कॉमेडिअन राजू श्रीवास्तव याचे निधन

comedian raju srivastav passed away : कॉमेडिअन राजू श्रीवास्तव याचे निधन झाले. राजू जिममध्ये व्यायाम करत असताना छातीत वेदना झाल्यामुळे बेशुद्ध पडला आणि कोमात गेला होता. त्याच्यावर 10 ऑगस्ट 2022 पासून दिल्लीच्या एम्समध्ये उपचार सुरू होते. अखेर आज (बुधवार 21 सप्टेंबर 2022) त्याने अखेरचा श्वास घेतला.

comedian raju srivastav passed away
कॉमेडिअन राजू श्रीवास्तव याचे निधन  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • कॉमेडिअन राजू श्रीवास्तव याचे निधन
  • दिल्लीच्या एम्समध्ये घेतला अखेरचा श्वास
  • अनेक दिवसांपासून सुरू होते उपचार, कोमात होता

comedian raju srivastav passed away : कॉमेडिअन राजू श्रीवास्तव याचे निधन झाले. तो 58 वर्षांचा होता. राजू जिममध्ये व्यायाम करत असताना छातीत वेदना झाल्यामुळे बेशुद्ध पडला आणि कोमात गेला होता. त्याच्यावर 10 ऑगस्ट 2022 पासून दिल्लीच्या एम्समध्ये उपचार सुरू होते. अखेर आज (बुधवार 21 सप्टेंबर 2022) त्याने अखेरचा श्वास घेतला.

भारतातील 7 प्राचीन मंदिरे

जगातील सर्वाधिक श्रीमंत 7 राजेशाही घराणी

राजू श्रीवास्तव याच्या हृदयात आधीपासूनच मोठ्या प्रमाणात ब्लॉकेज होते. हृदयाच्या एका भागात तर 100 टक्के ब्लॉकेज होते. जिममध्ये व्यायाम करत असताना राजू याच्या छातीत असह्य वेदना झाल्या आणि तो तिथेच बेशुद्ध पडला होता. यानंतर राजूच्या तब्येतीत आजच्या दिवसापर्यंत एकदाही लक्षणीय म्हणता येईल अशी सुधारणा दिसून आली नाही.

गुलाबाच्या पाकळ्या करतील तुम्हाला ताज्यातवान्या

प्रत्येकाने बघावे असे आशियातील 7 धबधबे

राजू उपचार घेत असताना अधूनमधून त्याची तब्येत ढासळल्याच्या तसेच त्याच्या मृत्यूच्या बातम्या येत होत्या. प्रत्येकवेळी हे वृत्त नंतर घरच्यांकडून फेटाळले जात होते. पण यावेळी एम्स प्रशासन आणि राजू श्रीवास्तव याच्या घरातील सदस्य यांनी निधनाची माहिती दिली आहे. 

जिममध्ये बेशुद्ध झाला त्यावेळी राजू याच्या मेंदूतील एक नस दबल्याचे वृत्त आले होते. तो कोमात जाण्याचे हे एक मोठे कारण असल्याचे समजते. याच कारणामुळे अधूनमधून राजू श्रीवास्तव ब्रेन डेड झाल्याच्या बातम्या पसरत होत्या. अखेर घरच्यांनी ठोस माहिती देऊन या विषयावरील चर्चा थांबविली होती.

राजू श्रीवास्तव आणि त्याचा धाकटा भाऊ हॉस्पिटलमध्ये

राजूला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याच्या चार दिवस आधीच त्याच्या धाकट्या भावाला हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तब्येत ढासळल्यामुळे तो आयसीयूमध्ये दाखल होता. भावाच्या तब्येतीची चिंता आणि इतर कारणे या सगळ्याची सरमिसळ झाल्यामुळे जिममध्ये व्यायाम करताना राजूची तब्येत ढासळली होती.

कोण होता राजू श्रीवास्तव?

कॉमेडियन राजू श्रीवास्तव (५८) कॉमेडी शो तसेच टीव्ही कार्यक्रमांतून दिसला होता. त्याने निवडक सिनेमांतून भूमिका साकारल्या होत्या. राजू राजकारणातही सक्रीय होता. तो भारतीय जनता पार्टीचा नेता आणि उत्तर प्रदेश चित्रपट विकास परिषदेचा अध्यक्ष होता.  नोएडामध्ये फिल्म सिटी उभारण्यात उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने तो महत्त्वाची भूमिका बजावत होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी