Deepika Padukone and Ranveer Singh: भर समुद्रात दीपिका पदुकोणने रणवीर सिंगच्या थोबाडीत मारली? सोशल मीडियावर video viral

बी टाऊन
Updated Nov 03, 2022 | 13:47 IST | टाइम्स नाऊ मराठी

Deepika-Ranveer Viral Yacht Video: काही दिवसांपूर्वी रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोणमध्ये (Deepika Padukone) काहीतरी बिनसल्याच्या बातम्या येत होत्या. एवढंच नाही तर यांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चाही बी-टाऊनमध्ये सुरू होती. मात्र, सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओने Video viral on social media) या साऱ्या चर्चांना पूर्णविराम दिलेला आहे. दीपिका आणि रणवीर या व्हिडिओत मजा-मस्ती करताना दिसत आहेत. त्यावरून या दोघांमध्ये सारं काही आलबेल असल्याचंच स्पष्ट झालं आहे.

Deepika Padukone and Ranveer Singh having fun a yacht
दीपिका-रणवीरमध्ये सारं काही आलबेल?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दीपिकाने रणवीर सिंगच्या थोबाडीत मारली?
  • दीपिका-रणवीरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
  • दीपिका-रणवीरमध्ये सारं काही आलबेल

Deepika-Ranveer Viral Yacht Video: काही दिवसांपूर्वी रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोणमध्ये (Deepika Padukone) काहीतरी बिनसल्याच्या बातम्या येत होत्या. एवढंच नाही तर यांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चाही बी-टाऊनमध्ये सुरू होती. मात्र, सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओने (Video viral on social media) या साऱ्या चर्चांना पूर्णविराम दिलेला आहे. दीपिका आणि रणवीर या व्हिडिओत मजा-मस्ती करताना दिसत आहेत. त्यावरून या दोघांमध्ये सारं काही आलबेल असल्याचंच स्पष्ट झालं आहे. (Deepika Padukone and Ranveer Singh having fun a yacht)

अधिक वाचा : दिघेंच्या मृत्यूचे रहस्य उलगडणार? धर्मवीरचा सिक्वेल येणार

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण हे इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कपल्सपैकी एक आहेत. दीपवीरबद्दल त्यांच्या चाहत्यांना नेहमीच अधिक गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. काही दिवसांपूर्वी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्यात काहीतरी बिनसल्याच्या बातम्या येत होत्या. एवढंच नाही तर दोघेही वेगळं होण्याचा विचार करत असल्याचंही म्हटलं होतं.  मात्र, या बातम्यांवर, रणवीर आणि दीपिकाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे त्यांचे चाहते थोडे नाराज झाले. पण, आता त्या दोघांमध्ये सारं काही आलबेल असल्याचं समोर आलं आहे. नुकताच दीपिका-रणवीरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही मस्ती करताना दिसत आहे. दीपिकाच्या चेहऱ्यावर हसू दिसत आहे. दीपवीरचा हा व्हिडिओ पाहून त्यांचे चाहतेही खुश झाले आहेत. 

दीपिकाने रणवीरला थोबाडीत मारली?

सोशल मीडियावर  व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग मस्ती करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये एका ठिकाणी रणवीर त्याची पत्नी दीपिकाला चिडवतोय त्यामुळे दीपिका त्याला गमतीने मारताना दिसत आहे. दीपिका आपल्या पतीला लाडाने, मस्करीत मारताना दिसत आहे. या व्हिडिओमधील त्यांची केमिस्ट्री अफलातून आहे.  दीपिका-रणवीरने त्यांचं प्रेम कधीच लपवलेलं नाही, त्यामुळे या व्हिडिओतही त्यांची केमिस्ट्री खुललेली आहे. 

अधिक वाचा : अक्षय कुमार साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका


पठाणमध्ये दीपिकाचा स्टायलिश अंदाज

शाहरुख खानचा नवा सिनेमा पठाणचा टीझर रिलीज झालेला आहे. या सिनेमात दीपिका पदुकोणचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळत आहे. सिनेमात दीपिका एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. दीपिका-शाहरुखची जोडी सिल्व्हर स्क्रीनवर कायमच हीट ठरलेली आहे. सध्या पठाण सिनेमाबाबतही तोच ट्रेंड पाहायला मिळत असल्याचं म्हणावं लागेल. शाहरुख-दीपिकाच्या या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी