अभिनेत्री दीपिका पदुकोणने 'या' कारणासाठी केली तिच्या कपड्यांची विक्री

बी टाऊन
Updated Oct 14, 2019 | 12:19 IST | चित्राली चोगले

अभिनेत्री दीपिका पदुकोण ही बॉलिवूडची ए-लिस्ट स्टार आहे. तिच्या अभिनयासाठी ती जितकी लोकप्रिय आहे तितकीच ती अनेकदा तिच्या चॅरिटीच्या कामांसाठी पण चर्चेत असते.

deepika padukone auctions her wardrobe for charity gets sold out within 2 hours ranveer singh 
अभिनेत्री दीपिका पदुकोणने 'या' कारणासाठी केली तिच्या कपड्यांची विक्री 

थोडं पण कामाचं

  • दीपिका पदुकोणचा चॅरिटीसाठी स्तुत्य उपक्रम
  • जागतिक मानसिक आरोग्य दिनाचं निमित्त साधत केली स्वतःच्या कपड्यांची विक्री
  • अवघ्या दोन तासात सगळे कपडे आणि ज्वेलरीची झाली विक्री

मुंबई: बॉलिवूडच्या ए–लिस्ट अभिनेत्रींपैकी एक असेली दीपिका पदुकोण हिची प्रसिद्धी ग्लोबल आहे. ती देशात जितकी लोकप्रिय आहे तितकेच तिचे चाहते जगभर पसरलेले आहेत. ती अनेकदा अभिनयासोबत बरीच चॅरिटी करताना सुद्धा दिसते. बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच एखादा कलाकार आपल्या डिप्रेशनबद्दल उघडपणे बोलताना दिसला आणि ती होती दीपिका. दीपिकाने हे केल्यावर तिचं प्रचंड कौतुक झालं होतं. हाच तिचा मानसिक आरोग्याचा लढा तिने पुढे चालू ठवेला आहे. याच संदर्भात तिने नुकतीच अजून एक कौतुकास्पद मोहीम राबवली आहे. अभिनयात उत्तम कमगिरी करत असतानाच दीपिकाने मानसिक आरोग्याविषयी एक जगजागृती मोहीम राबवली आहे.

दीपिकाने आपल्या 'द लिव लव लाफ फाउंडेशन'ला मदत करण्यासाठी नवा उपक्रम राबवला आहे. दीपिकानं सोशल मीडियाद्वारे तिच्या एका नवीन संकल्पनेची माहिती दिली. मानसिक आरोग्याला हातभार म्हणून तिने एक अनोखा उपक्रम राबवला. तिनं संकेतस्थळाद्वारे आपलं क्लोसेट विक्रीसाठी ठेवलं आणि त्याला अवघ्या काही वेळातच उत्तम प्रतिसाद मिळताना दिसला. विक्री सुरु करण्याच्या अवघ्या २ तासात यावरील सर्व कपडे आणि इतर वस्तू विकल्या देखील गेल्या. खास म्हणजे जागतिक मानसिक आरोग्य दिवसाचं निमित्त साधत तिने हा उपक्रम सुरु केला.

 

 

या उपक्रमाला आलेला प्रतिसाद बघता दीपिका फारच भारावून गेली. तिने यापुढे जाऊन आता एक अजून घोषणा केली आहे. तिचा हा मानसिक आरोग्याचा लढा पुढे चालवण्यासाठी तिचा हा अनोखा उपक्रम फारच यशस्वी ठरला आहे. त्यामुळे आता दर महिन्याला दीपिका तिचे काही खास कपडे आणि ज्वेलरी आपल्या वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवणार असल्याचं तिने जाहीर केलं आहे. ग्राहकांना दीपिकाच्या या खासगी वेबसाईटद्वारे वस्तू विकत घेता येणार आहेत. कपडे आणि ज्वेलरीच्या विक्रीतून आलेली रक्कम दीपिका तिची स्वयंसेवी संस्था 'द लिव लव लाफ फाउंडेशन'साठी वापरणार आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

 

 

 

दीपिकाची ही नवीन मोहीम फत्ते झाल्यावर तिच्या सोशल मीडियाद्वारे तिने तिच्या तमाम चाहत्यांचे आभार मानले आहेत. स्वत: डिप्रेशन म्हणजेच नैराश्येच्या गर्तेत अडकलेल्या दीपिकानं 'द लिव लव लाफ फाउंडेशन'ची स्थापना केली. याद्वारे मानसिक आरोग्यावर जनजागृती करण्यात येते तसेच नैराश्येच्या गर्तेत अडकलेल्या अनेकांना त्यातून बाहेर येण्यासाठी मदतीचा हात दिला जातो. दीपिकाच्या या चॅरिटीसाठी तिला खूप शुभेच्छा. या व्यतिरिक्त कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर दीपिका येत्या जानेवारीमध्ये छपाक या अॅसिड अटॅक सरवायवर लक्ष्मी अग्रवालच्या आयुष्यावर आधारित सिनेमात झळकणार आहे. त्यात ती खुद्द लक्ष्मीची भूमिका साकारणार असून १० जानेवारी २०२०रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. तसंच ती लवकरच पती रणवीर सिंगसोबत ८३ या कपिल देव यांच्या बायोपिकमध्ये सुद्धा दिसेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी