Brahmastra got superpower : बाहुबलीशी टक्कर देण्यासाठी ब्रह्मास्त्र सज्ज, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण

बी टाऊन
Updated Dec 19, 2021 | 16:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

Brahmastra got superpower from Rajamouli: बहुप्रतिक्षित 'ब्रह्मास्त्र' या सिनेमाला आता 'बाहुबली'चे निर्माते एसएस राजामौली यांचा पाठिंबा मिळाला आहे. त्यानंतर या सिनेमाकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

Brahmastra got superpower from Rajamouli, will be released in 4 south indian languages,
ब्रह्मास्त्रसोबत राजामौली, 4 दक्षिणी भाषांमध्ये रिलीज होणार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ब्रह्मास्त्रला राजामौली यांची साथ मिळाली
  • साऊथमधील ४ भाषांमध्ये ब्रह्मास्त्र रिलीज होणार
  • आता 'बाहुबली'ला मात देणार का ब्रह्मास्त्र?

Brahmastra got superpower from Rajamouli: नवी दिल्ली: प्रसिद्ध चित्रपट निर्माते एसएस राजामौली. बाहुबली सिनेमाचे निर्माते राजामौली. आता हे नाव बॉलिवूडच्या रणबीर-आलिया स्टारर 'ब्रह्मास्त्र'सोबतही जोडले गेले आहे. कारण आता राजामौली स्वत: अयान मुखर्जीचा बिग बजेट, मोस्ट अवेटेड सिनेमा  'ब्रह्मास्त्र'ला (Brahmastra) साउथच्या भाषांमध्ये सादर करणार आहेत. हा चित्रपट तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम या चार भाषांमध्ये सादर होणार आहे


करण जोहरने राजामौलींना पाठिंबा दिला

याआधी करण जोहरने राजामौलीचा 'बाहुबली' देशभरात सादर केला होता. त्याचीच जाणीव ठेवत आता 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) हा चित्रपट दक्षिणेतील भाषांमध्ये आणण्याची इच्छा राजामौली यांनी व्यक्त केली. आणि त्यांनी हे काम स्वत:च्या हातात घेतले आहे. दक्षिणेतील प्रत्येक चाहत्यापर्यंत हा चित्रपट पोहोचवण्याची जबाबदारी राजामौली यांनी उचलली आहे.


'ब्रह्मास्त्र' मला 'बाहुबली'ची आठवण करून देतो

राजामौली म्हणाले, "ब्रह्मास्त्र' (Brahmastra) जगभरातील प्रेक्षकांसमोर चार दक्षिणी भाषांमध्ये सादर करताना मला खूप आनंद होत आहे. 'ब्रह्मास्त्र'ची (Brahmastra) कथा चांगली आहे, जी तिच्या कथेतून आणि सादरीकरणातून स्पष्टपणे दिसते. अनेक प्रकारे, हा सिनेमा मला 'बाहुबली' ची आठवण करून देते, ज्यामध्ये प्रेम आणि उत्कटतेचे कठोर परिश्रम आहेत. अयानला 'ब्रह्मास्त्र' बनवण्यासाठी वेळ घेताना मी पाहिले आहे. 'बाहुबली'साठी मी तेच केलं होतं.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Karan Johar (@karanjohar)


मॉडर्न आणि प्राचीनचा मिलाप

ते पुढे म्हणाले, 'हा चित्रपट आधुनिक तंत्रज्ञानासह प्राचीन भारतीय संस्कृतीच्या थीमशी पूर्णपणे जुळतो. ' नागार्जुन अक्किनेनी म्हणाले, 'अयान आणि 'ब्रह्मास्त्र'च्या अत्यंत प्रतिभावान टीमसोबत काम करण्याचा अनुभव खूप छान होता. ते म्हणाले, 'प्राचीन आणि आधुनिक भारताच्या या मिलापाने मला भुरळ घातली. आम्ही 2022 मध्ये हा चित्रपट सादर करण्यास उत्सुक आहोत.

पुढच्या वर्षी रिलीज होईल

'ब्रह्मास्त्र'चे (Brahmastra) दिग्दर्शक अयान मुखर्जी म्हणाले, 'ब्रह्मास्त्र' हे एक स्वप्न आहे जे मी अनेक वर्षांपासून जपले होते. यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. हे मला नेहमी लक्षात राहील. 2022 च्या बहुप्रतिक्षित सिनेमांपैकी एक, 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra)  9 सप्टेंबर 2022 रोजी जगभरात रिलीज होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी