Salman Khan movie No entry 2 update : अनेक दिवसांपासून सलमान खानचा आगामी चित्रपट नो एन्ट्री 2 बॉलिवूडमध्ये चर्चेत आहे. याआधी या चित्रपटाबाबत बातमी आली होती की, डेझी शाह यात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. डेझी शाहने सलमान खानसोबत ‘जय हो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यामुळे सलमान-डेझी जोडी पुन्हा एकदा हसवायला येणार असे फॅन्सना वाटत होते. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार डेझी शाह नो एन्ट्री २ मध्ये दिसणार नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, या चित्रपटासाठी सलमान खान, अनिल कपूर आणि फरदीन खान यांना साइन करण्यात आले आहे. पहिल्या भागातही हे तिघे एकत्र दिसले होते. इतर कलाकरांच्या नावाबाबत चर्चा सुरू असून, लवकरच निर्माते उर्वरित कास्टही फायनल करतील.
मीडिया रिपोर्ट्सनुसार ‘नो एन्ट्री 2’ मध्ये 10 हिरोइन्स दिसणार आहेत. या चित्रपटात सलमान खान, फरदीन खान आणि अनिल कपूर देखील तिहेरी भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या प्रत्येक पात्रासमोर एक अभिनेत्री झळकेल. ‘नो एन्ट्री 2’ च्या शूटिंगला दिग्दर्शक अनीस बाझमी कधीपासून सुरू करणार आहेत, याबाबत निश्चित माहिती मिळालेली नाही.
पण रिपोर्ट्सनुसार सलमान खान ‘कभी ईद कभी दिवाळी’नंतर ‘नो एन्ट्री 2’ चे शूटिंग सुरू करणार आहे. नो एंट्रीमध्ये सलमान खान तीन वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसणार आहे,
त्यामुळे त्याला अनेक तारखा द्याव्या लागणार आहेत. या चित्रपटात सलमान खान रेडी चित्रपटातील अवतारात दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सलमानच्या फॅन्ससाठी ही पर्वणीच ठरणार आहे. सध्या सलमान खान त्याचा आगामी चित्रपट टायगर ३ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यशराज बॅनर या चित्रपटाचं मोठ्या स्तरावर शूटिंग करत आहे. त्यानंतर सलमान लवकरच साजिद नाडियादवालाच्या बॅनरखाली बनत असलेल्या 'कभी ईद कभी दिवाळी'च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.