राजू श्रीवास्तव ४६ तास उलटले तरी बेशुद्ध, प्रकृती गंभीर

कॉमेडियन राजू श्रीवास्तव (५८) हृदयविकाराचा झटका आल्यानंतर बेशुद्ध झाला. तो अद्याप शुद्धीवर आलेला नाही. राजू बेशुद्ध झाला त्याला ४६ तासांपेक्षा जास्त वेळ झाला तरी तो शुद्धीवर आलेला नाही.

Comedian Raju Srivastava after heart attack condition is critical and admitted in Aiims hospital
राजू श्रीवास्तव ४६ तास उलटले तरी बेशुद्ध, प्रकृती गंभीर  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • राजू श्रीवास्तव ४६ तास उलटले तरी बेशुद्ध, प्रकृती गंभीर
  • राजू श्रीवास्तव सध्या व्हेंटिलेटरवर
  • राजूच्या हृदयाच्या एका भागात तर १०० टक्के ब्लॉकेज आढळले

नवी दिल्ली : कॉमेडियन राजू श्रीवास्तव (५८) हृदयविकाराचा झटका आल्यानंतर बेशुद्ध झाला. तो अद्याप शुद्धीवर आलेला नाही. राजू बेशुद्ध झाला त्याला ४६ तासांपेक्षा जास्त वेळ झाला तरी तो शुद्धीवर आलेला नाही. प्रकृती नाजूक असल्यामुळे राजू श्रीवास्तव सध्या व्हेंटिलेटरवर आहे. राजूच्या हृदयाच्या एका भागात तर १०० टक्के ब्लॉकेज आढळले आहेत.

राजू श्रीवास्तव बुधवारी जिममध्ये ट्रेडमिलवर व्यायाम करत असताना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे बेशुद्ध पडला. उपचारासाठी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रकृतीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याचे पाहून राजू श्रीवास्तव याला दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले.

राजूला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याच्या चार दिवस आधीच त्याच्या धाकट्या भावाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. राजू श्रीवास्तवचा धाकटा भाऊ न्यूरो हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल आहे.

ताज्या घडामोडींमुळे श्रीवास्तव कुटुंब चिंतेत आहे. घरातील दोन कर्तेसवरते मुलगे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. दोन्ही मुलांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी आणि ते लवकर घरी परतावे अशी प्रार्थना श्रीवास्तव कुटुंब करत आहे. 

कोण आहे राजू श्रीवास्तव?

कॉमेडियन राजू श्रीवास्तव राजकारणातही सक्रीय आहे. राजू भारतीय जनता पार्टीचा नेता आणि उत्तर प्रदेश चित्रपट विकास परिषदेचा अध्यक्ष आहे. नोएडामध्ये फिल्म सिटी उभारण्यात उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने तो एक महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी