कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये जाण्यासाठी दीपिका गाळतेय घाम 

बी टाऊन
Updated May 14, 2019 | 17:03 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Deepika padukone: बॉलिवूड एक्ट्रेस दीपिका पदुकोण या दिवसात न्यूयॉर्कमध्ये आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. दीपिकानं जिम लुकचे काही फोटो फॅन्ससाठी शेअर केले आहेत. 

Deepika Padukone
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये जाण्यासाठी दीपिका गाळतेय घाम   |  फोटो सौजन्य: Instagram

Deepika padukone gym look: बॉलिवूड एक्ट्रेसेस स्वतःला फिट आणि यंग ठेवण्यासाठी जिममध्ये बराच घाम गाळताना दिसतात. कटरिना कैफपासून आलिया भट्ट, दीपिका पदुकोणपर्यंत अशा काही एक्ट्रेसेस आहेत. ज्या खूप मेहनतीनं वर्कआऊट करतात. या एक्ट्रेसेसचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर दीपिका आपल्या फॅन्सशी बरीच जोडलेली आहे. दीपिका नेहमीच आपले नवंनवे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

काही तासांपूर्वीच दीपिकानं इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले. वर्कआऊट केल्यानंतर दीपिकानं हे फोटो शेअर केले आहेत. दीपिकानं फोटो शेअर करत फॅन्सना सांगितलं की, मी पुश अप्स मारण्यात अयशस्वी राहिली. मात्र मी प्रयत्न नक्कीच केले. फोटोमध्ये दीपिका खूप थकलेली दिसत आहे. पण तरीही सुद्धा ती खूप खुश दिसत होती. दीपिकाच्या या एका स्माईलवर तिचे कोट्यवधी फॅन्स फिदा आहेत. दीपिकाचे हे फोटो वेगानं व्हायरल होत आहेत. येथे बघा ३३ वर्षांची दीपिका जिममध्ये कशापद्धतीनं घाम गाळताना दिसत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

I did a push up today...Well,actually I fell down!But I had to use my arms to get back up so...you know,close enough!

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

दीपिका पदुकोण सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी न्यूयॉर्कमध्ये पोहोचली आहे. ऐश्वर्या राय बच्चन आणि सोनम कपूरप्रमाणेच दीपिका पदुकोण सुद्धा लोरियल एंबेस्डरच्या रूपानं भाग घेण्यासाठी कान्सला पोहोचेल. यावेळी कान्समध्ये दीपिकाचं हे तिसरं वर्ष असेल जेव्हा ती रेड कार्पेटवर वॉक करणार आहे. यावेळीच दीपिका पदुकोण न्यूयॉर्क आजारावर उपचार घेत असलेले ऋषि कपूर आणि त्यांची पत्नी नीतू कपूर यांची देखील भेट घेतली. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नीतू आणि ऋषि कपूर यांनी दीपिकाला एक ब्रेसलेट देखील भेट म्हणून दिलं. त्याचा एक फोटो दीपिकानं इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली.  

गेल्याच आठवड्यात दीपिकानं न्यूयॉर्कमध्ये झालेल्या मेट गालामध्ये सहभाग घेतला होता.  येथे दीपिकाने आपल्या घायाळ नजरेने साऱ्या चाहत्यांची मने जिंकली. मेट गाला २०१९मध्ये दीपिकाचा लूक ग्लॅमरस असा दिसत होता. दीपिकाने या इव्हेंटमध्ये डिझ्ने प्रिंसेस लूक केला होता. . मेट गाला २०१९मध्ये दीपिका पादुकोणने पिंक कलरचा स्ट्रीपलेस गाऊन घातला होता. तिचा हा गाऊन जॅक पोजन यांनी डिझाईन केला होता. तिचा हा गाऊन थ्री डी प्रिंटेड पीसला जोडून बनवण्यात आला होता. तिने गालाच्या पिंक कार्पेटवर आपल्या अदांनी जलवा दाखवला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी