कार घालण्याची चर्चा यापूर्वीही झाली होती

आता आलिया भट्टच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोल केले जात आहे. नेटिझन्स मीम्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून 'ब्रह्मास्त्र'वर बहिष्कार टाकण्याची मागणी सातत्याने करत आहेत. चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी याआधीच करण्यात आली होती, खरं तर चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक दृश्य होते ज्यामध्ये रणबीर कपूर शूज घालून पूजास्थळी प्रवेश करतो. लोकांना हे दृश्य आवडले नाही. मात्र, चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जी यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. चित्रपटाची रिलीज डेट जवळ येत आहे. याला बॉक्स ऑफिसवर कसा प्रतिसाद मिळतो हे लवकरच कळेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी