Case Toh Banta Hai: Amazon MiniTV ने 'केस तो बना है' या कॉमेडी शोचा मजेशीर ट्रेलर रिलीज केला आहे. बनीजय एशिया निर्मित, रितेश देशमुख, वरुण शर्मा आणि कुशा कपिला यांच्या प्रमुख भूमिका या शोमध्ये आहेत. हा शो भारतातील पहिला कोर्ट कॉमेडी शो असल्याचं म्हटलं जात आहे. रितेश आणि वरुण सरकारी वकील आणि बचाव पक्षाच्या वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर कुशा न्यायाधीशाच्या भूमिकेत आहे.
ट्रेलरच्या सुरुवातीला रितेश देशमुख गंभीरपणे म्हणतो, “कोणीही कायद्याच्या वर नाही. नाती, मित्र, मैत्री इथे चालणार नाही. आरोप, पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे निकाल दिला जाईल. या न्यायालयात तारखेवर तारीख मिळणार नाही. सरतेशेवटी, रितेश खुलासा करतो की येथे खूप हशा पिकेल.
अधिक वाचा : पोटाचा घेर कमी करायचा आहे?, मग करा 'या' गोष्टींचं सेवन
वरुण धवन,करीना कपूर खान,करण जोहर, सारा अली खान, अनिल कपूर, रोहित शेट्टी आणि बादशाह या शोमध्ये हजेरी लावणार आहेत.
अधिक वाचा :ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र
केस तो बनाता है हा लाइट रोस्ट, टॉक शो असणार आहे. इथे सेलिब्रिटींसह प्रेक्षकही पोट धरून हसणार आहेत.या सेलिब्रिटींवर लावण्यात आलेले आरोप, आणि त्यातून निर्माण होणारी कॉमेडी या शोचा युएसपी असेल. एकाहून एक धमाल सेलिब्रिटी, जोडीला रितेश, कुशा आणि वरुण शर्माचा कॉमेडी तडका पाहायला मिळणार आहे. या शो चा 29 जुलै रोजी Amazon MiniTV - आणि त्याचे शॉपिंग अॅप - आणि फायर टीव्हीवर विनामूल्य प्रीमियर होईल.