Kangana ranavat : ट्विटरचे नवीन सीईओंचे कंगना राणावतकडून अभिनंदन, जॅक डोर्सीला म्हणाली ‘बाय अंकल जॅक’

बी टाऊन
विजय तावडे
Updated Nov 30, 2021 | 19:32 IST

Kangana ranavat : बॉलिवूड क्वीन कंगना राणावतने अनोख्या स्टाईलने ट्विटरचे नवे सीईओ पराग अग्रवाल यांचं अभिनंदन केलं आहे. तर दुसरीकडे जॅक डोर्सींची खिल्ली उडवलीय.

Congrats from Kangan, new CEO of Twitter,says 'Bye Uncle Jack'
ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांचे अनोख्या स्टाईलने अभिनंदन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ट्विटरच्या नव्या सीईओंचं कंगनाकडून अनोखं अभिनंदन
  • कंगनाला ट्विटरवर बंदी घालण्यात आली आहे
  • अनुपम खेर यांनीही नव्या सीईओंचं स्वागत केलं

Kangana ranavat : बॉलिवूड क्वीन कंगना रणौतने मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांचा राजीनामा जाहीर केल्यानंतर आणि पराग अग्रवाल यांची कंपनीच्या नवीन सीईओपदी नियुक्ती केल्यानंतर, सोशल हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये कंगनाने एकीकडे पराग अग्रवालचे अभिनंदन केले आहे, तर दुसरीकडे तिने जॅक डोर्सीची खिल्ली उडवली आहे.त्यामुळे तिची नवीन सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहे. कंगना व्यतिरिक्त, अभिनेता अनुपम खेर आणि इतर बॉलिवूड स्टार्सनी देखील पराग अग्रवालचे अभिनंदन करणारी पोस्ट शेअर केली आहे.


कंगनाने जॅक डोर्सीची खिल्ली उडवली

वास्तविक कंगनाने इंस्टाग्रामवर जॅक आणि परागची एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये 'ट्विटर सीईओ पराग अग्रवाल, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे, इंडियाचे माजी विद्यार्थी यांनी, जॅक डोर्सीची जागा घेतली' असे लिहिले होते. ही पोस्ट शेअर करताना कंगनाने ‘बाय अंकल जॅक’ असं लिहिलं.

कंगनावर ट्विटर बंदी आहे

तुम्हाला माहिती असेल की कंगनावर, अनेक महिन्यांपासून ट्विटरवर बंदी घालण्यात आली आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कंगनाने एक वादग्रस्त ट्विट पोस्ट करून खळबळ उडवून दिली.आणि त्या ट्विटवरुन इतका गदारोळ झाला की 3 मे रोजी तिचे ट्विटर खाते कायमचे सस्पेंड करण्यात आले. त्यामुळे आता डोर्सीच्या राजीनाम्यानंतर कंगनाची पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  
आणि लोकही यावर जोरदार कमेंट करत आहेत. ट्विटरवर बंदी घातल्यानंतर कंगना आता तिच्या इंस्टाग्राम हँडलवर अनेकदा आपले विचार शेअर करते. सामाजिक मुद्द्यांपासून ते राजकीय आणि बॉलिवूड स्टार्सपर्यंत,  प्रत्येक गोष्टीवर कंगना नेहमीच मोकळेपणाने बोलते.

अनुपम खेर यांनी स्वागत केले

कंगनासह,  बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांनी देखील नवीन सीईओ पराग अग्रवाल यांचे स्वागत केले आणि ट्विटरवर लिहिले – 
‘अपना हिंदुस्तानी भाई, पराग अग्रवाल ट्विटरचे नवीन सीईओ झाले! काहीही होऊ शकते.’

जॅक डॉर्सी यांनी स्वत:च ट्विट करत आपल्या राजीनाम्याची माहिती दिली आहे. जॅक डॉर्सींच्या राजीनाम्यानंतर पराग अग्रवाल हे आता ट्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. जॅक डॉर्सी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की सर्वाना ही बाब माहित आहे की नाही हे मला माहित नाही मात्र मी ट्विटरमधून राजीनामा दिला आहे. आपल्या ट्विटबरोबरच जॅक डॉर्सी यांनी एक पत्रदेखील पोस्ट केले आहे. आपल्या टीमसाठी जॅक डॉर्सी यांनी हे पत्र लिहिले असून त्यात राजीनाम्याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर राजीनामा देण्यामागची भूमिका आणि पुढील काही मुद्देदेखील स्पष्ट केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की त्यांनी कंपनीच्या सह-संस्थापकाच्या जबाबदारीपासून सीईओ, अध्यक्ष, अंतरिम सीईओ आणि सीईओ यासारख्या अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्विटरबरोबर ते १६ वर्षे कार्यरत होते. १६ वर्षे विविध जबाबदाऱ्या सांभाळल्यानंतर आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी हे देखील स्पष्ट केले की आपल्यानंतर पराग अग्रवाल ट्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी