मृत्यूचे संकेत: 'कल हम रहे न रहें कल.. याद आऐंगे ये पल.... ' ये छोटीशी जिंदगी, गाणं गायल्यानंतर केकेनं घेतला जगाचा निरोप

बी टाऊन
भरत जाधव
Updated Jun 01, 2022 | 11:19 IST

केके या नावाने प्रसिद्ध असलेले गायक (Singer) कृष्णकुमार कुननाथ (Krishnakumar Kunnath) यांचे मंगळवारी कोलकाता येथे निधन झाले. केके यांचं हृदयविकाराच्या (Heart Attack) झटक्यानं निधन झाले आहे. वयाच्या 53 व्या वर्षी कोलकात्यात अखेरचा श्वास घेतला. केकेने आपल्य गाण्याने अनेक तरुणांना वेड लावलं होतं.

'Kal Hum Rahe Na Rahein Kal ... Keke sang a song and said goodbye to the world
'कल हम रहे न रहें कल... गाणे गात केकेनं घेतला जगाचा निरोप   |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात तरुणांमध्ये त्याची ही गाणी खूप लोकप्रिय झाली होती.
  • अनेक सेलिब्रिटींनी केके यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

मुंबई : केके या नावाने प्रसिद्ध असलेले गायक (Singer) कृष्णकुमार कुननाथ (Krishnakumar Kunnath) यांचे मंगळवारी कोलकाता येथे निधन झाले. केके यांचं हृदयविकाराच्या (Heart Attack) झटक्यानं निधन झाले आहे. वयाच्या 53 व्या वर्षी कोलकात्यात अखेरचा श्वास घेतला. केकेने आपल्य गाण्याने अनेक तरुणांना वेड लावलं होतं. परंतु त्याने गायलेलं भावनिक गाणं 'कल हम रहे न रहें कल.. याद आऐंगे ये पल हे ऐकलं की, डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. केकेनं जगाचा निरोप घेण्याआधी हेच गाणं गायलं असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

केकेचा शेवटचा स्टेज परफॉर्मन्सही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. केकेची ही शेवटचा कार्यक्रम असेल हे कोणालाच माहीत नव्हते.  महाविद्यालयीन कार्यक्रमात केकेने आपल्या करिअरमधील सर्व सुपरहिट गाणे एकामागोमाग गायली. याविषयी बोलताना या कार्यक्रमात सहभागी झालेला विद्यार्थी म्हणाला की, केकेने स्टेजवर एकामागून एक गाणे सादर केले. त्याला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले. केके आता नाही हे अविश्वसनीय असल्याच म्हटलं आहे. 

दरम्यान, केकेच्या शेवटचा स्टेज परफॉर्मन्स व्हिडिओ whatsinthenews इन्स्टा हँडल नावाने शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही गायक स्टेजवर माइक घेऊन परफॉर्म करताना पाहू शकता.   हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले आहे की, "गायक #KK आता राहिले नाहीत. त्यांनी आज संध्याकाळी नझरूल मंच येथे एका महाविद्यालयीन कार्यक्रमात परफॉर्म केले. गायक केके यांच्या शेवटच्या परफॉर्मन्सचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. केकेला ‘पल’ आणि ‘यारों’ सारख्या गाण्यांसाठी ओळखले जाते.  

दरम्यान 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात तरुणांमध्ये त्याची ही गाणी खूप लोकप्रिय झाली होती. ‘हम दिल दे चुके सनम’, ‘बचना ए हसीनो’ मधील ‘खुदा जाने’, ‘काइट्स’ मधील ‘जिंदगी दो पल की’, ‘जन्नत’ मधील ‘जन्नत’, ‘तुही मेरी शब है’ या गाण्यांतून केके थेट हृदयातील भावनांना हात घालणारा गायक होता. ‘गँगस्टर’ मधील ‘आँखों में तेरी’ मधील ‘ओम शांती ओम’, ‘बजरंगी भाईजान’मधील ‘तू जो मिला’ अशी अनेक गाणी त्याने गायली आहेत.  

सेलिब्रिटींनी केला शोक व्यक्त

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, गायक अरमान मलिक, अभिनेत्री सोनल चौहान आणि मुनमुन दत्तासह अनेक सेलिब्रिटींनी केके यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. केके सर या जगात आता नाहीत, यावर आमचा विश्वासच बसत नाही, असे म्हणत अरमानने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायकांपैकी केके एक आहेत. त्यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रासह विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.

केके बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायक होते. त्यांनी अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. केके यांची गाणी आजही लोकप्रिय आहेत.  'खुदा जाने' सारखे रोमँटिक गाणे, 'इट्स द टाइम टू डिस्को' आणि 'कोई कहे कहता रहे' सारखे डान्स नंबर्स तसेच 'तडप तडप के इस दिल से' सारखे सॅड सॉन्गस आजही लोकांच्या मनावर राज्य करत आहेत.   

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी