तीन वर्षांपूर्वी या कारणास्तव झाला सेलिना जेटलीच्या मुलाचा मृत्यू, सोशल मीडियावरुन व्यक्त केल्या भावना

बी टाऊन
Updated Nov 19, 2020 | 13:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

अभिनेत्री सेलिना जेटली तीन मुलांची आई आहे. सेलिनाने ऑस्ट्रे्लियन व्यावसायिका पीटर हॉगशी लग्न केले आणि नंतर २०१२ मध्ये विन्स्टन हॉग आणि विराज हॉग या दोन जुळ्या मुलांना जन्म दिला.

 Actress Celina Jaitley
अभिनेत्री सेलिना जेटली   |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • अभिनेत्री सेलिना जेटली तीन मुलांची आई आहे
  • सेलिनाने ऑस्ट्रियन व्यावसायिका पीटर हागशी लग्न केले
  • तिने आर्थर आणि शमशेर या जुळ्या मुलांना जन्म दिला पण त्यांचा मुलगा शमशेर हृदयविकारामुळे मरण पावला.

मेलबर्न: अभिनेत्री सेलिना जेटली तीन मुलांची आई आहे. सेलिनाने ऑस्ट्रियन व्यावसायिका पीटर हॉगशी लग्न केले आणि नंतर २०१२ मध्ये विन्स्टन हॉग आणि विराज हॉग या दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. त्यानंतर १० सप्टेंबर २०१७ रोजी सेलिना पुन्हा आई झाली आणि तिने आर्थर आणि शमशेर या जुळ्या मुलांना जन्म दिला पण त्यांचा मुलगा शमशेर हृदयविकारामुळे मरण पावला.

प्रिमॅच्युअर बर्थ ही गंभीर आरोग्य समस्या 

मुलाच्या मृत्यूच्या तीन वर्षांनंतर, सेलिनाने सांगितले की तिच्या मुलाचा अकाली जन्म झाल्यामुळे मृत्यू झाला. जागतिक प्रीमॅच्युरिटी डे (१८ नोव्हेंबर) च्या निमित्ताने सेलिनाने सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले की अकाली जन्म एक गंभीर आरोग्य समस्या कशी आहे परंतु त्याविरुद्ध लढा दिला जाऊ शकतो. सेलिनाने या पोस्टमध्ये तिचा मुलगा आर्थरचा फोटो शेअर केला आहे. आर्थर जन्मानंतर जवळपास दोन महिने हॉस्पिटलमध्ये होता, पण आता तो निरोगी आयुष्य जगात आहे.


 

'गोष्टी चांगल्या होतील'

सेलिनाने या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, 'अकाली जन्म ही एक गंभीर समस्या आहे ज्याचा प्रतिकार केला जाऊ शकतो. नवजात शिशूची काळजी कशी घ्यावी याबद्दल कोणत्याही पालकांची पूर्ण तयारी नसते, पण आज ते ज्याठिकाणी आहेत त्या ठिकाणी याआधी बरीच कुटुंब होती या गोष्टीने त्यांना दिलासा मिळू शकेल. आज एनआयसीयू (नवजात गहन देखभाल युनिट) मध्ये असणाऱ्या पालकांना मी आणि माझे पती आश्वासन देऊ इच्छिते की गोष्टी सुधारतील आणि भविष्य खूप रोमांचक होईल.'

मुलग्याचे निधन

या पोस्टमध्ये, सेलिनाने पालकांना खात्री दिली की डॉक्टरांची काळजी, आईचे दूध, विश्वास आणि प्रेम या गोष्टी सकारात्मक बदल घडवू शकतात. या अभिनेत्रीने पुढे लिहिले आहे की, 'आमचे एक मूल एनआयसीयूमध्ये होते तेव्हा आम्ही खूप दुःखात होतो, त्याच्या जुळ्या भावाचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. परंतु डॉक्टर आणि परिचारिकांच्या काळजीमुळे आमचा मुलगा आर्थर आमच्याबरोबर घरी परत येईल याची खात्री पटली होती.'

अभिनेत्रीने पुढे लिहिले आहे की अशी काही मुले स्वतःची ओळख बनवतात आणि विन्स्टन चर्चिल आणि अल्बर्ट आइन्स्टाईन बनतात. तिने लिहिले की आर्थरवर तुमचे प्रेम आणि प्रार्थना वाहा आणि तुम्ही अकाली मुलांना कसा आधार देऊ शकता हे वाचण्यास विसरू नका.

सेलिनाने २३ सप्टेंबर २०१० रोजी ऑस्ट्रेलियन व्यापारी आणि हॉटेल व्यावसायिका पीटर हागशी लग्न केले होते. त्यांना आता तीन मुलगे असून अभिनेत्री पूर्णपणे मातृत्वाचा आनंद घेत आहे. ती बर्‍याचदा मुलांसह फोटो सोशल मीडियावर शेअर करते आणि त्याद्वारे चाहत्यांशी संवाद साधते. इन्स्टाग्रामवर तिचे अडीच लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी