छतावर किस करताना दिसले दीपिका आणि विक्रांत, छपाकचा सीन व्हायरल

बी टाऊन
Updated Apr 22, 2019 | 16:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

सध्या दीपिका पदुकोण आणि विक्रांस मेसी स्टारर छपाक या सिनेमाचे शूटिंग दिल्लीमध्ये सुरू आहे. या सिनेमाची कहाणी अॅसिड हल्ल्यातून बचावलेली लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित आहे. 

chhapaak
छपाक  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: लग्नानंतर बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण छपाक या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. दीपिका आणि विक्रांत मेसी यांच्या छपाक सिनेमाची शूटिंग दिल्लीमध्ये सुरू आहे. या सिनेमाची कहाणी अॅसिड हल्ल्यातून बचावलेली लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित आहे. गेल्या काही दिवसांपासून या सिनेमाच्या सेटचे फोटो आणि व्हिडिओज व्हायरल होत आहेत. आता या सिनेमातील आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात दीपिका आणि विक्रांत एकमेकांना किस करताना दिसत आहे. 

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दीपिका आणि विक्रांत छतावर असून एकमेकांना किस करत आहे. यादरम्यान दीपिकाने गुलाबी रंगाचा कुर्ता घातला आहे तर विक्रांतने हलक्या चॉकलेटी रंगाचा कुर्ता घातला आहे. दुसऱ्या घरांच्या छतावरून अनेक लोक त्यांना किस करताना पाहत आहे. आआधीही या शूटिंगचा एक व्हिडिओ समोर आला होता. यात दीपिका शाळेच्या युनिफॉर्ममध्ये दिसली होती. 

 

 

या सिनेमाच्या शूटिंगचे अनेक व्हिडिओ तसेच फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता या सिनेमाचे शूटिंग मुंबईत होणार आहे. या सिनेमात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका यात काम करण्यासोबतच सिनेमाची निर्मितीही करत आहे. हा सिनेमा पुढच्या वर्षी १० जानेवारीला रिलीज होत आहे. यात दीपिकाचे नाव मालती आहे. मेघनाने या आधी राझी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट ठरला होता. 

'छपाक'च्या मेकअपसाठी दीपिकाला लागतात ४ तास

छपाक या सिनेमासाठी शूटिंगसाठी येताना दीपिकाला ४ तास लागतात. त्यानंतर या सिनेमाचे शूटिंग सुरू होते. त्यानंतर चेहऱ्याला लावलेला हा मेकअप काढण्यासाठी तितकाच वेळ लावतो. दररोज तसाच मेकअप करणे हे खरंतर मोठं कौशल्याचे काम असते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
छतावर किस करताना दिसले दीपिका आणि विक्रांत, छपाकचा सीन व्हायरल Description: सध्या दीपिका पदुकोण आणि विक्रांस मेसी स्टारर छपाक या सिनेमाचे शूटिंग दिल्लीमध्ये सुरू आहे. या सिनेमाची कहाणी अॅसिड हल्ल्यातून बचावलेली लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित आहे. 
Loading...
Loading...
Loading...