'मैदान' सिनेमाला चक्रीवादळाचा तडाखा

बोनी कपूर यांची निर्मिती असलेला 'मैदान' सिनेमा चक्रीवादळाच्या तडाख्याने अडचणीत सापडला आहे.

Cyclone blows up the set of film 'Maidan'
'मैदान' सिनेमाला चक्रीवादळाचा तडाखा 
थोडं पण कामाचं
  • 'मैदान' सिनेमाला चक्रीवादळाचा तडाखा
  • सिनेमाचा सेट मोडावा लागला
  • बोनी कपूर 'मैदान' सिनेमाचे निर्माते

मुंबईः बोनी कपूर यांची निर्मिती असलेला 'मैदान' सिनेमा चक्रीवादळाच्या तडाख्याने अडचणीत सापडला आहे. सिनेमाचे ५० टक्के शूटिंग झाले असताना मागच्या वर्षी मोठे देशव्यापी लॉकडाऊन लागले. यामुळे सिनेमाचा सेट मोडावा लागला. यंदाच्या वर्षी उर्वरित शूटिंगसाठी सेट नव्याने तयार करण्यात आला. पण चक्रीवादळाचा तडाखा बसल्यामुळे सेटचे जवळपास ८० टक्के नुकसान झाले. यामुळे संपूर्ण सेट नव्याने बांधून उर्वरित शूटिंग करावे लागेल. Cyclone blows up the set of film 'Maidan'

'मैदान' या हिंदी सिनेमात अजय देवगण प्रमुख भूमिकेत आहे. बोनी कपूर 'मैदान' सिनेमाचे निर्माते आहे. आधी कोरोना संकट नंतर चक्रीवादळाचा तडाखा यामुळे दोन वेळा शूटिंगमध्ये मोठा व्यत्यय आला. आता संपूर्ण सेट नव्याने तिसऱ्यांदा तयार करुन उर्वरित शूटिंग पूर्ण करण्याची योजना आखण्याचे काम सुरू आहे.

प्रत्येकवेळी पहिल्या सेटसारखाच नवा सेट तयार करण्यात वेळ आणि पैसा खर्च होत आहे. पण सिनेमाची सलगता राखण्यासाठी सेट जसाच्या तसा तयार करणे आवश्यक असल्याचे बोनी कपूर म्हणाले. सततच्या व्यत्ययांमुळे सिनेमाचे बजेट वाढले आहे. 'पण ही बजेटची चिंता करण्याची वेळ नाही. माझे लक्ष सिनेमा पूर्ण करुन शक्य तितक्या लवकर प्रदर्शित करण्यावर आहे. आधीच सिनेमा प्रदर्शित करण्याचे वेळापत्रक कोलमडले आहे'; असे बोनी कपूर यांनी सांगितले.

आठ कॅमेऱ्यांचा सेटअप, आठ मेकअप रूम आणि २६ बाथरूम यांच्यासह 'मैदान' सिनेमाच्या शूटिंगच्या सर्व गरजा पूर्ण करणारा सेट उभारला होता. पण चक्रीवादळाच्या तडाख्याने सेटचे जवळपास ८० टक्के नुकसान झाले. सुदैवाने एवढी हानी झाली तरी सेटवर असलेल्यांपैकी एकही व्यक्ती जखमी झाली नाही; असे बोनी कपूर म्हणाले. सेटवर कोणी जखमी झाले असते तर गंभीर परिस्थिती निर्माण झाली असती. पण तो धोका टळला; असे बोनी कपूर यांनी सांगितले.'मैदान' सिनेमाचा सेट तिसऱ्यांदा उभारण्यासाठी किमान सात कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. वारंवार सेटची निर्मिती होत आहे. तिसऱ्यांदा सेट लावण्यासाठी होणारा खर्च गृहित धरला तर सिनेमाच्या सेटसाठीचे बजेटच ३० कोटींच्या घरात पोहोचणार असल्याची माहिती बोनी कपूर यांनी दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी