Kuch Kuch Hota hain : 'कुछ कुछ होता है' या सुपरहिट सिनेमातील छोटा सरदारजी लग्नबंधनात अडकला.

बी टाऊन
Updated Jan 17, 2022 | 12:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

Kuch Kuch Hota hain :बॉलीवूडमध्ये असे अनेक चित्रपट बनले आहेत जे वेगळे स्थान मिळवतात. असाच एक चित्रपट कुछ कुछ होता है जो आजही लोकांच्या मनात आहे. या सिनेमातील छोटा सरदारजी लग्नबंधनात अडकला आहे.

Chhote Sardar ji of superhit film Kuch Kuch Hota Hai tied a knot
परजन दस्तूर अडकला लग्नाच्या बेडीत  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कुछ कुछ होता है सिनेमातील छोटा सरदारजी लग्नबंधनात
  • परजन दस्तूरने साकारली होती छोट्या सरदारजीची भूमिका
  • गेल्या वर्षी गर्लफ्रेण्डसोबत बांधली गाठ

Chhote Sardar ji of superhit film Kuch Kuch Hota Hai tied a knot: बॉलीवूडमध्ये असे अनेक चित्रपट बनले आहेत जे वेगळे स्थान मिळवतात. असाच एक चित्रपट कुछ कुछ होता है जो आजही लोकांच्या मनात आहे. या सिनेमातील छोटा सरदारजी लग्नबंधनात अडकला आहे. या सिनेमात शाहरुख खान आणि काजोल प्रमुख भूमिकेत दिसले होते. सिनेमात राणी मुखर्जी आणि सलमान खानदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत होते. 


मात्र, या चित्रपटात जर कोणाची सर्वाधिक चर्चा झाली असेल तर ती म्हणजे या चित्रपटातील दोन मुलं, एक शाहरुख आणि राणीच्या मुलीची भूमिका साकारणारी आणि दुसरी म्हणजे छोटा सरदार, समर व्हेकेशन कॅम्पमध्ये या मुलाची व्यक्तिरेखा सिनेमात इन्ट्रोड्युस झाली आहे. 

21 years of 'Kuch Kuch Hota Hai': Here's what Anjali and Silent Sardarji are doing in their respective careers currently | Hindi Movie News - Times of India


असे अनेक चित्रपट आहेत ज्या सिनेमातील बालकलाकार खूप लोकप्रिय झाले आहेत आणि या चित्रपटात सरदार बालक हे देखील एक असेच एक बालक होते जे या चित्रपटानंतर खूप प्रसिद्ध झाले.

या चित्रपटातील त्या मुलाची व्यक्तिरेखा फार मोठी नसली आणि त्याला फारसे संवादही दिलेले नसले तरी, तरीही त्याचे छोटे छोटे संवाद सर्वांच्या लक्षात आहेत. या चित्रपटातील त्याचा संवाद होता, “तुस्सी जा रहे हो…. तुसी ना जाओ”

Bollywood's cutest child actors

या एका डायलॉमुळे तो मुलगा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. 


कुछ कुछ होता है मध्ये ही व्यक्तिरेखा परजन दस्तूर नावाच्या मुलाने साकारली होती. त्यावेळी चित्रपटात लहान सरदार म्हणून दिसणारा लहान मुलगा आज खूप मोठा झाला आहे . आणि शाहरुखच्या मांडीवर बसून हसणारा तो मुलगा आता लग्नाच्या बेडीत अडकला आहे. रिपोर्टनुसार, फेब्रुवारी 2021 मध्ये लग्न झाले. परजनने एकदा एका मुलाखतीत सांगितले होते की, फेब्रुवारी 2021 मध्ये तो त्याची गर्लफ्रेंड डेलसोबत लग्न करणार आहे.

त्याने डेल्नाला प्रपोज करतानाचा एक फोटोही शेअर केला होता, फोटो शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, "ती 1 वर्षापूर्वी हो म्हणाली होती आणि आता 4 महिन्यांनी लग्न करणार आहे."

कुछ कुछ होता है व्यतिरिक्त, किन दस्तूरने हम तुम या चित्रपटातही आपला आवाज दिला. रिफाइंडच्या जलेबीच्या जाहिरातीतून सगळ्यात आधी तो प्रेक्षकांसमोर आला होता. 
त्यानंतर 2009 मध्ये पायस जाने यांच्या सिकंदर या चित्रपटातही तो मुख्य अभिनेता म्हणून दिसला होता. त्याने या चित्रपटात फुटबॉलपटूची भूमिका साकारली होती.

परजन सध्या स्वतःचे प्रोडक्शन हाऊस चालवतो, ज्यात त्याने एक शॉर्ट फिल्म बनवली आहे. शाहरुख खानसोबत दुसऱ्यांदा काम करण्याची इच्छा असल्याचेही एका मुलाखतीत म्हटले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी