Cirkus song ‘Current Laga Re’: दीपिका-रणवीर की केमिस्ट्री चाहत्यांना लागला करंट, नवीन गाण प्रदर्शित

बी टाऊन
भरत जाधव
Updated Dec 08, 2022 | 17:10 IST

Cirkus song ‘Current Laga Re’: करंट लगा हे गाणे धमाकेदार डीजे गाणे आहे, ज्यावर दीपिका-रणवीरच्या डान्सने कहर केला आहे. गाण्याचे बोल तितके चांगले नाहीत, पण दीपिका आणि रणवीर ज्या एनर्जीने डान्स करत आहेत ते चाहत्यांना आवडले आहे.  नुकताच या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज झाला आहे, ज्यासाठी लोकांच्या संमिश्र प्रतिक्रियाही येत आहेत.

Cirkus song ‘Current Laga Re’
दीपिका-रणवीर की केमिस्ट्री चाहत्यांना लागला करंट  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • करंट लगा हे गाणे धमाकेदार डीजे गाणे आहे, ज्यावर दीपिका-रणवीरच्या डान्सने कहर केला आहे.
  • रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण बऱ्याच दिवसांनी एका गाण्यात दिसत आहेत.
  • रोहित शेट्टी आणि रणवीर सिंग आता तिसऱ्या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.

Cirkus song ‘Current Laga Re’: रणवीर सिंग (Ranveer Singh)आणि  दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांचे नवीन गाणे 'करंट लगा रे' (Current Laga Re) हे गाणे आज यूट्यूबवर रिलीज करण्यात आले आहे. 'सर्कस'  (Cirkus) चित्रपटातील हे गाणे रिलीज होताच मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या गाण्यातील दीपिका आणि रणवीरची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत आहे. परंतु गाण्याचे शब्द चांगले नसल्याने हे तुमच्या आमच्या पचनी पडणार नाही. परंतु यातील दोघांचा डान्स हा अनेकांना नाचायला भाग पाडत आहे.  (Cirkus song ‘Current Laga Re released; fan crazy to see Deepika-Ranveers chemistry )

अधिक वाचा  :Navy Agniveer Recruitment : नौदलात 1500 अग्निवीरांची भरती

करंट लगा हे गाणे धमाकेदार डीजे गाणे आहे, ज्यावर दीपिका-रणवीरच्या डान्सने कहर केला आहे. गाण्याचे बोल तितके चांगले नाहीत, पण दीपिका आणि रणवीर ज्या एनर्जीने डान्स करत आहेत ते चाहत्यांना आवडले आहे.  नुकताच या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज झाला आहे, ज्यासाठी लोकांच्या संमिश्र प्रतिक्रियाही येत आहेत.

करंट लगा गाण्याने केला कहर 

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण बऱ्याच दिवसांनी एका गाण्यात दिसत आहेत. दीप-वीरच्या जोडीला चाहते भरभरून प्रेम देत असतात. दीपिकाचा हा लूक पाहून लोकं वेडे झाले आहेत. दीपिका आत्ताच या  इंडस्ट्रीत आली असल्याचं वाटत आहे. 

अधिक वाचा  : हुशार डोक्याची माणसं अवघ्या 11 सेंकदात शोधतील पोरगी

एका यूजरने कमेंट करत लिहिले की, 'मला वाटले की आपण 'ओम शांती ओम'ची दीपिका पाहत आहोत की काय.  दीपिकाचे वय वाढत नाही असे वाटत नाही. यासोबतच या गाण्यावर टीका करताना एका यूजरने लिहिले की, 'या गाण्यात नवीन काही नाही, तोच जुना ट्रॅक आहे.' 

रोहित शेट्टी आणि रणवीरची जोडी

रोहित शेट्टी आणि रणवीर सिंग आता तिसऱ्या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. आतापर्यंत दोघेही सूर्यवंशी आणि सिंबामध्ये एकत्र दिसले होते. आता या दोघांचा तिसरा चित्रपट सर्कस 16 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लोकांना फारसा आवडला नाही. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट होणार की बॉलीवूडच्या इतर चित्रपटांप्रमाणे पडणार हे औत्सुक्याचे ठरेल. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी