Janmashtami 2020: दहीहंडीच्या उत्सवात 'ही' गाणी आणतात खरी रंगत

Dahi handi 2020: श्रीकृष्ण जन्मोत्सव संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जन्माष्टमीत रंगत आणतात ती म्हणजे बॉलिवूडची गाणी. गोपाळकालाच्या दिवशी हमखास ऐकली जाणारी गाणी आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोत

bollywood songs on shri krishna janmashtami
दहीहंडीच्या उत्सवात 'ही' गाणी आणतात खरी रंगत   |  फोटो सौजन्य: YouTube

Janmashtami Bollywood Songs: श्रीकृष्ण जयंती भारतात जन्माष्टमी म्हणून साजरी केली जाते. भारतात मोठ्या उत्साहात आणि आनंदात जन्माष्टमी साजरी केली जाते. श्रीकृष्णाला दूध, दही खूप आवडत असे आणि ज्या मटक्यामध्ये हे पदार्थ ठेवले असत तेथे पोहोचून श्रीकृष्ण ते खात असत. त्यामुळे श्रीकृष्ण जयंतीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. दहीहंडी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उत्साह पहायला मिळतो. या दंहीहंडीत खरी रंगत आणतात ती म्हणजे बॉलिवूडची गाणी. यंदा कोरोनाचे सावट असल्यामुळे दहीहंडी उत्सव महाराष्ट्रात साजरा होणार नाहीये. पण दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात येणारी गाणी ऐकूण तुम्ही आनंद नक्कीच साजरा करु शकता.

जन्माष्टमीच्या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला राधा-कृष्ण यांच्यावर आधारित अशी काही गाणी सांगणार आहोत जी ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच आनंद होईल. पाहूयात कोणती आहेत ही गाणी...

ओ कान्हा सो जा जरा...

प्रसिद्ध सिनेमा बाहुबली-२ मधील ओ कान्हा सो जा जरा हे गाण सुद्दा खूपच प्रसिद्ध आहे. यामध्ये अभिनेत्री अनुष्का शेट्टी संध्याकाळचे भजन गात कन्हैयाला झोपवण्याचा प्रयत्न करत आहे.

राधे राधे


अभिनेता आयुष्मान खुराना याच्या 'ड्रिम गर्ल' सिनेमातील राधे राधे हे गाणं जन्माष्टमीत एक वेगळीच रंगत आणतं. 

राधा कैसे ना जले 

लगान या प्रसिद्ध सिनेमात अभिनेता आमिर खान आणि ग्रेसी सिंग यांच्यावर चित्रित केलेले हे गाणं जन्माष्टमीत तुम्ही ऐकू शकता. हे गाणं उदित नारायण आणि आशा भोसले यांनी गायले आहे.

गो गो गो गोविंदा...

दहीहंडी म्हटलं तर गो गो गोविंदा हे गाणं हमखास मुंबई आणि आसपासच्या शहरांत ऐकायला मिळतं. या चित्रपटात अक्षय कुमारने अभिनय केला असला तरी गाण्यात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि प्रभू देवा यांनी गाण्यावर नृत्य केलं आहे.

मैया यशोदा ये तेरा कन्हैया


हम साथ साथ है या सिनेमात अभिनेत्री करिश्मा कपूर, सोनाली बेंद्रे आणि तब्बू यांनी कन्हैयावर गाणं गायलं आहे. तसेच गाण्यात सुंदर नृत्य सुद्धा केलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी