'या' अभिनेत्यानं बंदी असताना केला जिममध्ये प्रवेश, मग बीएमसीनं केलं असं काही

बी टाऊन
Updated Mar 17, 2020 | 16:16 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Shahid Kapoor gym visit amid coronavirus scare: कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील जिम बंद करण्याचे आदेश दिले गेले आहेत. मात्र अभिनेता शाहिद कपूरला जिममध्ये बघितलं गेलंय.

 corona virus
'या' अभिनेत्यानं बंदी असताना केला जिममध्ये प्रवेश  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • जिम बंद करण्याचे आदेश असल्यानंतरही अभिनेता शाहिद पत्नीसोबत जिममध्ये पोहोचला
  • कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारनं जिम, स्विमिंग पूल, चित्रपट गृह, शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचे दिलेत आदेश.
  • बीएमसी अधिकाऱ्यांनी शाहिद कपूर आणि जिम मालकाला फटकारलं

मुंबई: कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगाला हादरवून सोडलं आहे. अनेक देशांसह भारतातही याची लागण झाली आहे. WHO नं याला महामारी म्हणून घोषित केलंय. यानंतर केंद्र सरकारनं कडक पाऊलं उचलत अनेक गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत. त्यानुसार राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारनं चित्रपट गृह, मॉल्स, जिम, स्विमिंग पूल, शाळा, कॉलेज सर्व बंद केले आहेत. नागरिकांना सावधगिरी बाळगण्यास सरकारकडून वारंवार सांगितलं जातंय. त्यासाठी गरज नसेल तर प्रवास करू नका, गर्दीची ठिकाणं टाळा हे सरकार आवर्जून सांगतंय. देशात कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या वाढतेय. त्यात देशात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांची संख्या महाराष्ट्रात आहे. जिथं एकीकडे सर्वांना बाहेर न पडण्यास सरकार सांगत असताना अभिनेता शाहिद कपूरनं बेजबाबदारपणाची वागणूक केली आहे. त्याच्या या वागणुकीवरून त्याला बीएमसी अधिकाऱ्यांनी चांगलंच फटकारलं आहे.

कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत शुक्रवारपासून सर्व जिम, स्विमिंग पूल्स आणि चित्रपट गृह बंद करण्याचे आदेश दिले गेले आहेत. मात्र रविवारी बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर पत्नी मीरा राजपूतसोबत जिमला पोहोचला. त्या दोघांना रविवारी संध्याकाळी ५.३० वाजता बांद्र्याचं जिम अँटी ग्रेव्हिटीमध्ये बघितलं गेलं. एका वेबसाईटनुसार जिम पूर्ण दिवस बंद होता. मात्र संध्याकाळी शाहिद आणि मीरासाठी २ तासांसाठी जिम उघडलं गेलं होतं. शाहिद आणि मीराचे जिममधील हे फोटो व्हायरल झाले होते. मात्र त्यांच्या या वागणुकीवर कडक कारवाई करत बीएमसीनं सोमवारी ते जिम सिल केलं.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Zig Kinetica_Experience energy in action! #EnergyAmplified #SportTheUnexpected #ZIGKinetica @reebokindia

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) on

एवढंच नव्हे तर शाहिद आणि जिमचे मालक युधिष्ठिर जय सिंह यांना त्यांच्या बेजबाबदार वागणुकीसाठी बीएमसीनं सुनावलं. एच-वेस्ट वार्डचे सहाय्यक नगर आयुक्त विनायकनं वेबसाईटला सांगितलं की, बीएमसीनं राज्य सरकारनं जारी केलेल्या आरोग्य सल्ल्यांचं उल्लंघन करणं आणि सार्वजनिक सुरक्षेसाठी संकट निर्माण केलं म्हणून शाहिद आणि जयसिंह या दोघांना फटकारत नोटिस बजावलीय. अधिकारी म्हणाले जिम सुरू ठेवणं चुकीचं होतं. जर जिम मालकांना राज्य सरकारच्या निर्देशांचं पालन केलं नाही, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि त्यांचं लायसन्स सुद्धा जप्त केलं जावू शकतं.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#jersey the prep begins.

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) on

तर दुसरीकडे जिमचे मालक युधिष्ठिर जयसिंह यांनी बीएमसीनं केलेल्या सर्व दावे नाकारले आहेत. त्यांनी म्हटलं की, जिम शुक्रवारपासून बंद आहेत. आम्हाला सोमवारी जिम सील केल्याची माहिती मिळाली. तिथं कुठलंही कमर्शिअल काम सुरू नाहीय आणि कुणी ट्रेनर सुद्धा नाही. आम्ही सरकारच्या आदेशाचं पालन करतोय. शाहिद बाबत बोलतांना जयसिंह यांनी सांगितलं की, तो माझा जवळचा मित्र आहे आणि ते दोघं वर्कआऊटसाठी जिममध्ये आले नव्हते. खरंतर शाहिदला जखम झालली आहे. ट्रेनर त्यांना उपकरणांचा योग्य पद्धतीनं वापर कसा करायचा ते दाखवत होते. आपल्याला माहितीच आहे शाहिद कपूर त्याच्या आगामी चित्रपट ‘जर्सी’साठी खूप मेहनत घेतोय. सध्या कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे चित्रपटाचं शूटिंग रद्द करण्यात आलंय.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...