Chhichhore New Trailer: छिछोरेचा नवा ट्रेलर आऊट, बघण्याआधी लावा हेडफोन्स 

बी टाऊन
Updated Aug 23, 2019 | 14:49 IST

Chhichhore New Trailer Out: सुशांत सिंह राजपूत आणि श्रद्धा कपूरचा सिनेमा छिछोरे आणखी एक नवा ट्रेलर रिलीज झाला आहे. पहिला ट्रेलर फ्रेंडशिप डे च्या दिवशी रिलीज झाला होता. आता सिनेमाचा दुसरा ट्रेलर समोर आला आहे.

Chhichhore New Trailer
छिछोरेचा नवा ट्रेलर आऊट, बघण्याआधी लावा हेडफोन्स   |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • छिछोरे सिनेमाचा दुसरा ट्रेलर आऊट
  • पहिला ट्रेलर फ्रेंडशिप डेच्या दिवशी झाला होता रिलीज
  • आजच्या ट्रेलरला नाव दोस्त स्पेशल देण्यात आलं आहे.

बॉलिवूड एक्टर सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांचा छिछोरे सिनेमाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. फ्रेंडशिप डे च्या दिवशी या सिनेमाचा पहिला ट्रेलर रिलीज झाला होता. ज्यात कॉलेजच्या मित्रांची मस्ती दाखवण्यात आली होती. फॅन्स  आणि प्रेक्षकांनी या ट्रेलरवर खूप पसंती दर्शवली होती. आता छिछोरे सिनेमाचा नवीन ट्रेलर समोर आला आहे. जो पाहण्याआधी हेडफोन लावण्याची सूचना देण्यात आली आहे. पण ट्रेलर पाहण्यासाठी हेडफोन लावण्याची काय गरज आहे, हे तुम्हाला ट्रेलर बघूनच समजेल. 

छिछोरे सिनेमाचा नवीन दोस्त स्पेशल ट्रेलर एक मिनिट ५६ सेकंदांचा आहे. याची सुरूवात कॉलेजपासून होते. ज्यात याच्याशी संबंधित गोष्टी सांगितल्या जातात. त्यासोबतच हेडफोन लावून ट्रेलर बघण्याची ताकिद दिली आहे. कारण हा ट्रेलर एडल्ट जोक्सनं भरलेला आहे. यात कॉलेजच्या मित्रांची छिछोरेपंती दाखवण्यात आली आहे. नव्या ट्रेलरमध्ये सुशांत-श्रद्धा याव्यतिरिक्त वरूण शर्मा, प्रतीक बब्बर, ताहिर राज भसीन, नवीन पोलिशेट्टी, तुषार पांडे आणि सहर्ष कुमार शुक्ला दिसणार आहेत. 

सिनेमात काही कॉलेजच्या मित्रांची कहाणी दाखवण्यात येणार आहे. यात सर्व कॅरेक्टर्सचे दोन लूक आहेत. एकात ते कॉलेज स्टूडेंट्स आणि दुसऱ्यात ते वृद्ध वयात दाखवण्यत आलेत. कॉलेज लूक ९०च्या दशकातला आहे. या सिनेमा नितेश तिवारी यांनी डायरेक्ट करत आहे. नितेश यांनी याआधी आमिर खाना ब्लॉकबस्टर सिनेमा दंगल डायरेक्ट केला आहे.

छिछोरे यांनी ३० ऑगस्टला रिलीज होणार होता. मात्र याच दिवशी श्रद्धाचा दुसरा सिनेमा साहो देखील रिलीज होणार होता. प्रभास- श्रद्धाचा साहो याआधी १५ ऑगस्टला रिलीज होणार होता. मात्र त्यानंतर त्याची तारीख पुढे ढकलून ३० ऑगस्ट करण्यात आळी. याचमुळे साहोला टक्कर देण्यासाठी छिछोरेचे तारीख एक आठवड्यानं पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे छिछोरे सिनेमा येत्या ६ सप्टेंबर २०१९ ला रिलीज होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...