हिना खानचा रेड कार्पेटवरील सेकंड वॉक फॅन्सला भावला, मेटॅलिक गाऊनमध्ये दिसतेय स्टनिंग

बी टाऊन
Updated May 19, 2019 | 11:59 IST | टाइम्स नाऊ हिंदी

अभिनेत्री हिना खाननं यावर्षी ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये डेब्यू केलाय. तिनं दुसऱ्यांदा रेड कार्पेटवर वॉक केला. तिसऱ्या दुसऱ्या दिवसाचं आऊटफिटही अगदी स्टनिंग होतं. कान्समधील हिनाचा दुसरा लूक पाहा कसा दिसतोय...

Hina Khan
हिना खानचा कान्समधील स्टनिंग लूक  |  फोटो सौजन्य: Instagram

Cannes Film Festival 2019: हिना खाननं आपल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील डेब्यूनंतर दुसऱ्यांदा रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवला. हिनाचा आगामी बॉलिवूड चित्रपट “लाईन्स”च्या प्रमोशनसाठी हिना कान्स फेस्टिव्हलला पोहोचली आहे. हिना खाननं कान्सच्या पाचव्या दिवशी पुन्हा एकदा रेड कार्पेटवर वॉक केला.

रेड कार्पेटवर वॉक करतांना हिना अतिशय सुंदर दिसत होती. यावेळी तिनं डार्क सिल्वर मेटॅलिक गाऊन घातला होता. आपल्या आऊटफिटसोबत हिनानं अगदी कमी ज्वेलरी घातली. हिना खानचा हा स्लिट सिल्वर गाऊन तिच्या टोन्ड फिगरवर अधिक खुलून दिसत होता. रेड कार्पेटवर वॉक करतांना हिना खूप कॉन्फिडन्ट दिसत होती, जसा तिला इथं वॉक करण्याचा खूप वर्षांचा अनुभव आहे. हिनाच्या हेअरस्टाईल बद्दल बोलायचं झाल्यास तिनं आपल्या काही केसांना मागच्या बाजूनं बांधलं होतं. तर बाकीचे केस मोकळे सोडले होते. पाहा हिना खानचा दुसरा रेड कार्पेट वॉक...

यापूर्वी हिना खाननं कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी रेड कार्पेटवर डीप नेक हेवी एम्बेलिश्ड ग्रे गाऊन कॅरी केला होता. हा गाऊन डिझायनर झियादनं डिझाईन केला होता. वर्कफ्रंटच्या बाबतीत बोलायचं झालं तर हिना खाननं नुकतीच ‘कसौटी जिंदगी की’ ही सीरिअल सोडली आहे. तिला मालिकेच्या सेटवर फेअरवेल पार्टीही देण्यात आली. या मालिकेत हिना कोमोलिकाची भूमिका साकारत होती.

#hinakhan #cannesfilmfestival

A post shared by E24 Bollywood (@e24official) on

हिना खाननं मालिका सोडल्यानंतर कोमोलिकावरून लक्ष बाजूला सारत मिस्टर बजाजचा ट्रेक दाखवण्यात येत आहे. यासाठी एकता कपूरनं कोमोलिकाच्या भूमिकेसाठी नवीन अभिनेत्रीचा शोध घ्यायला सुरूवात केली आहे.

याशिवाय हिना खान सध्या बिग बॉसच्या को-कंटेस्टंट प्रियांक शर्मासोबत गायक अरिजीत सिंह सोबत ‘रांझणा’ अल्बमचं शूटिंग करतेय. हिना खानला अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांनी खूप पसंत केलंय. शिवाय तिचा कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील डेब्यूही तिचा फॅन्सला भावला आहे. हिना खानला बिग बॉस सिझनमध्ये प्रेक्षकांनी पसंत केलं होतं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
हिना खानचा रेड कार्पेटवरील सेकंड वॉक फॅन्सला भावला, मेटॅलिक गाऊनमध्ये दिसतेय स्टनिंग Description: अभिनेत्री हिना खाननं यावर्षी ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये डेब्यू केलाय. तिनं दुसऱ्यांदा रेड कार्पेटवर वॉक केला. तिसऱ्या दुसऱ्या दिवसाचं आऊटफिटही अगदी स्टनिंग होतं. कान्समधील हिनाचा दुसरा लूक पाहा कसा दिसतोय...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
तैमूर करीनाला मॉम नाही तर 'या' नावाने हाक मारतो!
तैमूर करीनाला मॉम नाही तर 'या' नावाने हाक मारतो!
पाहा पूर्वीपेक्षा किती बदललीए सुहाना खान, हा फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
पाहा पूर्वीपेक्षा किती बदललीए सुहाना खान, हा फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
Bigg Boss Marathi: आपला मराठी बिग बॉस...बिग बॉस मराठी सीझन १ आणि २च्या स्पर्धकांचा एकत्र जल्लोष
Bigg Boss Marathi: आपला मराठी बिग बॉस...बिग बॉस मराठी सीझन १ आणि २च्या स्पर्धकांचा एकत्र जल्लोष
[PHOTO] दीड कोटीच्या कारमधून फिरते बाहुबलीमधील 'शिवगामी देवी', जाणून घ्या तिच्याविषयी इंटरेस्टिंग माहिती 
[PHOTO] दीड कोटीच्या कारमधून फिरते बाहुबलीमधील 'शिवगामी देवी', जाणून घ्या तिच्याविषयी इंटरेस्टिंग माहिती 
KBC 11: हा होता ७ कोटींसाठीचा प्रश्न, मराठी महिलेची KBC मध्ये अभिमानस्पद कामगिरी  
KBC 11: हा होता ७ कोटींसाठीचा प्रश्न, मराठी महिलेची KBC मध्ये अभिमानस्पद कामगिरी  
[video] रावणाच्या रूपात साऊथ सुपरस्टार प्रभास दिसणार का ?
[video] रावणाच्या रूपात साऊथ सुपरस्टार प्रभास दिसणार का ?
Mahesh Bhatt B'day: मुलगी पूजासोबत लिप लॉक आणि बरंच काही, वाढदिवसानिमित्त महेश भट्ट यांच्या फिल्मी सफरची झलक
Mahesh Bhatt B'day: मुलगी पूजासोबत लिप लॉक आणि बरंच काही, वाढदिवसानिमित्त महेश भट्ट यांच्या फिल्मी सफरची झलक
अल्डट स्टार जेसिका जेम्सचा मृत्यू, घरातच सापडला मृतदेह
अल्डट स्टार जेसिका जेम्सचा मृत्यू, घरातच सापडला मृतदेह