सेलिब्रिटी टैरो रीडरची भविष्यवाणी : लग्नाच्या दोन वर्षानंतर कियारा अडवाणी होणार आई

बी टाऊन
Updated Feb 06, 2023 | 14:08 IST | टाइम्स नाऊ मराठी

बॉलीवुडचे हॉट कपल्समधून एक सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि  कियारा अडवाणी (Kiara Advani) लवकरच लग्न करणार आहेत. दोघांच्या लग्नाच्या विधिंची तैयारी सुरू झाली आहे आणि ही दोघ ७ फेब्रुवारीला फेरे घेतील.

Celebrity tarot reader predicts: Kiara Advani will become a mother after two years of marriage
सेलिब्रिटी टैरो रीडरने केली भविष्यवाणी : लग्नाच्या दोन वर्षानंतर कियारा अडवाणी होणार आई  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • एकसिद्धार्थ मल्होत्रा आणि  कियारा आडवाणी लवकरच लग्न करणार आहेत.
  • लग्न जैसलमेर, राजस्थानच्या सूर्यगढ़ पैलेसमध्ये होत आहे
  • सेलिब्रिटी टैरो कार्ड रीडर दिव्या पंडितने दोघांच्या लग्नाला घेऊन काही भविष्यवाण्या केल्या आहेत.

Siddharth Kiara Marriage: बॉलिवूडचे हॉट कपल्सपैकी एक कपल असलेलं सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि  कियारा अडवाणी (Kiara Advani) लवकरच लग्न करणार आहेत. दोघांच्या लग्नाच्या विधीची तयारी सुरू झाली आहे. हे दोघेही 7 फेब्रुवारीला फेरे घेतील. लग्न जैसलमेर,राजस्थानच्या सूर्यगड पैलेसमध्ये होत आहे ज्यात सहभागी होण्यासाठी ईशा अंबानी, शाहिद कपूर, मीरा राजपूत कपूर, करण जोहर यांच्यासोबत कियारा आणि सिद्धार्थचे कुटुंबीय पोहोचले आहेत. लग्नात केवळ 100-125 पाहुण्यांची उपस्थिती असणार आहे. लग्नानंतर सिद्धार्थ-कियारा मुंबईमध्ये एक वेडिंग रिसेप्शन ठेवणार आहेत, ज्यात बॉलिवुडचे सेलिब्रिटीही सहभागी होणार आहेत.

अधिक वाचा : सोमवारी कोणाचे नशीब उजळणार, पहा राशीभविष्य 

सिद्धार्थसाठी लकी आहे कियारा

सेलिब्रिटी टैरो कार्ड रीडर दिव्या पंडितने दोघांच्या लग्नासंबंधी भविष्यवाणी केली आहे. तिने इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, कियारा सिद्धार्थसाठी लकी आहे. सिद्धार्थ लवकरच स्वतःच प्रोडक्शन हाऊस सुरू करणार आहे. दोघांच लग्न खूप वर्ष टिकेल आणि दोघे सामान्य कपल्ससारखेच आहेत. कियारा एक उत्तम पत्नी सिद्ध होईल. ती एक चांगली व्यक्ती आहे आणि त्याचबरोबर तिच्यात आई आणि बायको होण्याचे गुण खूप आहेत.

अधिक वाचा : सकाळी पोट साफ होत नाही,मग करा हे काम

लग्नाला दोन वर्ष झाल्या -झाल्या ही दोघ आई-वडील होतील. दिव्याने सिद्धार्थला काही सल्ले दिले आणि अपल्या प्रिडिक्शनमध्ये सांगितलं की सिद्धार्थने ओवरथिंकिंग करतो, खूप जास्त ओनरथिंकिंग तो करतो त्याने त्यापासून वाचलं पाहिजे. 

तीन वर्षांच्या डेटिंगनंतर करत आहे लग्न

तसेच, कियाराला पण काही गोष्टींचा विचार विसरून पुढे जावे लागेल आणि तुमच्या जीवनातील सर्वोत्तम परिवर्तनाचा आनंद घ्यावा लागेल. कियाराला सिद्धार्थच्या  कुटुंबीयांकडून पाठिंबा मिळेल. एकंदरीत सिद्धार्थ-कियाराचं लग्न यशस्वी होणार आहे.

सिद्धार्थ आणि कियारा यांनी शेरशाह चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटात दोघांची रोमँटिक केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान दोघांची जवळीक वाढली होती. जवळपास तीन वर्षे डेटिंग केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी