Chhapaak ratings: ‘छपाक’च्या कमी रेटिंगमुळे दीपिका दुखावली? जाणून घ्या ‘मालती’ची प्रतिक्रिया

बी टाऊन
Updated Jan 30, 2020 | 17:11 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Deepika Padukone Reaction on Chhapaak IMBd Rating: दीपिका पदुकोणचा चित्रपट ‘छपाक’चं IMDb रेटिंग कमी झाल्यानंतर पहिल्यांदाच तिनं प्रतिक्रिया दिलीय. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Deepika Padukone
‘छपाक’च्या कमी रेटिंगमुळे दीपिका दुखावली? बघा काय म्हणाली 

थोडं पण कामाचं

  • दीपिका पदुकोणचा चित्रपट 'छपाक'चं IMDb रेटिंग घटून ४.६ झालं.
  • छपाकवर झालेल्या गदारोळानंतर दीपिका याप्रकरणी पहिल्यांदा बोलली.
  • दीपिकानं प्रमोशनदरम्यान जेएनयूमध्ये जावून विद्यार्थ्यांचं केलं होतं समर्थन, त्यानंतर चित्रपटाबाबतच्या निगेटिव्ह कमेंट्स वाढल्या. त्याचा परिणाम IMDb रेटिंगवर झालाय.

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा चित्रपट ‘छपाक’ १० जानेवारीला रिलीज झाला होता. दीपिका आणि छपाकच्या टीमनं चित्रपटाचं खूप प्रमोशन देखील केलं. मात्र चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकण्यात अयशस्वी ठरला, ज्याचा परिणाम बॉक्स ऑफिसवर बघायला मिळाला.

दीपिका पदुकोण चित्रपट रिलीज होण्यापूर्वी नवी दिल्लीत प्रमोशनसाठी गेली होती. तिथं ती जवाहरलाल नेहरू विद्यापीठात गेली होती, जिथं कॅँपसमधील हिंसाचाराविरोधात विद्यार्थी विरोध प्रदर्शन करत होते. विद्यार्थ्यांचं समर्थन यावेळी दीपिकानं केलं. मात्र त्यानंतर लगेचच तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं आणि तिच्या चित्रपटावर बहिष्कार टाका, असे पोस्ट व्हायरल होऊ लागले. यानंतर आता ‘छपाक’ चित्रपटाच्या IMDb रेटिंगमध्ये घट झालीय. कारण चित्रपटाविरोधात मोठ्या संख्येत लोकांनी निगेटिव्ह रेटिंग दिल्या आहेत.

या प्रकरणावर आता दीपिकानं पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिलीय आणि तिच्या विरोधात वाईट रेटिंग देणाऱ्यांना तिनं चोख प्रत्युत्तर दिलंय. दीपिकाचा एक व्हिडिओ समोर आलाय जो तिच्या फॅन पेजवर ट्वीट केला गेलाय. या व्हिडिओमध्ये दीपिका म्हणतेय, ‘त्यांनी माझं IMDb रेटिंग बदललं, माझं मन नाही’, या दरम्यान तिच्यासोबत चित्रपटाची दिग्दर्शक मेघना गुलजार सुद्धा उपस्थित होती.

 

 

चित्रपट छपाकचं रेटिंग सध्या 4.6 स्टार आहे. चित्रपटाची कथा अॅसिड हल्ला झालेल्या लक्ष्मी अग्रवाल यांच्या आयुष्यावर बेतलेली आहे. चित्रपटात दीपिकानं मालती नावाच्या मुलीची भूमिका साकारलीय, जिच्यावर अॅसिड हल्ला होतो. त्यानंतर ती ज्या जिद्दीनं उभी राहते, न्यायासाठी लढते या सर्व घटना चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत.

मेघना गुलजारनं चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. चित्रपट १० जानेवारी २०२० ला रिलीज झाला होता. यात दीपिका सोबतच अभिनेता विक्रांत मेसी हा प्रमुख भूमिकेत होता. छपाक सोबत त्याच दिवशी अजय देवगण-काजोल यांचा चित्रपट ‘तान्हाजी: द अनसंग वॉरिअर’ रिलीज झाला होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला असून बॉक्स ऑफिसवर चित्रपटानं दमदार कमाई केलीय.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी