Darlings Movie trailer release date : 'Darlings' सिनेमातील फोटो शेअर करत आलिया भट्टने रिव्हिल केली सिनेमाच्या ट्रेलर रिलीजची डेट

बी टाऊन
Updated Jul 23, 2022 | 20:02 IST | टाइम्स नाऊ मराठी

Darlings Movie trailer release date: आलिया भट्टसोबत (Alia Bhatt) 'डार्लिंग्स' (Darlings) मध्ये शेफाली शाह, विजय वर्मा (Vijay Verma) आणि रोशन मॅथ्यू यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. आलिया भट्टच्या आगामी सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, आलियाने 'डार्लिंग्स'चे नवीन पोस्टर शेअर करताना सिनेमाच्या ट्रेलरच्या रिलीजची तारीखही जाहीर केली आहे.

Darlings Movie trailer release date out photos shared by Alia bhatt
'डार्लिंग्स' सिनेमाच्या ट्रेलरची रिलीज डेट आऊट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 'डार्लिंग्स' सिनेमाच्या ट्रेलरची रिलीज डेट आऊट
  • आलिया भट्ट आणि शेफाली शाह प्रमुख भूमिकेत
  • आलिया भट्टने इन्स्टाग्रामवर शेअर केले फोटोज

Darlings Movie trailer release date out :  आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी 'डार्लिंग' (Darlings) या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. शाहरुख खान (Shahrukh khan ) आणि आलिया भट्ट  (Alia Bhatt) यांच्या निर्मितीखाली तयार होणाऱ्या 'डार्लिंग्स'मध्ये शेफाली शाह, विजय वर्मा आणि रोशन मॅथ्यू यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 
आलिया भट्टच्या आगामी सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, आलियाने 'डार्लिंग्स'चे नवीन पोस्टर शेअर करताना चित्रपटाच्या ट्रेलरच्या रिलीजची तारीखही जाहीर केली आहे. ( Darlings Movie trailer release date out photos shared by Alia bhatt )


आलियाने सोशल मीडियावर डार्लिंगचे (Darlings) नवे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये आलिया शेफाली शाहसोबत दिसत आहे. आलिया प्रिंटेड कुर्ता आणि निळ्या दुपट्ट्यात तर शेफाली जांभळ्या रंगाच्या प्रिंटेड सूटमध्ये दिसत आहे. दोघेही गाडीत बसून एकमेकांकडे बघत आहेत.

याशिवाय आलियाने अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये चित्रपटातील इतर स्टार कास्ट देखील दिसू शकतात.

पोस्टर शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले- 'सध्या फोटो पाहा. सोमवारी बॅटिंग दाखवेन. या पोस्टरवर अनेक सेलिब्रिटी आणि आलियाच्या फॅन्स-फॉलोअर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अधिक वाचा : तुम्ही फ्रीज चुकीच्या दिशेने तर ठेवत नाही ना? हे लक्षात ठेवा


डार्लिंग्सच्या ट्रेलरबद्दलही अनेकांना उत्सुकता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर अनेकांनी हार्ट आणि फायर इमोजीच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिल्या आहेत.


आलिया भट्टची सासू नीतू कपूर हिनेही डार्लिंग्सच्या नवीन पोस्टरवर प्रतिक्रिया दिली आहे. आलिया भट्ट, शेफाली शाह आणि विजय वर्मा स्टारर डार्लिंग्सचा ट्रेलर २५ जुलैला रिलीज होणार आहे.

अधिक वाचा : चिमुकलीनं आंबा मागितल्याचा आला राग


चित्रपटाचा ट्रेलर एका इव्हेंटमध्ये रिलीज होणार असून,त्यात आलियाही असणार आहे. प्रेग्नेंसीची घोषणा झाल्यानंतर आलिया पहिल्यांदाच एका कार्यक्रमात दिसणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी