Brahmastra Part 2: ब्रह्मास्त्रच्या यशाची शक्ती पाहून दिग्दर्शक लवकरच रिलीज करणार Brahmastra 2, अयान मुखर्जीने केलं जाहीर

बी टाऊन
भरत जाधव
Updated Sep 14, 2022 | 08:46 IST

णबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टचा (Alia Bhatt) ब्रह्मास्त्र पार्ट वन-शिवा (Brahmastra Part One - Shiva) सतत चर्चेत आहे. ब्रह्मास्त्रच्या हल्लामुळे संपूर्ण ब्रह्मांडचा विनाश होऊ शकतो, असं ब्रह्मास्त्र वापरत रणबीर आणि आलियाने बॉलिवूडला (Bollywood) संजिवनी दिली आहे. ब्रह्मास्त्र चित्रपटाविषयी संमिश्र प्रतिक्रिया येत असल्या तरी चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमा करत आहे.

; director Ayan Mukerji announced he will soon release Brahmastra 2
Brahmastra 2 कधी होणार प्रदर्शित? अयान मुखर्जीने दिलं उत्तर   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • तीन वर्षात Brahmastra 2 पडद्यावर आणण्यात येणार.
  • पार्ट 2 च्या स्क्रिप्टवर काम पार्ट वन पासून सुरू.
  • गेल्या 4 दिवसात ब्रह्मास्त्रचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 138.08 कोटी रुपये आहे.

Brahmastra 2 Release Date : रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टचा (Alia Bhatt) ब्रह्मास्त्र पार्ट वन-शिवा (Brahmastra Part One - Shiva) सतत चर्चेत आहे. ब्रह्मास्त्रच्या हल्लामुळे संपूर्ण ब्रह्मांडचा विनाश होऊ शकतो, असं ब्रह्मास्त्र वापरत रणबीर आणि आलियाने बॉलिवूडला (Bollywood) संजिवनी दिली आहे. ब्रह्मास्त्र चित्रपटाविषयी संमिश्र प्रतिक्रिया येत असल्या तरी चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमा करत आहे. सिनेमा रिलिज होण्याआधीच बायकॉटचा आवाज येऊ लागला होता, परंतु त्याचा परिणाम ब्रह्मास्त्रवर काही झाला नाही. (Brahmastra's success; director Ayan Mukerji announced he will soon release Brahmastra 2)

ब्रह्मास्त्रचे बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहून केवळ प्रेक्षकच नाही तर इंडस्ट्रीतील लोकही आश्चर्यचकित झाले आहेत. या चित्रपटाच्या यशानंतर प्रेक्षक आता ब्रह्मास्त्र भाग 2 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रेक्षकांच्या आतुरतेचं आनंद वार्तामध्ये रुपांतरीत करणारी माहिती आमच्याकडे आली आहे. एका मुलाखतीदरम्यान अयान मुखर्जीने ब्रह्मास्त्र पार्ट 2 कधी येणार असल्याचे उत्तर दिले आहे.

द इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधताना अयान मुखर्जीने ब्रह्मास्त्र भाग 2 डिसेंबर 2025 पर्यंत रिलीज होणार असल्याचे सांगितले आहे.  मुखर्जींनी निश्चित तारीख दिली नाही पण तीन वर्षात ब्रह्मास्त्र पार्ट 2 बनवू असं आपलं लक्ष्य असल्याचं अयान मुखर्जीने सांगितले. अयान पुढे सांगतो की, हे टार्गेट जुळवणे आमच्यासाठी कठीण जाईल कारण आम्हाला पार्ट वन बनवायला खूप वेळ लागला, परंतु आम्ही शिकलो की, असे चित्रपट कशापद्धतीने बनवली जातात. अयान पुढे सांगतो की पार्ट 2 च्या स्क्रिप्टवर काम पार्ट वन पासून सुरू आहे आणि स्क्रिप्टमध्ये अनेक सुधारणा आणि बदल झाले आहेत.

Read Also : संजय राऊतांच्या जामीन याचिकेवर ईडी देणार उत्तर

महामारीच्या काळात आम्हाला काम करण्यासाठी भरपूर वेळ मिळाला. सीक्वल कधी येणार याची निश्चित वेळ नाही, असे अयानने म्हटले असले तरी, आम्ही तो कधी रिलीज करण्याचा विचार करतो हे महत्त्वाचे असल्याचे तो म्हणाला. अयान म्हणतो की, फ्लोअरवर म्हणजे शूटिंग, पण अशा चित्रपटांमध्ये प्री-प्रॉडक्शन, व्हीएफएक्सवर काम करणेही तितकेच महत्त्वाचे असते. चित्रपटाचे काम सुरू होईल पण त्याआधी टीमला भाग एकच्या थकव्यातून आराम द्यावा लागणार आहे. 

Read Also : सांगलीत चार साधूंना जमावाची बेदम मारहाण

वीकेंडला अव्वल स्थान मिळवणारा ब्रह्मास्त्र हा पहिला हिंदी चित्रपट 

ब्रह्मास्त्रने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. गेल्या 4 दिवसात ब्रह्मास्त्रचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 138.08 कोटी रुपये आहे. दुसरीकडे, शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने सोमवारपर्यंत केवळ हिंदीत 125.5 कोटींची कमाई केली. त्याच वेळी, या चित्रपटाने तीन दिवसांत जगभरात 225 कोटी रुपये जमवले आहेत. जगभरातील बॉक्स ऑफिसमध्ये  वीकेंडच्या शीर्षस्थानी असलेला हा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी