ड्रग केसमध्ये अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडच्या भावाला अटक

Brother of Arjun Rampal's girlfriend Gabriella held by NCB in drug case ड्रग केसमध्ये एनसीबीने अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडच्या भावाला अटक केली

Demetriades
ड्रग केसमध्ये अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडच्या भावाला अटक 

थोडं पण कामाचं

  • ड्रग केसमध्ये अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडच्या भावाला अटक
  • ड्रेग केसमध्ये गिसिलाओसला अटक
  • गिसिलाओसला दोन दिवसांची एनसीबी कोठडी

मुंबईः नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (Narcotics Control Bureau - NCB) ड्रग केस (Drug Case) प्रकरणी आणखी एक अटक केली. अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्स (Gabriella Demetriades) हिच्या भावाला अटक झाली. अटक केलेल्या व्यक्तीचे नाव गिसिलाओस (Agisilaos Demetriades) असे आहे. हा मूळचा आफ्रिकेचा नागरिक आहे. (Brother of Arjun Rampal's girlfriend Gabriella held by NCB)

ड्रेग केसमध्ये गिसिलाओसला अटक

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Actor Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्यासाठी चौकशी सुरू असताना ड्रग प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणाची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने सखोल चौकशी सुरू केली. चौकशीत अनेकांना अटक झाली. अटकेतील काही जणांना सशर्त जामिनावर सोडण्यात आले तर काही जण अद्याप जेलमध्ये आहेत. नार्कोटिक्सने गिसिलाओसला केलेली अटक ही या प्रकरणातील ताजी कारवाई आहे. 

सुशांतच्या मृत्यूच्या चौकशीतून सुरू झालेल्या ड्रग केसमध्ये एका पेडलरने गिसिलाओस याचे नाव घेतले होते. या संदर्भात आणखी ठोस माहिती हाती आल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली. 

गिसिलाओस ड्रगचा पुरवठा करणाऱ्यांमध्ये अतिशय अॅक्टिव्ह आणि महत्त्वाचा दुवा आहे. याच कारणामुळे त्याला ठोस माहितीच्या आधारे अटक करण्यात आली. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे (NCB Zonal director Sameer Wankhede) यांनी गिसिलाओसला अटक झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. गिसिलाओस थेट ड्रग पेडलरच्या संपर्कात होता. 

गिसिलाओसला दोन दिवसांची एनसीबी कोठडी

सुशांत आणि रिया ड्रग केसशी संबंधित एका पेडलरशी थेट संबंध असल्यामुळे गिसिलाओस याला अटक झाली आहे. कोर्टाने त्याला दोन दिवसांची एनसीबी कोठडी दिली आहे. या कालावधीत आणखी चौकशी होणार आहे. याआधी एनसीबीने ठोस माहितीआधारे छापा टाकून मोठ्या प्रमाणावर ड्रग जप्त केले. एनसीबीने कोकेन, पीसीबी, एमडी अशी अनेक ड्रग जप्त केली. ड्रगचा ९ कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आला. या जप्तीनंतर गिसिलाओसला अटक झाली आहे. जप्तीचा आणि त्याचा काही थेट संबंध आहे का, हे एनसीबीने अद्याप जाहीर केलेले नाही. 

ड्रग प्रकरणी गिसिलाओसची चौकशी सुरू

समीर वानखेडे यांनी गिसिलाओसला अटक केल्याचे सांगितले तसेच त्याची चौकशी सुरू आहे, अशी माहिती दिली. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ड्रग केसमध्ये अटक केलेली रिया चक्रवर्ती सध्या जामिनावर जेलबाहेर आहे. रियाचा भाऊ शौविक अद्याप ड्रग केसमध्ये जेलमध्येच आहे. एनसीबीने ड्रग प्रकरणी बॉलिवूडच्या (Bollywood) काही दिग्गजांची चौकशी केली. यात दीपिका पदुकोण (Deepika Padukone), सारा अली खान (Sara Ali Khan) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) या अभिनेत्रींची (Famous Actress) समावेश आहे. टॅलेंट मॅनजेर करिश्मा, टॅलेंट मॅनेजर जया साहा आणि श्रुती मोदी यांचीही चौकशी झाली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी