सुशांत प्रकरणात पोलीस 'टेन्सिल टेस्ट'ची मदत घेणार

Cloth used by Sushant Singh Rajput to undergo tensile test सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेण्यासाठी वापरलेल्या कापडाची 'टेन्सिल टेस्ट' होणार

Cloth used by Sushant Singh Rajput to undergo tensile test
सुशांत प्रकरणात पोलीस 'टेन्सिल टेस्ट'ची मदत घेणार 

थोडं पण कामाचं

  • सुशांत प्रकरणात पोलीस 'टेन्सिल टेस्ट'ची मदत घेणार
  • आत्महत्येच्या घटनेनंतर ३ आठवड्यांनी 'टेन्सिल टेस्ट'
  • कापडाची वजन उचलण्याची, तोलून धरण्याची क्षमता तपासणार

मुंबईः अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्येच्या प्रकरणात नवे वळण येण्याची शक्यता आहे. सुशांतने हिरव्या रंगाच्या कॉटनच्या कापडाचा गळफास म्हणून वापर करुन आत्महत्या केली होती. पोलिसांनी या कापडाची 'टेन्सिल टेस्ट' (Cloth used by Sushant Singh Rajput to undergo tensile test) घेण्याचा निर्णय घेतला आहे.

आत्महत्येच्या घटनेनंतर ३ आठवड्यांनी 'टेन्सिल टेस्ट'

आत्महत्येच्या घटनेनंतर तब्बल ३ आठवड्यांनी पोलिसांनी 'टेन्सिल टेस्ट'चा निर्णय घेतल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. आधीच काही जणांनी सुशांतने आत्महत्या केली नाही तर त्याची हत्या झाली अशा स्वरुपाचे वृत्त सोशल मीडियावर दिले होते. मात्र पोलिसांनी सुशांतने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची नोंद पंचनाम्यात केली होती. शवविच्छेदन अहवालानेही (postmortem report) गळफास लावून आत्महत्या केल्याच्या मुद्यावर शिक्कामोर्तब केले होते. यामुळे आत्महत्या की हत्या हा प्रश्न मागे पडला होता. मात्र बॉलिवूडमधील काही सेलिब्रेटींच्या लॉबिंगमुळे सुशांतला नैराश्य आल्याची चर्चा आजही सुरू आहे. पोलीस या लॉबिंग प्रकरणात तपास करत आहेत. हा तपास सुरू असतानाच पोलिसांनी गळफास लावून घेण्यासाठी वापरलेल्या कापडाची 'टेन्सिल टेस्ट' घेण्याचा निर्णय घेतला आहे.

कापडाची वजन उचलण्याची, तोलून धरण्याची क्षमता तपासणार

'टेन्सिल टेस्ट'मध्ये कापड जास्तीत जास्त किती प्रमाणात ताणले जाऊ शकते हे तपासले जाते. या तपासणीवरुन ते कापड किती वजन उचलू शकले अथवा तोलून धरू शकते याचा अंदाज येतो. पोलीस 'टेन्सिल टेस्ट'द्वारे ज्या कापडाच्या मदतीने गळफास घेतला ते कापड सुशांतचे वजन तोलून धरण्याएवढे सक्षम होते का ते तपासणार आहेत.

सुशांतच्या नातलगांची चौकशी

याआधी पोलिसांनी सुशांतचा निवडक मित्र परिवार, नातलग, बॉलिवूडमधील निवडक कलाकार, सुशांतवर उपचार करत असलेले मानसोपचारतज्ज्ञ, सुशांतचे नोकर यांची चौकशी केली आहे. सुशांत प्रकरणात मनोरंजनसृष्टीत कार्यरत काही पत्रकारांचीही चौकशी झाली आहे. सुशांतला नैराश्य यावे आणि त्याने मनोरंजन सृष्टीतून बाहेर पडावे या हेतूने कोणी लॉबिंग करत होते का याचा तपास पोलीस करत आहेत. सुशांत त्याच्यावर आरोप करणाऱ्या 'निगेटिव्ह' बातम्या आल्यावर अस्वस्थ व्हायचा. त्याच्या या स्वभावाचा गैरफायदा घेण्यासाठी विशिष्ट माध्यमांतून काही बातम्या पेरण्यात आल्या होत्या का, हे पण तपासले जात आहे.

सुशांत विरोधी लॉबिंग सुरू होते का, याचा तपास सुरू

सुशांतला बॉलिवूडच्या चांगल्या ऑफर मिळू नये आणि मिळाल्या तर त्याच्या सिनेमाची निर्मिती लांबणीवर पडावी यासाठी काही सेलिब्रेटी लॉबिंग करत होते, अशी चर्चा आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस लवकरच शेखर कपूर आणि संजय लीला भन्साळी या दिग्गज निर्माता दिग्दर्शकांची तसेच प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौत हिची चौकशी करणार असल्याचे वृत्त आहे.

सुशांत प्रकरणी नोंदवली २७ जणांची साक्ष

वांद्रे पोलिसांनी सुशांत आत्महत्या प्रकरणात २७ जणांची साक्ष नोंदवून घेतली आहे. या प्रकरणात सर्व शक्यता तपासण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी