Daler Mehndi Human Trafficking case: गायक दलेर मेहंदी यांना मानवी तस्करी प्रकरणी मोठा दिलासा, पटियाला कोर्टाच्या निर्णयाला हायकोर्टाची स्थगिती

बी टाऊन
Updated Sep 15, 2022 | 19:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

Daler Mehndi Human Trafficking case: पटियाला कोर्टाने दलेर मेहंदीला (Daler Mehndi) दोन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेच्या निर्णयाला पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. 2003 च्या मानवी तस्करी प्रकरणात (Human Trafficking case) दलेर मेहेंदी यांनी ही शिक्षा सुनावण्यात आली होती.

daler mehndi gets big relief from high court in human trafficking case
गायक दलेर मेहेंदी यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गायक दलेर मेहंदी यांना पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाचा मोठा दिलासा
  • पटियाला कोर्टाने सुनावलेल्या दोन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेला पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने स्थगिती दिली आहे
  • मानवी तस्करीप्रकरणी सुनावली होती शिक्षा

Daler Mehndi Human Trafficking case:  गायक दिलर मेहंदीला (Daler Mehndi) 2003 च्या मानवी तस्करी प्रकरणात (Human Trafficking case) पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने दिलासा दिला आहे. याच प्रकरणात जुलैमध्ये गायकाला दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. निकाल आल्यापासून दलेर मेंहदी पटियाला तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. यापूर्वी 2018 मध्येही त्याला तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. (daler mehndi gets big relief from high court in human trafficking case) 

पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने पटियाला न्यायालयाच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.  दलेर मेहंदीला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा पटियाला हायकोर्टाने सुनावली होती. 2003 च्या मानवी तस्करी प्रकरणात त्याला ही शिक्षा सुनावण्यात आली होती. 2018 मध्ये देखील त्यांना याच प्रकरणात शिक्षा आणि 1000 रुपये दंड ठोठावण्यात आला होता.

अधिक वाचा : आलियाच्या बेबी शॉवरसाठी 'या' स्टार्सना खास आमंत्रण

कायदेशीर टीमचे स्टेटमेंट

पटियाला कोर्टाने दलेर मेंहदी यांना दोन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा दिल्यावर त्यांच्या कायदेशीर टीमने हायकोर्टात जाण्याचा निर्णय घेतला. न्यायालयाचा निर्णय आमच्या बाजूने नाही, त्यामुळे आम्ही लवकरात लवकर हायकोर्टात दाद मागू, असे विधान विधी पथकाने केले होते. आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. पटियाला पोलिसांनी बख्शीश सिंग यांच्या तक्रारीच्या आधारे दलेर मेहंदी आणि त्याचा भाऊ शमशेर मेहंदी यांच्यावर कारवाई केली होती. 

अधिक वाचा : 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीने जेलमध्ये घेतली सुकेशची भेट?

दलेर मेंहदी यांच्यावर काय होता आरोप


बख्शीश सिंग यांनी दिलेल्या तक्रारीत दलेर मेहंदी आणि त्याचा भाऊ शमशेर यांनी कॅनडाला पाठवण्यासाठी बक्षीस सिंग यांच्याकडून 13 लाख रुपये घेतल्याचा आरोप केला आहे. पण त्यांना ना कॅनडाला पाठवले ना त्यांचे पैसे परत केले. बख्शीश सिंग यांच्याशिवाय अन्य 30 तक्रारकर्त्यांनी दलेर मेहंदीवर मानवी तस्करी केल्याचा आरोप केला होता. बॉलिवूडला अनेक हिट गाणी देणाऱ्या दलेर मेहंदींवर 2003 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दलेर मेहंदीवर भाऊ समशेरसोबत अवैध इमिग्रेशन ग्रुप चालवल्याचा आरोप होता. याद्वारे 1998 ते 1999 या कालावधीत त्याने 10 जणांना परदेशात नेल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी