Rishi Kapoor: दाऊद इब्राहिम होता ऋषी कपूर यांच्या शूजचा फॅन; जाणून घ्या हा मजेदार किस्सा

बी टाऊन
Updated Mar 31, 2022 | 10:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

Dawood Ibrahim Fan of Actor shoes | अंडरवर्ल्डच्या धोक्यापासून बॉलिवूड इंडस्ट्री देखील दूर राहू शकली नाही. बॉलिवूडसोबत अंडरवर्ल्डचे कनेक्शन खूप जुने आहे. त्यामध्ये गुलशन कुमारच्या हत्येचा किस्सा असो किंवा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने प्रसिध्द निर्माता जावेद सिद्दीकी यांची केलेली हत्या. बॉलिवूड अभिनेत्रींच्या अंडरवर्ल्डच्या लोकांसोबतच्या अफेअरच्या चर्चाही फिल्मी दुनियेत नेहमीच होत असतात.

Dawood Ibrahim was a fan of Rishi Kapoor's shoes
दाऊद इब्राहिम होता ऋषी कपूर यांच्या शूजचा फॅन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अंडरवर्ल्डच्या धोक्यापासून बॉलिवूड इंडस्ट्री देखील दूर राहू शकली नाही.
  • बॉलिवूड अभिनेत्रींच्या अंडरवर्ल्डच्या लोकांसोबतच्या अफेअरच्या चर्चाही फिल्मी दुनियेत नेहमीच होत असतात.
  • ऋषी कपूर यांनी पत्नी नितू कपूर सोबत दुबईमध्ये शूज खरेदी केले.

Dawood Ibrahim Fan of Actor shoes | मुंबई : अंडरवर्ल्डच्या धोक्यापासून बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्री देखील दूर राहू शकली नाही. बॉलिवूडसोबत अंडरवर्ल्डचे कनेक्शन खूप जुने आहे. त्यामध्ये गुलशन कुमारच्या हत्येचा किस्सा असो किंवा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने प्रसिध्द निर्माता जावेद सिद्दीकी यांची केलेली हत्या. बॉलिवूड अभिनेत्रींच्या अंडरवर्ल्डच्या लोकांसोबतच्या अफेअरच्या चर्चाही फिल्मी दुनियेत नेहमीच होत असतात. असाच एक किस्सा ऋषी कपूर यांच्याशी संबंधित आहे. त्याच्या चाहत्यांच्या यादीत डॉन दाऊद इब्राहिमचाही समावेश आहे. सर्वात मोठा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा ऋषी कपूरचा मोठा चाहता होता. तो त्यांना खूप पसंद करायचा. ऋषी कपूर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात दाऊदसोबतच्या खास नात्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. (Dawood Ibrahim was a fan of Rishi Kapoor's shoes). 

अधिक वाचा : महाराष्ट्र लोकसेवा आयोग पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर

ऋषी कपूरचा फॅन होता दाऊद 

खुल्लम खुल्ला या त्यांच्या आत्मचरित्रात ऋषी कपूर यांनी दाऊद इब्राहिमच्या भेटीची गोष्ट सांगितली आहे. दरम्यान दाऊदचा एक माणूस ऋषी कपूर यांच्याकडे फोन घेऊन आला होता. तो म्हणाला की दाऊद साहेबांना तुमच्याशी बोलायचे आहे. यानंतर दाऊदने ऋषी कपूर यांना चहासाठी बोलावले. यानंतर ऋषी कपूर दाऊदला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले. दाऊदला दारूचे शौक नसल्याने त्याने ऋषी कपूर यांना चहासाठी बोलावले. एकदा ऋषी कपूर आणि नीतू कपूर दुबईतील एका मॉलमध्ये पोहोचले होते. यावेळी दाऊदही त्याच्यासोबत होता.

दाऊदने ऋषी कपूर यांना शॉपिंग करण्यास सांगितले, मात्र ऋषी कपूर यांनी या गोष्टीला नकार दिला. तेव्हा दाऊदने म्हटले की तुम्ही काहीही घ्या, कारण तो त्यांचा खूप सन्मान करायचा आणि त्याला त्यांच्यासोबच शॉपिंग करायची होती. लक्षणीय बाब म्हणजे त्या दरम्यान ऋषी कपूर यांनी पत्नी नितू कपूर सोबत दुबईमध्ये शूज खरेदी केले. ऋषी कपूर यांनी लिहलेल्या पुस्तकात म्हटले की, त्यावेळी दाऊदसोबत ८-९ अंगरक्षक होते. ऋषी कपूर आणि दाऊदने तब्बल ४ तास सोबत वेळ घालवला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर चर्चा केली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी