धक्कादायक, कोरोना बाधित गायिका कनिका कपूर तीन पार्ट्यांमध्ये ७०० जणांशी संपर्कात 

बी टाऊन
Updated Mar 20, 2020 | 17:15 IST

बॉलिवूडची सुप्रसिद्ध प्लेबॅक सिंगर कनिका कपूर कोरोना पॉझिटीव्ह आढळली आहे. लखनऊवर परतल्यावर कनिकाने तीन पार्ट्यांमध्ये सहभाग घेतला असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

coronavirus kanika kapoor attend three parties contact with 700 people
कनिका कपूरला सरकारने केले कॉरनटाइन  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • बॉलिवूडची सुप्रसिद्ध प्लेबॅक सिंगर कनिका कपूर कोरोना पॉझिटीव्ह आढळली आहे.
  • खनऊवर परतल्यावर कनिकाने तीन पार्ट्यांमध्ये सहभाग घेतला असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
  • या पार्ट्यांमध्ये सुमारे ७०० जणांच्या संपर्कात आली असल्याचेही समोर आले आहे

लखनऊ :  बॉलिवूडची सुप्रसिद्ध प्लेबॅक सिंगर कनिका कपूर कोरोना पॉझिटीव्ह आढळली आहे. लखनऊवर परतल्यावर कनिकाने तीन पार्ट्यांमध्ये सहभाग घेतला असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या पार्ट्यांमध्ये सुमारे ७०० जणांच्या संपर्कात आली असल्याचेही समोर आले आहे. विशेष म्हणजे यात वसुंधरा राजे  आणि यांचे सुपूत्र  भाजपचे खासदार दुष्यंत सिंह उपस्थित होते. त्यानंतर दुष्यंत सिंह संसदेच्या अधिवेशनात भाग घेतला होता. कनिका एअरपोर्टवरून कशी तरी तपासणी न करता निघाली, पण आता तिच्या इमारतीतील सर्व नागरिक दहशतीत आहे.  सध्या मिळालेल्या माहितीनुसार कनिका कपूरला लखनऊमध्ये उत्तर प्रदेश सरकारने कॉरनटाइन केले आहे. 

कनिका कपूर १५ मार्च रोजी लंडनहून लखनऊला आली होती. आजपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार एअरपोर्टवरील ग्राउंड स्टाफच्या मदतीने ती वॉशरूममध्ये लपून तेथून पळून आली. कनिकाने रविवारी लखऊनच्या गॅलेंट अपार्टमेंटमध्ये एक पार्टी केली होती. त्यात लखनऊमधील मोठे अधिकारी आणि नेते शामिल होते. या घटनेनंतर आता ती राहत असलेल्या भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

कनिका नुकतीच लंडनहून परतली असून ती तिच्या कुटुंबियांसोबत लखनऊ येथे राहात होती. तिने भारतात परतल्यानंतर तीन पार्टींना हजेरी लावली असल्याचे तिच्या वडिलांनीच सांगितले आहे. या पार्टींमध्ये ती अनेक लोकांना भेटली होती. हॉटेल ताजमध्ये झालेल्या पार्टीत अनेक मंत्री, आयएस ऑफिसर, सेलिब्रेटी, नेतेमंडळी उपस्थित होते. तिने या पार्टींमध्ये अनेक लोकांसोबत हस्तांदोलन केले असून त्यांच्यासोबत फोटो देखील काढले आहेत. या पार्टीला लोकांसोबतच तिथे काम करणारी मंडळी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. पूर्व खासदार अकबर अहमद डम्पी यांच्या पार्टीत देखील कनिका गेली होती. या पार्टीत भाजपमधील अनेक नेते उपस्थित होते. या पार्टीत ४०० हून अधिक लोकांनी उपस्थिती लावली होती. तसेच एका व्यवासायिकाच्या पार्टीत देखील कनिका उपस्थित राहिली होती.  त्यामुळे तीन पार्ट्यांमध्ये एकूण ७०० जणांच्या संपर्कात कनिका कपूर आल्याचे सांगितले जात आहे. यामुळे कनिकाला भेटलेल्या लोकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कनिकाच्या घरात सहा जण असून त्यांची देखील तपासणी केली जाणार आहे.

प्रत्येक जण भीतीच्या सावटाखाली आहे. नोकर तसेच पार्टीत कॅटरिंगचे काम करणारे आता दहशतीच्या वातावरणात आहेत. ही बातमीही आहे की कनिका लखनऊच्या ताज हॉटेलमध्येही थांबली होती. तसेच शालिमानर गॅलेंट येथील रहिवाशांबाबत बोलायचे झाले तर बहुतांशी रहिवासी ही इमारत सोडून दुसऱ्या जागी राहायला जात आहेत. कनिका कपूरचे संपूर्ण कुटुंबिय या बिल्डिंगमध्ये राहत आहेत. आता त्यांच्या कुटुंबियंना कॉरनटाइन करण्यात येत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार आरोग्य विभागाने कनिकाशी संपर्कात आलेल्या सर्वांना कॉल केला आहे. तसेच त्यांना सेल्फ आयसोलेट होण्यास सांगितले आहे. अजून कोणत्याही व्यक्तीमध्ये कोरोनाचे लक्षणं दिसत नाही. केवळ गायिका पॉझिटिव्ह आढळली आहे. कनिकाने बेबी डॉल, जुगनी, चिट्टियां कलाइया आणि देसी लूक सारखे सुपरहीट गाणे गायले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...