choreographer remo dsouza brother in law jason watkins commits suicide : मुंबई : प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आणि चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसुझाचा मेहुणा जेसन वॉटकिन्सचा मृतदेह मिल्लत नगर येथील निवासस्थानी आढळला. जेसनने गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. ओशिवरा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवला आहे.
जेसन अनेक दिवसांपासून आजारी होता. या आजारपणाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त होत आहे. रेमोची पत्नी लिझेल हिने सोशल मीडियावर पोस्ट टाकून भावाच्या मृत्यूची माहिती दिली. 'का? तू माझ्यासोबत असे का केलेस? मी तुला कधीच माफ करणार नाही' असे नमूद करत लिझेलने दुःख व्यक्त केले.
रेमो आणि लिझेल एका लग्नासाठी गोव्यात आहेत. त्यांना जेसनविषयी कळताच त्यांनी मुंबईला परतण्याचा निर्णय घेतला आहे.