दीपिका पदुकोणनं अशी वाचवली होती आपल्या पतीची 'इज्जत'

बी टाऊन
पूजा विचारे
Updated Jan 03, 2020 | 16:51 IST

When Deepika Padukone sewed Ranveer Singh ripped pants: दीपिका पदुकोणनं काही दिवसांपूर्वीच द कपिल शर्मा शो मध्ये एक किस्सा सांगितला. रणवीर सिंग संदर्भात हा किस्सा होता. 

Deepika Padukone Ranveer Singh
दीपिका पदुकोणनं अशी वाचवली होती आपल्या पतीची 'इज्जत'  |  फोटो सौजन्य: Instagram

बॉलिवूड एक्ट्रेस दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग बी-टाऊनमधील सर्वात फेवरेट कपल्सपैकी एक आहेत. दोघांनी 2018 ला इटलीतल्या लेक कोमोमध्ये लग्नगाठ बांधली. याआधी दोघं बऱ्याच वर्षापासून एकमेकांना डेट करत होते. मात्र त्यांनी याबाबतचा कधीच स्विकार केला नाही. पण दोघंही एकत्र हँगआऊट करताना दिसायचे. लग्नानंतर दीपिका आणि रणवीर दोघंही मोकळ्या मनानं एक दुसऱ्यांबद्दल बोलत असतात. अशातच दीपिकानं आपला पती रणवीरसोबतचा एक मजेशीर किस्सा शेअर केला आहे. 

काही दिवसांपूर्वीच दीपिका द कपिल शर्मा शोमध्ये पोहोचली. जेथे तिथे रणवीरबद्दल एक खुलासा केला. तिनं सांगितलं की, आम्ही दोघं बार्सिलोनामध्ये म्यूझिक फेस्टिवलला गेले होते. तिथे दीपिकानं रणवीरची पॅन्ट शिवली होती. किस्सा शेअर करताना दीपिकानं सांगितलं की, आम्ही बार्सिलोनामधल्या एका म्युझिक फेस्टिवलमध्ये होतो. रणवीर एक सैल पॅन्ट घातली होती आणि विचित्र डान्स स्टेप करत होता. तेव्हा अचानक एक वेगळाचा आवाज ऐकायला आला आणि रणवीरची पॅन्ट फाटली होती. तेव्हा मी त्याची पॅन्ट शिवली होती आणि माझ्या चारही बाजूंनी लोकं नाचत होते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

दीपिकानं हे सुद्धा सांगितलं की, मी एक सामान्य हाउसवाइफप्रमाणे कधी-कधी रणवीरच्या पर्समधून पैसे सुद्धा काढते. शोमध्ये आणखी बरेच मजेदार किस्सेसमोर आले. कपिलनं दीपिकाला सांगितलं की, रणवीर माझी खिल्ली उडवायचा. रणवीरनं कपिलला सांगितलं होतं की, मी दीपिकासोबत भलेही खुलेआम फ्लर्ट करत असेन, पण शेवटी मी माझ्या मस्तानीसोबतच लग्न केलं. रणवीरनं विजयाचा आनंद साजरा करत कपिलला म्हटलं की, दीपिकाला घेऊन गेलो मी. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, रणवीर लवकरच 83 या सिनेमात दिसेल. हा सिनेमा 1983 सालचा भारतीय क्रिकेट टीमच्या वर्ल्ड कप विजयावर आधारित आहे. यात रणवीर माजी भारतीय कॅप्टन कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. तर दीपिका पदुकोण त्यांची पत्नी रोमी भाटियाच्या रूपात दिसेल. हा सिनेमा 10 एप्रिलला रिलीज होईल. या सिनेमात रणवीर व्यतिरिक्त ताहिर राज भसीन, साकीब सलीम, एमी वर्क, हॅरि सिंधू, चिराग पाटील आणि साहिल खट्टर दिसणार आहेत. या व्यतिरिक्त या महिन्याच्या 10 तारखेला दीपिकाचा छपाक सिनेमा रिलीज होईल. अॅसिड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवालच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी