Cruise drugs case : आर्यन खानला जामीनची प्रतिक्षा; आज होणार निकाल, राम कदमांनी आर्यनला दिला पाठिंबा

बी टाऊन
भरत जाधव
Updated Oct 20, 2021 | 10:34 IST

Cruise drugs case । बॉलिवूड अभिनेता (Bollywood actor) शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानच्या (Aryan Khan) भवितव्याचा फैसला आज ठरणार आहे.

Cruise drugs case Aryan Khan awaits bail
Cruise drugs case : आर्यन खानला जामीनची प्रतिक्षा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गेल्या १७ दिवसांपासून आर्यन खान क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणी अटकेत आहे.
  • आर्यन खान काही वर्षांपासून अमंली पदार्थांचे सेवन करत होता, एनसीबीचा दावा
  • आर्यन खानला पाठिंबा देत भाजप आमदार राम कदमांचा राज्य सरकारवर टीका

Cruise drugs case । मुंबई : बॉलिवूड अभिनेता (Bollywood actor) शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानच्या (Aryan Khan) भवितव्याचा फैसला आज ठरणार आहे. क्रुझ ड्रग्ज पार्टी (Cruise Drugs Party) प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींच्या जामीन अर्जावर (Bail Application) मुंबई सत्र न्यायालयातील (Mumbai Sessions Court) विशेष एनडीपीएस कोर्टात (NDPS Court) आज सुनावणी होणार आहे. गेल्या १७ दिवसांपासून आर्यन खान क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणी अटकेत आहे. आर्यनला ३ ऑक्टोबरला अटक करण्यात आली असून मुंबईच्या आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आहे. आर्यनच्या जामीन अर्जावर आज सुनावणी करणाऱ्या विशेष एनडीपीएस कोर्टाने गेल्या सुनावणीत जामीन अर्जावरील निर्णय सुरक्षित ठेवला होता. 

एनसीबीने १४ ऑक्टोबर रोजी विशेष एनडीपीए कोर्टात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जाला विरोध करत दावा केला आहे की, आर्यन मादक पदार्थांचे सेवन करतो. मुंबईतील क्रूझ ड्रग प्रकरणी आर्यन खान गेल्या १७ दिवसांपासून अटकेत आहे. तसेच त्याच्याकडून कारवाई दरम्यान, ड्रग्सही जप्त करण्यात आले होते. 

आर्यन खान काही वर्षांपासून ड्रग्स घेतो : अनिल सिंह 

एनसीबीने आर्यनला ३ ऑक्टोबर रोजी अटक केली होती. नार्कोटिक्स ड्रग्स अॅन्ड सायकॉट्रॉपिक सब्सटेंस अॅक्ट (एनडीपीएस) प्रकरणी विशेष न्यायाधीश व्हीव्ही पाटील यांच्या न्यायालयात आर्यन खान आणि दोन इतर आरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांनी जामीनासाठी याचिका दाखल केली होती. एनसीबीला आपली बाजू मांडण्यासाठी अतिरिक्त सॉलिसीटर जनरल (एएसजी) अनिल सिंह यांनी दावा केला की, असे पुरावे आहेत की, जे दाखवताच आर्यन खान काही वर्षांपासून अमंली पदार्थांचे सेवन करत होता, हे स्पष्ट होईल.  

सुटकेसाठी प्रार्थना सुरू

दरम्यान, भाजपचे आमदार राम कदम यांनी ट्विट करून म्हटले आहे की, 'आर्यन खानला आज जामीन मिळावा अशी प्रार्थना. ते म्हणाले की, 'जामीन मिळणे हा संविधान आणि कायद्यानुसार प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. ही एका विशिष्ट व्यक्तीविरुद्धची लढाई नाही, तर संपूर्ण मानव जातीचे अंमली पदार्थविरोधी युद्ध आहे.'

राम कदमांनी ट्विटच्या इशाऱ्यातून महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, महाराष्ट्र सरकार ड्रग माफियांच्या विरोधात किमान या धोकादायक प्रकरणात उभे राहील अशी आशा होती. पण त्यांच्यावर वसुलीच्या खेळाचे वर्चस्व दिसले. दरम्यान अभिनेत्याच्या मुलासाठी दिल्लीच्या निजामुद्दीन दर्ग्यात प्रार्थनाही करण्यात आली.

आर्यनला बॉलिवूडची साथ मिळाली

तत्पूर्वी मंगळवारी गीतकार जावेद अख्तर यांनी आर्यनच्या सुटकेची मागणी केली. ते म्हणाले की, फिल्म इंडस्ट्री हायप्रोफाईल असल्याने त्रास सहन करत आहे.यापूर्वीही, बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी आर्यनला उघडपणे पाठिंबा दिला आणि त्याला तुरुंगातून बाहेर काढण्याची मागणी केली. सुनील शेट्टी, रवीना टंडन, हंसल मेहता, फराह खान, पूजा बेदी, सलमान खान, सुचित्रा कृष्णमूर्ती, जॉनी लीव्हर यांच्यासह असे अनेक तारे आहेत ज्यांनी आर्यनला पाठिंबा दिला आणि त्याच्या सुटकेची मागणी केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी