सुशांतच्या मृत्यूचे रहस्य उलगडणार

Conclusive CBI Forensic report in Sushant Case अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूचे रहस्य लवकरच उलगडेल.

Conclusive CBI Forensic report in Sushant Case
सुशांतच्या मृत्यूचे रहस्य उलगडणार 

थोडं पण कामाचं

  • सुशांतच्या मृत्यूचे रहस्य उलगडणार
  • सीबीआयची फॉरेंसिक टीम फॉरेंसिकचा अहवाल सार्वजनिक करणार
  • अहवालातून अनेक प्रश्नांची उत्तरे सापडण्याची शक्यता

मुंबईः अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Actor Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूचे रहस्य लवकरच उलगडणार आहे. सीबीआयची फॉरेंसिक टीम (forensic team) सुशांत प्रकरणातील फॉरेंसिकचा अहवाल सार्वजनिक करणार आहे. या संदर्भात फॉरेंसिकचे तज्ज्ञ महत्त्वाच्या माहितीचे विश्लेषण करण्यासाठी १७ सप्टेंबरला एक बैठक करत आहेत. ही बैठक झाल्यानंतर लवकरच अहवाल जाहीर होणार आहे. (Conclusive CBI Forensic report in Sushant Case)

सुशांतचा मृतदेह १४ जून रोजी बेडरूमध्ये पंख्याला बांधलेल्या हिरव्या कापडाच्या गळफासात लटकलेल्या अवस्थेत होता. हा मृतदेह फासातून सोडवून बेडवर ठेवला, अशी माहिती सुशांतचा फ्लॅटमेट सिद्धार्थ पीठानी याने दिली. सुशांतने गळफास लावून आत्महत्या केली, असे सिद्धार्थने सांगितले. मात्र सुशांतच्या बहिणी तसेच त्याच्या वडिलांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय व्यक्त केला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ तपास केला. तब्बल ५६ जणांची चौकशी केली. यात बॉलिवूडमधील काही दिग्गजांचाही समावेश होता. या कालावधीत मुंबई पोलिसांनी सुशांतच्या आर्थिक व्यवहारांची मर्यादीत चौकशी केली होती. मात्र सुशांतच्या वडिलांनी बिहारमध्ये (Bihar) तक्रार नोंदवली आणि चित्र पाटलटले.

बिहार पोलिसांनी सुशांतच्या आर्थिक व्यवहारांचे सविस्तर तपशील गोळा केले. या प्रकरणी आर्थिक बाजूची सखोल चौकशी इडीने करावी अशी विनंती बिहार पोलिसांनी केली. बिहार पोलिसांच्या विनंतीआधारे इडीने (Enforcement Directorate - ED) तपासाची तयारी सुरू केली. याच सुमारास बिहार पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला मुंबई मनपाने रात्री अचानक क्वारंटाइन केले. पोलीस तपासात गुंतलेल्या व्यक्तीला क्वारंटाइन करण्यात आल्यामुळे मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) तपासाविषयी संशय निर्माण झाला. अखेर हा तपास सीबीआयकडे (Central Bureau of Investigation - CBI) देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. 

सीबीआयची टीम मुंबईत पोहोचण्याआधी इडीची चौकशी सुरू झाली. इडीने सुशांतची गर्लफ्रेंड रिया तसेच तिचा भाऊ आणि वडील यांचे मोबाइल तज्ज्ञांमार्फत तपासणीसाठी जप्त केले. ही तपासणी सुरू झाली आणि प्रकरणाला नवे वळण लागले. रिया आणि शौविक मोबाइलवरुन वारंवार ऑर्डर देऊन मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ (Drugs) मागवत असल्याचे लक्षात आले. ही माहिती उघड झाली आणि सुशांत प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (Narcotics Control Bureau - NCB) दाखल झाला. एनसीबीने तपासाची सूत्रं हाती घेऊन ठिकठिकाणी छापे टाकले तसेच अनेकांना अटक केली. रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक या दोघांना तसेच सुशांतच्या घरात काम करणाऱ्या सॅम्युअल मिरांडा आणि दीपक सावंत यांनाही अटक झाली. 

रिया आणि शौविकला एनसीबीने अटक करण्याआधी सीबीआयने सुशांत मृत्यू प्रकरणात सखोल चौकशीला सुरुवात केली. सुशांतचे पोस्टमॉर्टेम करणाऱ्या डॉक्टरांना जाब विचारण्यात आला. पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये मृत्यूची वेळ तसेच अनेक महत्त्वाचे तपशील नमूद नसण्याचे कारण विचारण्यात आले. दिल्लीतील एम्सच्या डॉक्टरांची टीम या तपास कामात सहभागी झाली. सीबीआयच्या फॉरेंसिकने सुशांतचा मृत्यू झाला त्यावेळी घरात नेमकी काय स्थिती होती हे जाणून घेण्यासाठी सीन रीक्रीएशन केले. सुशांतचा फ्लटॅमेट सिद्धार्थ पीठानी, घराचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, घरातील नोकर दीपेश सावंत, नीरज आणि केशव यांची सीबीआयने वारंवार चौकशी केली. तपासातून सीबीआयला मिळालेली माहिती तसेच फॉरेंसिंकने काढलेले निष्कर्ष या आधारे सीबीआयची फॉरेंसिक टीमने सुशांत मृत्यू प्रकरणात एक अहवाल तयार करत आहे. या संदर्भात १७ सप्टेंबरला तज्ज्ञ नव्या माहितीआधारे अहवालाला अंतिम स्वरुप देण्याबाबत चर्चा करतील. हा अहवाल लवकरच जाहीर होणार आहे. अहवाल जाहीर झाल्यावर सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली या प्रश्नाचे उत्तर सापडण्याची शक्यता आहे. 

सुशांतचे चाहते मागील अनेक आठवड्यांपासून आपल्या लाडक्या अभिनेत्याला न्याय मिळाला म्हणून जस्टिस फॉर सुशांत (Justice For Sushant) अशी मोहीम राबवत आहेत. भारतातच नाही तर अमेरिकेतही ही मोहीम राबवली जात आहे. त्यामुळे सुशांतचे चाहते सीबीआयच्या फॉरेंसिक टीमच्या अहवालातून अनेक प्रश्नांची उत्तरे सापडतील या आशेवर आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी