Cannes film festival: कंगना रेड कार्पेटवर गाऊन नाही तर साडी नेसून अवतरणार! 

बी टाऊन
Updated May 14, 2019 | 14:31 IST | टाइम्स नाऊ मराठी

Cannes film festival: कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये कंगना राणावत पुन्हा एकदा रेड कार्पेटवर फॅशनचा जलवा दाखवणार आहे. यावेळेस ती तिथे वेस्टर्न लूकमध्ये नव्हे तर पारंपारिक साडी नेसणार करणार आहे.

kangana-cannas_instagram
कंगना रेड कार्पेटवर गाऊन नाही तर साडी नेसून अवतरणार!  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिची गणना नेहमीच सुंदर अभिनेत्रींमध्ये होते. ती खूपच स्टायलिश असल्याने तिचं फॅशन स्टेटमेंट देखील चांगलं आहे. त्यामुळेच कंगना कोणत्याही पार्टी किंवा इव्हेंटमध्ये नेहमीच अप टू डेट दिसते. योग्य ठिकाणी आपल्याला साजेसे कपडे ती परिधान करत असते. त्यामुळे फॅशनच्या बाबतीत अनेक जण तिला फॉलो करतात. यावेळेस ती ७२व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये देखील सहभागी होणार आहे. या इव्हेंटमध्ये कंगना दुसऱ्यांदा सहभागी होणार आहे. 

याचविषयी 'मिड डे'शी बोलताना कंगना म्हणाली की, 'यावेळेस मी जे कपडे परिधान करेल त्याता ड्रामा असेल. एक भारतीय अभिनेत्री म्हणून माझी हा प्रयत्न आहे की, आपली भारतीय वेशभूषा जगभरात प्रसिद्ध व्हावी. ज्यामुळे आपला समृद्ध वारसा कायम जपला जाईल. मी आणि माझी स्टायलिस्ट एमी पटेल ही गेल्या काही आठवड्यांपासून या गोष्टीवर विचार करत आहोत. आम्ही फाल्गुनी आणि शेन पीकॉक यांच्या साथीने एक आगळीवेगळी अशी साडी डिझाइन करत आहोत. हे आम्ही यासाठी करत आहोत की, काळाच्या ओघात मागे पडलेली विणकाम संस्कृती यानिमित्ताने पुढे येईल. त्यामुळे आपल्या समुद्ध आणि ऐश्वर्यसंपन्न विणकाम संस्कृतीविषयी जागरुकता निर्माण होईल.' 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

The Queen has arrived in @nedrettaciroglu! #queenatcannes #kanganaatcannes #greygooselife

A post shared by Kangana Ranaut (@team_kangana_ranaut) on

कंगना यावेळी असंही म्हणाली की, 'मी रेड कार्पेट लूकविषयी फार आधीच विचार करत नाही. गेले काही दिवस तर मी माझ्या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्येच व्यस्त आहे. मला सिनेमासाठी जवळजवळ १० किलो वजन वाढवावं लागलं होतं. त्यामुळे आता मला माझं वजन देखील कमी करावं लागणार आहे. त्यामुळे रेड कार्पेटवरील माझा लूक हा नक्कीच वेगळ्या पद्धतीचा असेल.' 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Timeless Beauties! #eternal #KanganaRanaut #Rekha

A post shared by Kangana Ranaut (@team_kangana_ranaut) on

दरम्यान, याशिवाय कंगनाने मेट गालामध्ये प्रियंका चोप्रा आणि दीपिका पदुकोण यांच्या लूकविषयी देखील प्रतिक्रिया दिली आहे. 'मी २०१२ साली राकेश रोशनच्या बर्थडे पार्टीमध्ये नो-आयब्रो लूक कॅरी केला होता. त्यामुळे रिस्क ड्रेसिंग करताना मला फार काही अडचण वाटली नाही. मी एअरपोर्टवर साडी परिधान करणारी काही अभिनेत्रींपैकी एक होती. जेव्हा मी मेट गालाचे फोटो पाहत होते. तेव्हा मला असं जाणवलं की, भारतात कॅम्प (मेट गाला थीम) ची खरी राणी ही रेखाच आहे. पण मेट गालामध्ये प्रियंक आणि दीपिका दोघीही आपली छाप पाडण्यात यशस्वी झाल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी