Mr Lele Poster: फक्त अंडरवेअर मधला वरूण धवन झळकला मिस्टर लेले सिनेमाच्या फर्स्ट लूक पोस्टरवर

बी टाऊन
Updated Jan 13, 2020 | 18:09 IST | चित्राली चोगले

हम्प्टी शर्मा की दुल्हनिया आणि बद्रीनाथ की दुल्हनिया नंतर दिग्दर्शक शशांक खैतान व अभिनेता वरूण धवण मिस्टर लेले या आगामी बॉलिवूड सिनेमासाठी पुन्हा एकत्र येत आहेत. सिनेमाचं फर्स्ट लूक पोस्टर रिलीज झालं आहे.

check out the hilarious first look poster of upcoming bollywood film mr lele featuring varun dhawan karan
Mr Lele Poster: फक्त अंडरवेअर मधला वरूण धवन झळकला मिस्टर लेले सिनेमाच्या फर्स्ट लूक पोस्टरवर 

थोडं पण कामाचं

  • कॉमेडी बॉलिवूड सिनेमा मिस्टर लेलेचं फर्स्ट लूक पोस्टर भेटीला
  • पोस्टरवर फक्त अंडरवेअरवर झळकला वरूण धवन
  • करण जोहर निर्मित, शशांक खैतान दिग्दर्शित मिस्टर लेले सिनेमा 1 जानेवारी 2021 रोजी होणार रिलीज

मुंबई: बॉलिवूडमध्ये एक समजूत अनेक वर्ष मानली जात आहे ती म्हणजे वर्षाच्या पहिल्या आठवड्यात कोणताही सिनेमा रिलीज केला जात नाही. असं मानलं जातं की पहिल्या आठवड्यात रिलीज होणारा सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरत नाही. अनेक वर्षांनी 2003 मध्ये तुझे मेरी कसम हा सिनेमा 3 जानेवारी रोजी रिलीज झाला होता आणि तो बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. याच बॉलिवूडच्या समजुतीला आव्हान देत 2021साठी एक आगामी बॉलिवूड सिनेमा भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. हा सिनेमा म्हणजे वरूण धवनची मुख्य भूमिका असलेला मिस्टर लेले. या सिनेमाचं फर्स्ट लूक पोस्टर नुकतच सोशल मीडियावर रिलीज केलं गेलं आणि संपूर्ण सोशल मीडियावर बराच गाजावाजा होताना दिसला.

फक्त अंडरवेअर घातलेला वरूण धवन या पोस्टरवर झळकला आणि नेटिझन्सचं लक्ष वेधलं गेलं. सिनेमाचं टायटल तसंच सिनेमाचा फर्स्ट लूक पोस्टर नक्कीच धमाल आहे. या सिनेमासाठी हम्प्टी शर्मा की दुल्हनिया आणि बद्रीनाथ की दुल्हनिया या हिट सिनेमाचा निर्माता करण जोहर, दिग्दर्शक शशांक खैतान आणि वरूण धवन हे त्रिकुट पुन्हा एकदा एकत्र येताना दिसणार आहे. सिनेमाचं टायटल आणि पोस्टर बघून सिनेमा एक धमाल विनोदी राईड असणार हे सांगणं अगदी सहज शक्य आहे. 

पहा सोशल मीडियावर या पोस्टरला घेऊन काय धमाल सुरू आहे ते:
सिनेमाचं फक्त फर्स्ट लूक पोस्टर रिलीज झालं असं नाही तर सिनेमाची रिलीज डेट सुद्धा रिव्हील केली आहे आणि ती सुद्धा खुद्द निर्माता करण जोहरने एका ट्वीटद्वारे केली. या ट्वीटमध्ये फर्स्ट लूक पोस्टर शेअर करत म्हणाला, "जेव्हा तुम्हाला वाटत होतं की काय चांगली बातमी येऊ शकते तेव्हाच ती अधिक मनोरंजक होत आहे. मिस्टर लेले उर्फ वरूण धवन, शशांक खैतान एकत्र 2021ची धमाकेदार सुरुवात करणार आहेत. 1 जानेवारी 2021 रोजी होणार रिलीज.'

सिनेमामध्ये वरूण धवनच्या अपोझिट कोण झळकणार याबद्दल सुद्धा उत्सुकता असल्याचं दिसून आलं. त्यासाठी आधी कियारा अडवाणीच्या नावाची चर्चा होती पण आता जान्हवी कपूरचं नाव फायनल झाल्याचं समजत आहे. सध्या सिनेमाच्या पोस्टरने लक्ष वेधून घेतल असून सिनेमाची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. सध्या सिनेमाचं प्री-प्रोडक्शन चालू असून येत्या फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये सिनेमाच्या शूटला सुरुवात होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी