Deepika Padukone’s Ranbir Kapoor tattoo appears faint at the Cannes red carpet, has she lasered it? : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर दिसली. या सोहळ्यात दीपिकाच्या मानेवर असलेला आर के नावाचा टॅटू पुसट झालेला दिसला. सोशल मीडियावर दीपिकाच्या मानेवरील पुसट झालेल्या टॅटूचे फोटो व्हायरल होत आहेत. या निमित्ताने दीपिकाचे रणबीर सोबतचे नाते आणि टॅटूची गोष्ट पुन्हा चर्चेत आली आहे.
Alia Bhatt : आलिया भट्ट हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी रवाना, अर्जून कपूरची खास कमेंट
दीपिका पादुकोणच्या 'कान्स' वाल्या एयररिंग्सच्या खाली शांतिप्रियाची बाॅडी
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह याच्यासोबत २०१८ मध्ये लग्न केले. या लग्नाच्या काही वर्षे आधी दीपिका रणबीर कपूर सोबत लग्न करेल अशी चर्चा होती. दीपिका आणि रणबीर अनेकदा एकत्र दिसले होते. दीपिकाने मानेवर आर के नावाचा टॅटू करून घेतला. कार्यक्रमांच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या दीपिकाचे फोटोग्राफर अनेक फोटो काढायचे. यातील कित्येक फोटोंमध्ये दीपिकाच्या मानेवरील आर के नावाचा टॅटू स्पष्ट दिसायचा. हा टॅटू म्हणजे दीपिकाने रणबीर कपूर विषयी व्यक्त केलेले प्रेम अशी चर्चा सुरू झाली. पण काही दिवसांतच हे सर्व बिनसलं. कपूर कुटुंबातील सदस्य आणि दीपिका यांच्यात काही जमत नसल्याच्या बातम्या येऊ लागल्या. पुढे दीपिका रणबीर एकमेकांपासून दूर राहू लागले. दीपिकाने रणवीर सिंह सोबत लग्न केले. नंतर अनेक कार्यक्रमात दीपिका दिसली. या कार्यक्रमांच्या ठिकाणी काढलेल्या फोटोंमध्ये आर के टॅटू दिसला नाही. कारण दीपिका हा टॅटू मेकअपच्या मदतीने झाकून टाकत होती. पण कान्स फेस्टिव्हलच्यावेळी दीपिकाने टॅटू झाकला नव्हता. यामुळे फोटोत टॅटू दिसला. पण यावेळी तो टॅटू एकदम पुसट दिसला. काही वर्षांपूर्वीच्या फोटोंमध्ये दिसणारा टॅटू आणि कान्सच्या निमित्ताने काढलेल्या फोटोंमध्ये दिसणारा टॅटू एकच असला तरी आता टॅटू खूपच पुसट झाला आहे. दीपिकाने टॅटू पुसट व्हावा यासाठी लेझर ऑफरेशन करून घेतल्याची चर्चा आहे. यात किती तथ्य आहे ते माहिती नाही. पण टॅटू फोटोत पुसट दिसला.
दीपिकाचे रणवीर सिंह सोबत २०१८ मध्ये लग्न झाले तर रणबीर कपूरचे २०२२ मध्ये आलिया भट्ट सोबत लग्न झाले. रणबीरच्या लग्नानंतर पहिल्यांदा दीपिकाच्या मानेवरील आर के नावाचा टॅटू दिसल्यामुळे चर्चेला उधाण आले. पण दीपिका, रणवीर, रणबीर, आलिया यांच्यापैकी कोणीही टॅटू विषयावर वक्तव्य केलेले नाही. यामुळे आठवणी मागे ठेवून दोन्ही जोडपी आपापल्या जीवनात पुढे जात आहेत आणि सर्व काही सुरळीत आहे हे सांगण्यासाठी मुद्दाम दीपिकाने कान्सच्या रेड कार्पेटवर येताना आर के टॅटू फोटोत दिसेल अशी खबरदारी घेतल्याची शक्यता व्यक्त होत आहे.