Cuttputli movie teaser launch: रक्षाबंधन ( Rakshabandhan ) सिनेमानंतर आता अक्षय कुमारचा ( Akshay Kumar ) कटपुतली ( Cuttputlli ) हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. नुकताच त्याने या सिनेमाचा टीझर रिलीज केला. ट्विटरवर त्याने या सिनेमाचा टीझर रिलीज केला आहे.अक्षय एका पोलिसाच्या भूमिकेत आहे जो एका सीरियल किलरच्या शोधात आहे. “सिरियल किलर के साथ पॉवर नहीं, माइंड गेम खेलना चाहिये,” असे तो टीझरमध्ये म्हणताना दिसत आहे. ( Cuttputlli movie teaser launch Akshay kumar seen as a Cop )
अक्षयने शेअर केले की चित्रपटाचा ट्रेलर शनिवारी रिलीज होईल. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, “ये खेल पॉवर का नहीं, मन का है. और ये मनके खेल में आप और मैं… सब #कटपुतली हैं. @DisneyPlusHS, 2 सप्टेंबरला रिलीज होत आहे. उद्या ट्रेलर रिलीज होणार आहे.”
अधिक वाचा : मुख्यमंत्र्यांच्या 'या' निर्णयावर अमोल कोल्हे आहेत सकारात्मक
रणजीत एम तिवारीचा चित्रपट डिस्ने+ हॉटस्टारवर २ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. यात रकुल प्रीत सिंग देखील आहे. कटपुतल्लीची पटकथा आणि संवाद असीम अरोरा यांचे आहेत. या चित्रपटाची निर्मिती वाशू भगनानी, जॅकी भगनानी आणि दीपशिखा देशमुख यांनी केली आहे.
2020 च्या लक्ष्मी सिनेमानंतर OTT प्लॅटफॉर्मवर अक्षयचा हा दुसरा रिलीज आहे. 2022 मध्ये, अक्षयचा थिएटर रिलीजसह बॉक्स ऑफिसवर चांगला ट्रॅक रेकॉर्ड राहिलेला नाही.
त्याचे तीनही चित्रपट - रक्षाबंधन, सम्राट पृथ्वीराज आणि बच्चन पांडे - बॉक्स ऑफिसवर आपटले.
अधिक वाचा : अशा बोटांच्या मुली असतात खूप लकी, चमकवतात पतीचे भविष्य
गेल्या वर्षी अक्षयचा सूर्यवंशी हा वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आणि प्रेक्षक पुन्हा चित्रपटगृहात येण्यास तयार आहेत असा विश्वास या सिनेमाने इंडस्ट्रीला दिला.कटपुतलीनंतर, अक्षय राम सेतू, ओएमजी 2, सेल्फी, सूरराई पोत्रू आणि गोरखा हे सिनेमा बॉक्स ऑफिसवर झळकणार आहेत. याआधी आलेले अक्षय कुमारचे रक्षाबंधन, बच्चन पांडे आणि सम्राट पृथ्वीराज बॉक्स ऑफिसवर साफ आपटले. या सिनेमातून अक्षय कुमार स्वत:ची जादू दाखवू शकला नाही. त्यामुळे 2021 मध्ये आलेल्या सूर्यवंशी सिनेमानंतर अक्षयच्या खात्यात एकही हीट सिनेमा नाही. त्यामुळे आता ओटीटीवर रिलीज होणाऱ्या या सिनेमाकडून अक्षयला खूप अपेक्षा आहेत.
काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारकडे असलेल्या कॅनडाच्या नागरिकत्वामुळे तो चर्चेत आला होता. सिनेमा फ्लॉप होत असल्याने मित्राने कॅनडाला येऊन जॉब करण्याचा पर्याय सुचवला होता असे अक्षयने तेव्हा म्हटले होते. त्यामुळे आता अक्षय कुमारला त्याच्या आगामी सिनेमांकडून खूपच अपेक्षा आहेत.