Coolie No 1: सारा अली खान- वरूण धवन स्टारर 'कुली नंबर १'चं पोस्टर आऊट

बी टाऊन
Updated Aug 12, 2019 | 13:54 IST | टाइम्स नाऊ मराठी

'कुली नंबर १' च फर्स्ट लूक रिलीज झाले आहे. 'कुली नंबर १' च्या पोस्टरमध्ये सारा अली खान आणि वरtण धवन यांची चांगली केमिस्ट्री बघायला मिळतेय. फर्स्ट लूकच्या पोस्टरमध्ये वरूण अगदी गोविंदासारखा दिसतोय.

coolie no 1 remake
'कुली नंबर १'  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • वरूण धवन आणि सारा अली खानचा सिनेमा 'कुली नंबर १' चे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज
  • वरूण धवन आणि सारा अली खानचा सिनेमा पुढच्या वर्षी कामगार दिनाच्या दिवशी होणार रिलीज
  • १९९५ मधील गोविंदा आणि करिश्मा कपूरचा सिनेमा 'कुली नंबर १' चा रिमेक

मुंबई : नव्वदच्या दशकात करिश्मा कपूर आणि गोविंदाच्या ‘कुली नंबर १’ या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्यानंतर गोविंदा विनोदी अभिनेता म्हणून लोकप्रिय झाला. गोविंदाच्या या सिनेमाचे निर्माते वाशू भगनानी यांनी ‘कुली नंबर १’ चा रिमेक करण्याचा निर्णय घेतला आहे. या सिनेमामध्ये अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री सारा अली खान मुख्य भूमिकेत दिसतील. वरूण धवन आणि सारा अली खानच्या या आगामी सिनेमाच फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये सारा अली खान आणि वरूण धवन यांची चांगली केमिस्ट्री दिसत आहे. वरूण धवन फर्स्ट लूक पोस्टरमध्ये कुली राजूच्या लूकमध्ये अगदी गोविंदासारखा दिसत आहे. तर सारा अली खान देखील करिश्मा कपूरच्या लूकची आठवण करून देत आहे. फर्स्ट लूकच्या पोस्टरमध्ये वरूण धवन लाल रंगाचा शर्ट आणि पांढऱ्या रंगाच्या पँटमध्ये दिसत आहे. तसंच गोल्डन कलरच्या ग्लिटर ड्रेसमध्ये सारा अली खान खूप हॉट दिसतेय.  

 फर्स्ट लूक पोस्टरमध्ये‘कुली नंबर १’चे मोशन पोस्टर टीझर रिलीज करण्यात आले. यात वरूण धवन कुलीच्या लूकमध्ये दिसला होता. टीझरमध्ये वरूण सहा मोठ्या बॅग घेऊन जाताना दिसला. वरूण धवनकडे इतक्या बॅग होत्या की त्याचा चेहराही नीट दिसत नव्हता. त्याच वेळी, सारा अली खान कुलीला आवाज देताना दिसते.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Get ready फ़र्स्ट लूक tomorrow #coolie #coolie #coolie

A post shared by Varun Dhawan (@varundvn) on

 

१९९५ मध्ये गोविंदा आणि करिश्मा कपूर यांचा ‘कुली नंबर १’ हा विनोदी सिनेमा आला होता. २५ वर्षांनंतर या सिनेमाचा रिमेक येत असून या सिनेमाच्या रिमेकमध्ये  वरूण धवन आणि सारा अली खान दिसणार आहे. करिश्मा कपूरच्या वडिलांची भूमिका कादर खान यांनी केली होती. या सिनेमामध्ये सारा अली खानच्या वडिलांची भूमिका परेश रावल साकारू शकतात. रिमेक व्हर्जनचे दिग्दर्शन डेव्हिड धवन यांनी केले आहे.

 सिनेमाचं शूटिंग बँकॉकमध्ये 

वरूण धवन आणि सारा अली खानचा सिनेमा ‘कुली नंबर १’चे शूटिंग ९ ऑगस्टला सुरू झाले. सध्या या सिनेमाचं शूटिंग बँकॉकमध्ये सुरू आहे. शूटिंगपूर्वी मुहूर्ताची क्लिप वरूणची आई करूणा धवन यांनी दिली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी