कोरोना लढाई: सोनू सूद, सलमान खान, अमिताभनंतर अनुपम खेर यांचा मदतीसाठी हात पुढे, फ्रीमध्ये देणार ही सुविधा

बी टाऊन
Updated May 12, 2021 | 19:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

अनुपम खेर प्रोजेक्ट हील इंडिया हे अभियान सुरू केले आहे. याच्या माध्यमातून ते फ्रीमध्ये भारतातील प्रत्येक कानाकोपऱ्यात मदत आणि इतर सेवा पुरवणार आहेत. 

anupam kher
कोरोना लढाई: अनुपम खेर यांचा मदतीसाठी हात पुढे 

थोडं पण कामाचं

  • अनुपम खेर यांनी अधिकृत ट्विट करत याची माहिती दिली.
  • अनुपम खेर यांच्याशिवाय अनेक बॉलिवूडचे कलाकार मदत करत आहेत
  • अनुपम खेर हे या महामारीविरोधात लढण्यासाठी गरज असलेल्या तपासणी उपकरणाच्या पूर्ततेसाठी प्रोजेक्ट हील इंडिया हे अभियान सुरू आहे

मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेविरोधात भारताचे युद्ध अजूनही सुरू आहे. यासाठी भारताच्या मदतीला प्रत्येकजण उभा आहे. बॉलिवूडचे कलाकारही आता या लढाईविरोधात मैदानात मदतीसाठी उतरले आहेत. यातच वरिष्ठ अभिनेते अनुपम खेरही कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. अनुपम खेर हे या महामारीविरोधात लढण्यासाठी गरज असलेल्या तपासणी उपकरणाच्या पूर्ततेसाठी प्रोजेक्ट हील इंडिया हे अभियान सुरू आहे. याच्या माध्यमातून ते फ्रीमध्ये भारतातील प्रत्येक कानाकोपऱ्यात मदत आणि इतर सेवा पुरवणार आहेत.(corona relief : anupam kher aunches the heel india project) 

याबाबत अनुपम खेर यांनी अधिकृत ट्विट करत याची माहिती दिली. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये एका ट्रकचा व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात तपासणी उपकरणे आहेत. अनुपम खेर यांनी ट्वीट करत म्हटले की अमेरिकेच्या ग्लोबल कॅन्सर फाऊंडेशन आणि भारत फोर्जसोबत मिळून हे काम केले जात आहे. याच्या माध्यमातून हॉस्पिटल्स आणि अॅम्ब्युलन्सला ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स, व्हेंटिलेटर्स, बॅगपॅक ऑक्सिजन मशीन, ट्रान्सपोर्ट व्हेंटिलेटर्स आणि इतर लाईफ सेव्हिंग सामानांची फ्री डिलीव्हरी केली जाणार आहे. 

अनुपम खेर यांच्याशिवाय अनेक बॉलिवूडचे कलाकार मदत करत आहेत. या लिस्टमध्ये सोनू सूद, अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना, सलमान खान, अमिताभ बच्चन, अजय देवगण, विकास खन्ना, असे अनेक कलाकार आहे. 

सोनू सूद उभारणार देशातील सर्वात मोठी 'ब्लड बँक

अभिनेता सोनू सूद मोठ्या प्रमाणावर समाजकार्य करतो. त्याने कोरोना संकटाच्या काळात अनेक गरीबांच्या जेवणाची व्यवस्था केली. तसेच अनेक परप्रांतीय नागरिकांना मुंबईतून सुरक्षितरित्या घरी जाण्यासाठी व्यवस्था करुन दिली. या व्यवस्थेचा खर्च सोनू सूदने उचलला. स्वतःजवळचे पैसे तसेच इतरांनी समाजकार्याच्या हेतूने दिलेला निधी यांचा व्यवस्थित वापर करुन सोनू सूदने हे काम केले. आता सोनू सूद देशातील सर्वात मोठी 'ब्लड बँक' उभारणार आहे. त्याने ट्वीट करुन ही माहिती दिली. देशात दररोज १२ हजार नागरिकांचा मृत्यू वेळेवर रक्त मिळाले नाही म्हणून होतो. या नागरिकांचा विचार करुया. लोकांचे प्राण वाचवण्यासाठी रक्तदान करुया. देशातील सर्वात मोठी 'ब्लड बँक' उभारुया; अशा स्वरुपाची घोषणा अभिनेता सोनू सूद याने केली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी